अकोला :कृषी सहायक पदभरती पुढे ढकलली 

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी सहायक पदासाठी रविवारी (ता. १४) आयोजित लेखी परीक्षा एसटी कामगारांच्या संपामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. या बाबत विद्यापीठ प्रशासनाने शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी जाहीर केले. आता पुढील परीक्षेची तारीख विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाहीर केली जाणार आहे. 

विद्यापीठांतर्गत कृषी सहायक (पदविका, पदवीधर) पदासाठी दोन वर्षांपूर्वी अर्ज मागवण्यात आले होते. त्यानंतर कोरोना काळामुळे पदभरती रखडत गेली. गेल्या महिन्यात ही परीक्षा घेतली जाणार असतानाच आरोग्य सेवेचा पेपर एकाच दिवशी आल्याने परीक्षा पुढे ढकलून १४ नोव्हेंबरला घेण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार परीक्षेचे नियोजन केले जात होते.

दरम्यानच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप कायम राहल्याने व वाहतुकीची समस्या निर्माण झालेली असल्याने आताही परीक्षा रद्द करण्याची मागणी पुढे आली होती. कार्यकारी परिषद, विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू, कुलसचिवांकडे या बाबत मागणी केली. कृषिमंत्र्यांकडेही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने मागण्यांची दखल घेत सायंकाळच्या सुमारास रविवारी होऊ घातलेली परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले. आता परीक्षेची पुढील तारीख विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती कुलसचिव सुरेंद्र काळबांडे यांनी दिली.

News Item ID: 
820-news_story-1636813757-awsecm-752
Mobile Device Headline: 
अकोला :कृषी सहायक पदभरती पुढे ढकलली 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Agriculture assistant recruitment postponedAgriculture assistant recruitment postponed
Mobile Body: 

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी सहायक पदासाठी रविवारी (ता. १४) आयोजित लेखी परीक्षा एसटी कामगारांच्या संपामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. या बाबत विद्यापीठ प्रशासनाने शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी जाहीर केले. आता पुढील परीक्षेची तारीख विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाहीर केली जाणार आहे. 

विद्यापीठांतर्गत कृषी सहायक (पदविका, पदवीधर) पदासाठी दोन वर्षांपूर्वी अर्ज मागवण्यात आले होते. त्यानंतर कोरोना काळामुळे पदभरती रखडत गेली. गेल्या महिन्यात ही परीक्षा घेतली जाणार असतानाच आरोग्य सेवेचा पेपर एकाच दिवशी आल्याने परीक्षा पुढे ढकलून १४ नोव्हेंबरला घेण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार परीक्षेचे नियोजन केले जात होते.

दरम्यानच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप कायम राहल्याने व वाहतुकीची समस्या निर्माण झालेली असल्याने आताही परीक्षा रद्द करण्याची मागणी पुढे आली होती. कार्यकारी परिषद, विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू, कुलसचिवांकडे या बाबत मागणी केली. कृषिमंत्र्यांकडेही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने मागण्यांची दखल घेत सायंकाळच्या सुमारास रविवारी होऊ घातलेली परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले. आता परीक्षेची पुढील तारीख विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती कुलसचिव सुरेंद्र काळबांडे यांनी दिली.

English Headline: 
Agriculture News in Marathi Agriculture assistant recruitment postponed
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
कृषी विद्यापीठ agriculture university संप प्रशासन administrations वर्षा varsha आरोग्य health संघटना unions
Search Functional Tags: 
कृषी विद्यापीठ, Agriculture University, संप, प्रशासन, Administrations, वर्षा, Varsha, आरोग्य, Health, संघटना, Unions
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Agriculture assistant recruitment postponed
Meta Description: 
Agriculture assistant recruitment postponed
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी सहायक पदासाठी रविवारी (ता. १४) आयोजित लेखी परीक्षा एसटी कामगारांच्या संपामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X