Take a fresh look at your lifestyle.

अकोला जिल्ह्यात आता दिवसाला हजार शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी

0

अकोला  ः जिल्ह्यात कापूस खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचली असून सातत्याने दबाव टाकल्यामुळे आता दिवसाला एक हजार शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस पावसाळ्यापुर्वी खरेदी होईल, अशी शक्यता वाढली आहे. याबाबत सुधारीत नियोजन प्रशासनाने केले आहे. सीसीआय तसेच कापूस पणन महासंघाच्या केंद्रावर वेगाने खरेदी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात लॉकडाउन सुरु झाल्यापासून कापूस खरेदीचा वेग मंदावला होता. हजारो शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडलेला असताना काही दिवस केवळ ३० ते ४० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात होता. शेतकरी, लोकप्रतिनिधींनी सातत्याने खरेदी वाढविण्यासाठी दबाव तयार केला. याचा परिणाम आता दिसू लागला आहे. प्रशासनाने सध्या कार्यरत असलेल्या केंद्रांवर दिवसभरात हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाईल, असे नियोजन केले आहे.

सीसीआयच्या चिखलगाव (ता. अकोला) केंद्रावर २६ मे पर्यंत प्रतिदिवस १०० व त्यानंतर प्रतिदिवस ३०० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाईल. तर पातूर केंद्रावर ५०, बार्शीटाकळी केंद्रावर २९ मेपर्यंत १५०, अकोट येथे ३००, हिवरखेड (ता. तेल्हारा) येथे ५०, मूर्तिजापूर मध्ये १५०, बाळापूर केंद्रावर ५० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाईल.

कापूस पणन महासंघाच्या बोरगाव आणि कानशिवणी (ता. अकोला) केंद्रावर प्रतिदिवस १००, तेल्हारा केंद्रावर सध्या ५० व ग्रेडर उपलब्ध झाल्यानंतर २०० शेतकऱ्यांचा कापूस खरेदीचे नियोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारे सीसीआयच्या केंद्रांवर ८५० आणि पणन महासंघाच्या केंद्रांवर १५० असा मिळून १००० शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास अद्यापही तीन दिवस (ता.२६ मे) शिल्लक आहेत. जे शेतकरी कापूस विक्री करू इच्छितात त्यांनी तातडीने नोंदणी करण्याबाबत जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी आवाहन केले आहे.

सीसीआयची कापूस खरेदी केंद्रे : अकोला-चिखलगांव , पातूर, बार्शीटाकळी, अकोट, हिवरखेड ,मूर्तिजापूर,बाळापूर
कापूस फेडरेशनची केंद्रे : अकोला – बोरगांव/कानशिवणी,  तेल्हारा.

News Item ID: 
820-news_story-1590230953-690
Mobile Device Headline: 
अकोला जिल्ह्यात आता दिवसाला हजार शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी
Appearance Status Tags: 
Tajya News
 cotton procure from one thousand farmers daily  cotton procure from one thousand farmers daily
Mobile Body: 

अकोला  ः जिल्ह्यात कापूस खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचली असून सातत्याने दबाव टाकल्यामुळे आता दिवसाला एक हजार शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस पावसाळ्यापुर्वी खरेदी होईल, अशी शक्यता वाढली आहे. याबाबत सुधारीत नियोजन प्रशासनाने केले आहे. सीसीआय तसेच कापूस पणन महासंघाच्या केंद्रावर वेगाने खरेदी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात लॉकडाउन सुरु झाल्यापासून कापूस खरेदीचा वेग मंदावला होता. हजारो शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडलेला असताना काही दिवस केवळ ३० ते ४० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात होता. शेतकरी, लोकप्रतिनिधींनी सातत्याने खरेदी वाढविण्यासाठी दबाव तयार केला. याचा परिणाम आता दिसू लागला आहे. प्रशासनाने सध्या कार्यरत असलेल्या केंद्रांवर दिवसभरात हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाईल, असे नियोजन केले आहे.

सीसीआयच्या चिखलगाव (ता. अकोला) केंद्रावर २६ मे पर्यंत प्रतिदिवस १०० व त्यानंतर प्रतिदिवस ३०० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाईल. तर पातूर केंद्रावर ५०, बार्शीटाकळी केंद्रावर २९ मेपर्यंत १५०, अकोट येथे ३००, हिवरखेड (ता. तेल्हारा) येथे ५०, मूर्तिजापूर मध्ये १५०, बाळापूर केंद्रावर ५० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाईल.

कापूस पणन महासंघाच्या बोरगाव आणि कानशिवणी (ता. अकोला) केंद्रावर प्रतिदिवस १००, तेल्हारा केंद्रावर सध्या ५० व ग्रेडर उपलब्ध झाल्यानंतर २०० शेतकऱ्यांचा कापूस खरेदीचे नियोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारे सीसीआयच्या केंद्रांवर ८५० आणि पणन महासंघाच्या केंद्रांवर १५० असा मिळून १००० शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास अद्यापही तीन दिवस (ता.२६ मे) शिल्लक आहेत. जे शेतकरी कापूस विक्री करू इच्छितात त्यांनी तातडीने नोंदणी करण्याबाबत जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी आवाहन केले आहे.

सीसीआयची कापूस खरेदी केंद्रे : अकोला-चिखलगांव , पातूर, बार्शीटाकळी, अकोट, हिवरखेड ,मूर्तिजापूर,बाळापूर
कापूस फेडरेशनची केंद्रे : अकोला – बोरगांव/कानशिवणी,  तेल्हारा.

English Headline: 
Farming Agricultural Business News Marathi cotton procure from one thousand farmers daily Akola Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
कापूस प्रशासन तूर अकोट
Search Functional Tags: 
कापूस, प्रशासन, तूर, अकोट
Twitter Publish: 
Meta Keyword: 
cotton procurement farmers Akola government corona
Meta Description: 
cotton procure from one thousand farmers daily
अकोला  ः जिल्ह्यात कापूस खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचली असून सातत्याने दबाव टाकल्यामुळे आता दिवसाला एक हजार शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस पावसाळ्यापुर्वी खरेदी होईल, अशी शक्यता वाढली आहे. याबाबत सुधारीत नियोजन प्रशासनाने केले आहे. सीसीआय तसेच कापूस पणन महासंघाच्या केंद्रावर वेगाने खरेदी करण्यात येणार आहे.Source link

X