Take a fresh look at your lifestyle.

अकोला जिल्ह्यात मुगाची  हेक्टरी १०० किलो उत्पादकता 

0

अकोला ः यंदाच्या हंगामात अतिवृष्टीने मुग, उडीद, सोयाबीन पिकांची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. यंदा मुगाची हेक्टरी १०० किलो एवढीच उत्पादकता आली आहे. या उत्पादकतेच्या आधारेच हमीभाव खरेदी केली जात असून, काही शेतकऱ्यांना मात्र हा प्रकार अडचणीचा झाला आहे. एकरी ४० किलो मूग शासन घेणार असल्याने जिल्ह्यात या केंद्राकडे एकही शेतकरी फिरकलेला नाही. 

शासनाच्या आदेशानुसार केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत हमीदराने मूग, उडीद, सोयाबीन या शेतमालाची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यासाठी यंत्रणाकडून खरेदी केंद्रांना परवानगी दिल्या गेली. त्यानुसार जिल्ह्यात मूग व उडदासाठी नावनोंदणीची प्रक्रीया राबवण्यात आली. आता ही खरेदी करण्यासाठी शासनाने हंगामात मुगाचा हमीभाव प्रति क्विंटल ७२७५ रुपये सुद्धा निश्‍चित केला आहे. बाजार समित्यांमध्ये सध्या मुगाला सरासरी ५५०० पर्यंत दर मिळत आहे. जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांचे मुगाची पीक हातातून गेले. अकोट तालुक्यात खारपाण पट्ट्यात काही गावांमध्ये मुगाची उत्पादकता एकरी दोन ते तीन क्विंटलदरम्यान आलेली आहे.

आता या शेतकऱ्यांना मुग विक्रीसाठी अडचणी येत आहेत. हमीभाव खरेदी ही उत्पादकतेच्या निकषानुसार केली जाते. उत्पादकता ही एकरी ४० किलो एवढी निघालेली असल्याने इतका कमी मुग विक्रीला शासकीय केंद्रावर नेणे तरी परवडते काय, असा प्रश्‍न शेतकरी करीत आहेत. एकरी १२ ते १५ किलो मुगाची पेरणी केलेली असताना शासन केवळ ४० किलो घेणार असेल तर काय फायदा, असे प्रश्‍न तरोडा भागातील शेतकरी विचारत आहेत. उत्पादकतेचा निकष काही भागासाठी शिथिल करून किमान एकरी दीड क्विंटलपर्यंत तरी शासनाने मुगाची खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

जिल्हानिहाय मुगाची उत्पादकता (प्रति हेक्टर, किलो) 
अकोला १०० 
वाशीम ५७० 
अमरावतीत २०० 
यवतमाळ ३१० 
बुलडाणा ५९०  

News Item ID: 
820-news_story-1636985577-awsecm-555
Mobile Device Headline: 
अकोला जिल्ह्यात मुगाची  हेक्टरी १०० किलो उत्पादकता 
Appearance Status Tags: 
Section News
Mugachi in Akola district Productivity 100 kg per hectareMugachi in Akola district Productivity 100 kg per hectare
Mobile Body: 

अकोला ः यंदाच्या हंगामात अतिवृष्टीने मुग, उडीद, सोयाबीन पिकांची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. यंदा मुगाची हेक्टरी १०० किलो एवढीच उत्पादकता आली आहे. या उत्पादकतेच्या आधारेच हमीभाव खरेदी केली जात असून, काही शेतकऱ्यांना मात्र हा प्रकार अडचणीचा झाला आहे. एकरी ४० किलो मूग शासन घेणार असल्याने जिल्ह्यात या केंद्राकडे एकही शेतकरी फिरकलेला नाही. 

शासनाच्या आदेशानुसार केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत हमीदराने मूग, उडीद, सोयाबीन या शेतमालाची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यासाठी यंत्रणाकडून खरेदी केंद्रांना परवानगी दिल्या गेली. त्यानुसार जिल्ह्यात मूग व उडदासाठी नावनोंदणीची प्रक्रीया राबवण्यात आली. आता ही खरेदी करण्यासाठी शासनाने हंगामात मुगाचा हमीभाव प्रति क्विंटल ७२७५ रुपये सुद्धा निश्‍चित केला आहे. बाजार समित्यांमध्ये सध्या मुगाला सरासरी ५५०० पर्यंत दर मिळत आहे. जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांचे मुगाची पीक हातातून गेले. अकोट तालुक्यात खारपाण पट्ट्यात काही गावांमध्ये मुगाची उत्पादकता एकरी दोन ते तीन क्विंटलदरम्यान आलेली आहे.

आता या शेतकऱ्यांना मुग विक्रीसाठी अडचणी येत आहेत. हमीभाव खरेदी ही उत्पादकतेच्या निकषानुसार केली जाते. उत्पादकता ही एकरी ४० किलो एवढी निघालेली असल्याने इतका कमी मुग विक्रीला शासकीय केंद्रावर नेणे तरी परवडते काय, असा प्रश्‍न शेतकरी करीत आहेत. एकरी १२ ते १५ किलो मुगाची पेरणी केलेली असताना शासन केवळ ४० किलो घेणार असेल तर काय फायदा, असे प्रश्‍न तरोडा भागातील शेतकरी विचारत आहेत. उत्पादकतेचा निकष काही भागासाठी शिथिल करून किमान एकरी दीड क्विंटलपर्यंत तरी शासनाने मुगाची खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

जिल्हानिहाय मुगाची उत्पादकता (प्रति हेक्टर, किलो) 
अकोला १०० 
वाशीम ५७० 
अमरावतीत २०० 
यवतमाळ ३१० 
बुलडाणा ५९०  

English Headline: 
Agriculture News in Marathi Mugachi in Akola district Productivity 100 kg per hectare
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
मात mate अतिवृष्टी उडीद सोयाबीन अकोला akola हमीभाव minimum support price मूग वन forest अकोट वाशीम अमरावती यवतमाळ yavatmal
Search Functional Tags: 
मात, mate, अतिवृष्टी, उडीद, सोयाबीन, अकोला, Akola, हमीभाव, Minimum Support Price, मूग, वन, forest, अकोट, वाशीम, अमरावती, यवतमाळ, Yavatmal
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Mugachi in Akola district Productivity 100 kg per hectare
Meta Description: 
Mugachi in Akola district Productivity 100 kg per hectare
यंदाच्या हंगामात अतिवृष्टीने मुग, उडीद, सोयाबीन पिकांची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. यंदा मुगाची हेक्टरी १०० किलो एवढीच उत्पादकता आली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X