[ad_1]
अकोला : आगामी खरीप हंगामासाठी पिककर्जाचा दर निश्चित करण्यात आला असून, कापसाला हेक्टरी १६ हजारांपर्यंत वाढीव स्वरूपात पीककर्ज मिळू शकते. राज्यस्तरीय समितीने नुकतेच हे दर निश्चित केले आहेत. यंदा बागायती कपाशी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी ६९ हजार रुपये पीककर्ज बँकांकडून मिळू शकणार आहे. लवकरच जिल्हा अग्रणी बँकेकडून खरीप व रब्बी हंगामासाठी होणाऱ्या पीककर्ज वाटपाचे नियोजन निश्चित केले जाणार आहे.
एप्रिल महिना उजाडताच खरीपाच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. नवीन हंगामासाठी पीककर्ज वाटपाच्या हालचाली सुरू झाल्या. वाढता खर्च लक्षात घेता यंदाच्या पीककर्ज वितरणात थोडी वाढ करण्यात आली आहे. प्रामुख्याने कपाशी पिकाला मिळणारे पीककर्ज जवळपास १६ हजारांनी हेक्टरी वाढविण्यात आले. सोयाबीनच्या पिककर्जातही चार हजारांची हेक्टरी वाढ दिसून येत आहे. राज्य शासनाने दिलेल्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे शेतकरी कर्जमुक्त झाल्याने यंदाच्या पीककर्ज मिळवण्यास पात्र ठरणार आहेत.
गेल्यावर्षात जिल्ह्यात ७५ टक्क्यांवर खातेदार शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज वितरित झाले होते. या वर्षासाठी राज्यस्तरीय समितीने पीककर्ज वितरणाचे नियोजन आखताना पीक कर्जाचे दर निश्चित करीत पीकनिहाय हेक्टरी काही रकमेची वाढ केली. गेल्या हंगामात जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचा सुमारे १२०० कोटींचा लक्षांक होता. गेल्या वर्षांत या उद्दिष्टापैकी ९०५ कोटींचे पीककर्ज वाटप झाले होते.
इतर पिकांसाठी नवीन दर
मका ३० हजार रुपये हेक्टरी, मिरची ७५ हजार हेक्टरी, टोमॅटो ८० हजार, कांदा ६५ हजार, हळद १ लाख ५ हजार, कोबी ४२ हजार, फूल पिके ३६ ते ४० हजार, केळी १ लाख रुपये, संत्री ८८ हजार, बाजरी १६ हजार.
पीकनिहाय प्रतिहेक्टरी पीककर्ज दर
- पीक सध्याचा दर (नवीन दर)
- कापूस (बागायती) ५३००० (६९०००)
- कापूस (जिरायती) ४३००० ( ५२०००)
- सोयाबीन ४५००० (४९०००)
- खरीप ज्वारी (जिरायती) २५००० (२७०००)
- तूर (जिरायती) ३१५०० (३५०००)
- उडीद (जिरायती) १९००० (२००००)

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.