Take a fresh look at your lifestyle.

अक्षय तु चुकीचा असशील तर.. तुझा बाजार झालाच म्हणून समज!

0


जुन्नर। संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण तापवलेला सत्यशील शेरकर विरुद्ध अक्षय बोऱ्हाडे वाद अखेर मिटला असून दोन्ही बाजूंनी सामोपचारानं माघार घेत वादावर पडदा टाकण्यात आला आहे. शिवजन्मभूमीची बदनामी नको, या एकाच कारणामुळे हा वाद मिटल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये शिरोली बुद्रुक गावातील ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील यांनी प्रामुख्याने पुढाकार घेतला आणि बैठक घेऊन हा वाद गावातल्या गावात निकाली काढल्याचे सांगण्यात येतय.

मात्र हा वाद मिटल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते बाबाराजे देशमुख हे देखील अक्षय बोऱ्हाडे याच्यावर चांगलेच भडकले आहेत. ‘अक्षय बोऱ्हाडे याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज याचं नावं वापरून सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. पण जर आम्हाला कळालं की अक्षय चुकीचा आहे, त्याने हे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं आहे. तर अक्षय तुला आम्ही माफ करणार नाही. आज तुझ्यामुळे तमाम शिवभक्तांना मान खाली घालावी लागली आहे. पण तु शिवभक्त आहेस म्हणून आम्ही तुला पाठींबा द्यायला आलो.’ असं बाबाराजे देशमुख म्हणालेत.

तर, पुढे देशमुख यांनी अक्षय बोऱ्हाडे याच्यावर होणाऱ्या आरोपांचा पाढा वाचत त्याला थेट इशारच दिला आहे. “लोक तुझ्यावर टीका करत आहेत. अवयवांची तस्करी करत असल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे तु लोकांच्या भावनेला ठेच पोहचू देऊ नकोस. तुझ्यावरील आरोप खोटे असल्याचे सिद्ध करून दाखव. नाहीतर तु जर चुकीचा असशील तर तुला सुट्टी नाही, तुझा बाजार झालाच म्हणून समज.” असा थेट इशाराच बाबाराजे देशमुख यांनी बोऱ्हाडेला दिला आहे. याबरोबरच बाबाराजे देशमुख यांनी सत्यशील शेरकर यांना देखील अक्षय वरील आरोप सिद्ध करून दाखवण्याचे आवाहन केले आहे. अन जर बोऱ्हाडे वरचे आरोप सिद्ध झाले तर शिवभक्त त्याला जुन्नरमध्ये येऊन उलटा टांगून मारतील असा सज्जड दम देखील देशमुख यांनी दिला आहे.

बरोबर बोलले राजे तुम्ही ❤️❤️ जो चुकीचा असेल त्याला माफी नाय ?✔️बाबाराजे सदैव शिवभक्तांच्या पाठीशी उभे राहतात.मग तो समोर कोणी असो ??

Posted by Ajay Deshmukh on Monday, June 1, 2020

https://www.facebook.com/100008216072661/videos/271306898564361

जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी याप्रकरणी मोलाची भूमिका बजावल्याचं समोर आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात प्रशासनावर आधीच तणाव असताना आता या प्रकरणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, अशी त्यांची भूमिका होती. दरम्यान, हे प्रकरण मिटवण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील प्रयत्न केल्याचं कळतंय. तसेच सूरज वाजगे , गणेश कवडे, जालिंदर शिंदे, प्रदिप कंद, सनी निम्हण यांचीही प्रमुख भूमिका असल्याचं कळतंय.

बोऱ्हाडे याने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समाज माध्यमात व्हायरल केलेल्या व्हिडीओ मुळे संपुर्ण राज्यात या प्रकरणी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. शिवजन्मभूमी विषयी होत असलेल्या चर्चेस पूर्ण विराम मिळावा व घरातले भांडण घरातच मिटले जावे या हेतूने आमदार बेनके यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने दोघांमध्ये चर्चा घडवून आणली.

दरम्यान, अक्षय बोराडेने शिवप्रेमी आणि सोशल मीडियातील सर्वसामान्य लोकांना शिवछत्रपतींचे नाव सहानुभूतीसाठी वापरून फसवले. या प्रकरणातील अक्षय बोऱ्हाडे हा तरूण गुन्हेगारी टोळीशी परिचित असल्याचं भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. हा मुलगा गुन्हेगारी टोळीशी परिचित आहे, हे ऐकलं होतं. पण त्याच्या फेसबुक लाईव्ह वरून आता सिद्ध झालं, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

Source link

X