अन्नद्रव्यांचा ब्रिकेट्स स्वरूपात वापर

कोकण कृषी विद्यापीठाने मुखत्वे भात पिकाचे उत्पादन अधिक मिळविण्यासाठी खरीप हंगामात खतांच्या ब्रिकेट्सच्या वापराची शिफारस केली आहे. रब्बी पिकांमध्येदेखील या ब्रिकेट्सचा वापर केल्यानंतर उत्पादनात वाढ दिसून आली आहे.

कोकणामध्ये खरीप हंगामात प्रामुख्याने भात, नागली व वेलवर्गीय भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. कोकणातील जमिनीमध्ये पाण्याचा निचरा त्वरित होत असल्याने पिकांना दिलेल्या खतांमधील अन्नद्रव्यांचा पाण्यामार्फत ऱ्हास होतो. त्याकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने मुखत्वे भात पिकाचे उत्पादन अधिक मिळविण्यासाठी खरीप हंगामात खतांच्या ब्रिकेट्सचा वापर करण्याची शिफारस केली आहे. रब्बी पिकांमध्येदेखील या ब्रिकेट्सचा वापर केल्यानंतर उत्पादनात वाढ दिसून आली आहे. तसेच खतांच्या मात्रेमध्ये बचत झाल्याचे आढळून आले.

युरीयासोबत इतर मिश्र खतांचे विशिष्ट गुणोत्तर वापरून क्रांती ब्रिकेटर यंत्रामध्ये तयार केलेल्या गोळ्या म्हणजेच ‘खतांच्या ब्रिकेट्‍स’ होय. कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करून विविध प्रकारच्या ब्रिकेट्स तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे.
 
ब्रिकेट्चे प्रकार अन्नद्रव्यांचे प्रमाण (%)
युरिया- डीएपी ब्रिकेट्स (नत्र: स्फुरद: पालाश)  ३४:१४:१८
युरिया – सुफला ब्रिकेट्स (नत्र: स्फुरद: पालाश) ३४:१७:००
युरिया – १०:२६:२६ ब्रिकेट्स (नत्र: स्फुरद: पालाश) २१.५:२२:२४
कोकण अन्नपूर्णा ब्रिकेट्स (नत्र: स्फुरद: पालाश) ३४:१४:०६
सिलिकॉनयुक्त कोकण अन्नपूर्णा ब्रिकेट्स (नत्र : स्फुरद: पालाश: सिलिका) ३४:१४:०६:०.४४
बोरॉनयुक्त कोकण अन्नपूर्णा ब्रिकेट्स (नत्र: स्फुरद: पालाश: बोरॉन) ३४:१४:०६:०.२२

फायदे 

 • अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी होतो.
 • अन्नद्रव्यांची उपयुक्तता २० ते २५ टक्क्यांनी वाढते.
 • खतांच्या मात्रेमध्ये बचत होते.
 • खतांच्या कार्यक्षमतेत वाढ होते.
 • पिकांच्या उत्पादनात आणि गुणवत्तेमध्ये भरीव वाढ मिळते.
 • मजुरी खर्चात बचत होते.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाद्वारे कोकण अन्नपूर्णा ब्रिकेट्‍सच्या मात्रेची रब्बी पिकांसाठी केलेली शिफारस.
 
पीक ब्रिकेट्सची संख्या (हेक्टरी)  ब्रिकेट्सची संख्या (प्रति झाड/रोपटे) उत्पादनात वाढ (%)
भात ८३३३३  १/४ १६
सुपारी  २०५८२३  १५० १३
भेंडी ६९५०० २०
मिरची ६९५०० ३३ ४ 
आंबा ९९९००  १५००
घेवडा ३७०३७  १/२  १५

युरिया ब्रिकेट्स तयार करताना घ्यावयाची काळजी 

 • युरिया सोबत इतर मिश्र खते यांचे गुणोत्तर १:१.५ या प्रमाणात घ्यावे.
 • खतांमध्ये आर्द्रता नसल्याची खात्री करावी.
 • ब्रिकेट्स तयार करण्याचे यंत्र व्यवस्थित स्वच्छ आणि कोरडी करून घ्यावे.
 • ब्रिकेट्स शक्यतो उष्ण आणि कोरड्या हवामानात करावे.
 • कोकणामध्ये शक्यतो उन्हाळी हंगामात किंवा ऑक्टोबरमध्ये ब्रिकेट्स तयार कराव्यात.

ब्रिकेट्स वापरताना घ्यावयाची काळजी 

 • भाजीपाला पिके लागवडीनंतर ८ दिवसांनी ब्रिकेट्सचा वापर करावा.
 • पीकनिहाय ब्रिकेट्सची एकूण संख्या, पिकांच्या वाढीच्या कालावधीत विभागून द्यावीत.
 • ब्रिकेट्स जमिनीमध्ये ५ ते ७ सेंमी खोल खोचावीत
 • भाजीपाला व कडधान्य पिकांमध्ये मुळापासून ७ ते १० सेंमी लांब अंतरावर ब्रिकेट्स द्यावीत.
 • ब्रिकेट्सची मात्रा सेंद्रिय खतांसोबत (शेणखत/गांडूळखत/ कोंबडी खत) द्यावी.
 • ब्रिकेट्स दिल्यानंतर लगेच सिंचन द्यावे. कारण जमिनीत ओलावा असणे गरजेचे असते.
 • रब्बी पिकांना ठिबक सिंचनाच्या पाण्यामार्फत ब्रिकट्‍स वापर केल्यास अधिक फायदा होतो.
 • वापर झाल्यानंतर शिल्लक ब्रिकेट्‍स सीलबंद पाकिटामध्ये व्यवस्थित ठेवाव्यात.

– डॉ. मनिष कस्तुरे, ९४०३६४२२९५
(संशोधन उपसंचालक (कृषी) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

News Item ID: 
820-news_story-1636460573-awsecm-582
Mobile Device Headline: 
अन्नद्रव्यांचा ब्रिकेट्स स्वरूपात वापर
Appearance Status Tags: 
Section News
 ब्रिकेट्‍स तयार करण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेले ‘क्रांती ब्रिकेटर यंत्र’ ब्रिकेट्‍स तयार करण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेले ‘क्रांती ब्रिकेटर यंत्र’
Mobile Body: 

कोकण कृषी विद्यापीठाने मुखत्वे भात पिकाचे उत्पादन अधिक मिळविण्यासाठी खरीप हंगामात खतांच्या ब्रिकेट्सच्या वापराची शिफारस केली आहे. रब्बी पिकांमध्येदेखील या ब्रिकेट्सचा वापर केल्यानंतर उत्पादनात वाढ दिसून आली आहे.

कोकणामध्ये खरीप हंगामात प्रामुख्याने भात, नागली व वेलवर्गीय भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. कोकणातील जमिनीमध्ये पाण्याचा निचरा त्वरित होत असल्याने पिकांना दिलेल्या खतांमधील अन्नद्रव्यांचा पाण्यामार्फत ऱ्हास होतो. त्याकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने मुखत्वे भात पिकाचे उत्पादन अधिक मिळविण्यासाठी खरीप हंगामात खतांच्या ब्रिकेट्सचा वापर करण्याची शिफारस केली आहे. रब्बी पिकांमध्येदेखील या ब्रिकेट्सचा वापर केल्यानंतर उत्पादनात वाढ दिसून आली आहे. तसेच खतांच्या मात्रेमध्ये बचत झाल्याचे आढळून आले.

युरीयासोबत इतर मिश्र खतांचे विशिष्ट गुणोत्तर वापरून क्रांती ब्रिकेटर यंत्रामध्ये तयार केलेल्या गोळ्या म्हणजेच ‘खतांच्या ब्रिकेट्‍स’ होय. कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करून विविध प्रकारच्या ब्रिकेट्स तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे.
 
ब्रिकेट्चे प्रकार अन्नद्रव्यांचे प्रमाण (%)
युरिया- डीएपी ब्रिकेट्स (नत्र: स्फुरद: पालाश)  ३४:१४:१८
युरिया – सुफला ब्रिकेट्स (नत्र: स्फुरद: पालाश) ३४:१७:००
युरिया – १०:२६:२६ ब्रिकेट्स (नत्र: स्फुरद: पालाश) २१.५:२२:२४
कोकण अन्नपूर्णा ब्रिकेट्स (नत्र: स्फुरद: पालाश) ३४:१४:०६
सिलिकॉनयुक्त कोकण अन्नपूर्णा ब्रिकेट्स (नत्र : स्फुरद: पालाश: सिलिका) ३४:१४:०६:०.४४
बोरॉनयुक्त कोकण अन्नपूर्णा ब्रिकेट्स (नत्र: स्फुरद: पालाश: बोरॉन) ३४:१४:०६:०.२२

फायदे 

 • अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी होतो.
 • अन्नद्रव्यांची उपयुक्तता २० ते २५ टक्क्यांनी वाढते.
 • खतांच्या मात्रेमध्ये बचत होते.
 • खतांच्या कार्यक्षमतेत वाढ होते.
 • पिकांच्या उत्पादनात आणि गुणवत्तेमध्ये भरीव वाढ मिळते.
 • मजुरी खर्चात बचत होते.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाद्वारे कोकण अन्नपूर्णा ब्रिकेट्‍सच्या मात्रेची रब्बी पिकांसाठी केलेली शिफारस.
 
पीक ब्रिकेट्सची संख्या (हेक्टरी)  ब्रिकेट्सची संख्या (प्रति झाड/रोपटे) उत्पादनात वाढ (%)
भात ८३३३३  १/४ १६
सुपारी  २०५८२३  १५० १३
भेंडी ६९५०० २०
मिरची ६९५०० ३३ ४ 
आंबा ९९९००  १५००
घेवडा ३७०३७  १/२  १५

युरिया ब्रिकेट्स तयार करताना घ्यावयाची काळजी 

 • युरिया सोबत इतर मिश्र खते यांचे गुणोत्तर १:१.५ या प्रमाणात घ्यावे.
 • खतांमध्ये आर्द्रता नसल्याची खात्री करावी.
 • ब्रिकेट्स तयार करण्याचे यंत्र व्यवस्थित स्वच्छ आणि कोरडी करून घ्यावे.
 • ब्रिकेट्स शक्यतो उष्ण आणि कोरड्या हवामानात करावे.
 • कोकणामध्ये शक्यतो उन्हाळी हंगामात किंवा ऑक्टोबरमध्ये ब्रिकेट्स तयार कराव्यात.

ब्रिकेट्स वापरताना घ्यावयाची काळजी 

 • भाजीपाला पिके लागवडीनंतर ८ दिवसांनी ब्रिकेट्सचा वापर करावा.
 • पीकनिहाय ब्रिकेट्सची एकूण संख्या, पिकांच्या वाढीच्या कालावधीत विभागून द्यावीत.
 • ब्रिकेट्स जमिनीमध्ये ५ ते ७ सेंमी खोल खोचावीत
 • भाजीपाला व कडधान्य पिकांमध्ये मुळापासून ७ ते १० सेंमी लांब अंतरावर ब्रिकेट्स द्यावीत.
 • ब्रिकेट्सची मात्रा सेंद्रिय खतांसोबत (शेणखत/गांडूळखत/ कोंबडी खत) द्यावी.
 • ब्रिकेट्स दिल्यानंतर लगेच सिंचन द्यावे. कारण जमिनीत ओलावा असणे गरजेचे असते.
 • रब्बी पिकांना ठिबक सिंचनाच्या पाण्यामार्फत ब्रिकट्‍स वापर केल्यास अधिक फायदा होतो.
 • वापर झाल्यानंतर शिल्लक ब्रिकेट्‍स सीलबंद पाकिटामध्ये व्यवस्थित ठेवाव्यात.

– डॉ. मनिष कस्तुरे, ९४०३६४२२९५
(संशोधन उपसंचालक (कृषी) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

English Headline: 
agricultural news in marathi Use of fertilizer in the form of briquettes
Author Type: 
External Author
डॉ. मनिष कस्तुरे
कोकण konkan कृषी विद्यापीठ agriculture university खत fertiliser खरीप मात mate बाळ baby infant यंत्र machine रॉ हवामान कडधान्य सिंचन ओला ठिबक सिंचन
Search Functional Tags: 
कोकण, Konkan, कृषी विद्यापीठ, Agriculture University, खत, Fertiliser, खरीप, मात, mate, बाळ, baby, infant, यंत्र, Machine, रॉ, हवामान, कडधान्य, सिंचन, ओला, ठिबक सिंचन
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Use of fertilizer in the form of briquettes
Meta Description: 
Use of fertilizer in the form of briquettes
कोकण कृषी विद्यापीठाने मुखत्वे भात पिकाचे उत्पादन अधिक मिळविण्यासाठी खरीप हंगामात खतांच्या ब्रिकेट्सच्या वापराची शिफारस केली आहे. रब्बी पिकांमध्येदेखील या ब्रिकेट्सचा वापर केल्यानंतर उत्पादनात वाढ दिसून आली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X