अन् त्यांनी दोन वर्षांनंतर घातली चप्पल 

निफाड, जि. नाशिक : तालुक्यातील साखर कारखाने बंद असल्याने ऊस उत्पादक मोठ्या अडचणीत सापडले होते. त्यामुळे अनेकांचा रोजगार आणि रोजीरोटी गेली होती. त्यामुळे बंद असलेला कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना (रासाका) पुन्हा सुरू व्हावा यासाठी ‘रासाका बचाव कृती समिती’च्या माध्यमातून नामदेवकाका शिंदे यांनी ‘जोपर्यंत कारखाना सुरू होत नाही. तोपर्यंत चप्पल घालणार नाही,’ असा संकल्प केला होता. आता ‘रासाका’चे धुराडे पेटल्याने दोन वर्षांपासून अनवाणी फिरणारे शिंदे यांनी कारखाना सुरू होताच आमदार दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत पुन्हा चप्पल घातली. 

    शिवडी (ता. निफाड) येथील सोसायटीचे माजी चेअरमन नामदेवकाका शिंदे यांनी एक जुलै २०२०ला कर्मवीरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत रासाकाची चिमणी पेटून कारखाना सुरू होत नाही, तोपर्यंत पायात चप्पल न घालता अनवाणी राहण्याचा संकल्प केला होता. त्यांच्या या निर्णयाला कार्यक्षेत्रातील वैभव तासकर, बाबूराव सानप, धोंडिराम रायते, सचिन वाघ, दत्तू मुरकुटे, विकास रायते, लक्ष्मण शिंदे आदी युवकांनी प्रतिसाद दिला अन् रासाका बचाव कृती समितीची उभारणी झाली. 

      गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला रानवड येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा, या मागणीसाठी निफाड तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष गट-तटाच्या नेत्यांना साकडे घातले. या समितीने सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनाला अडचणी लक्षात आणून दिल्या. यासाठी जिल्हा प्रशासन, साखर आयुक्त, लोकप्रतिनिधी व मंत्रालय आदी ठिकाणी बचाव कृती समितीने धडक देत रासाका सुरू करण्याच्या मागणीचा रेटा लावून धरला होता. तर साखळी उपोषणाद्वारे लढा व्यापक पुकारला होता. त्यांच्या या संघर्षाच्या ठिणगीचा पुढे वणवा झाला. त्यांच्या व्यवहार्य मागणीला प्रतिसाद मिळत गेला. रासाका सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील तांत्रिक अडचणी दूर झाल्या. राज्य सरकारच्या माध्यमातून देशात पहिल्यांदाच पतसंस्थेच्या माध्यमातून आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वात स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेने रासाका भाडेतत्वावर चालविण्यास घेतला. त्याचा प्रारंभ माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते मोळी टाकून झाला आहे. त्यामुळे आमदार बनकर यांच्या उपस्थितीत चप्पल घालून शिंदे यांनी आपला संकल्प पूर्ण केला. 

News Item ID: 
820-news_story-1637157196-awsecm-241
Mobile Device Headline: 
अन् त्यांनी दोन वर्षांनंतर घातली चप्पल 
Appearance Status Tags: 
Mukhya News
He finally put on the slippers after two yearsHe finally put on the slippers after two years
Mobile Body: 

निफाड, जि. नाशिक : तालुक्यातील साखर कारखाने बंद असल्याने ऊस उत्पादक मोठ्या अडचणीत सापडले होते. त्यामुळे अनेकांचा रोजगार आणि रोजीरोटी गेली होती. त्यामुळे बंद असलेला कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना (रासाका) पुन्हा सुरू व्हावा यासाठी ‘रासाका बचाव कृती समिती’च्या माध्यमातून नामदेवकाका शिंदे यांनी ‘जोपर्यंत कारखाना सुरू होत नाही. तोपर्यंत चप्पल घालणार नाही,’ असा संकल्प केला होता. आता ‘रासाका’चे धुराडे पेटल्याने दोन वर्षांपासून अनवाणी फिरणारे शिंदे यांनी कारखाना सुरू होताच आमदार दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत पुन्हा चप्पल घातली. 

    शिवडी (ता. निफाड) येथील सोसायटीचे माजी चेअरमन नामदेवकाका शिंदे यांनी एक जुलै २०२०ला कर्मवीरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत रासाकाची चिमणी पेटून कारखाना सुरू होत नाही, तोपर्यंत पायात चप्पल न घालता अनवाणी राहण्याचा संकल्प केला होता. त्यांच्या या निर्णयाला कार्यक्षेत्रातील वैभव तासकर, बाबूराव सानप, धोंडिराम रायते, सचिन वाघ, दत्तू मुरकुटे, विकास रायते, लक्ष्मण शिंदे आदी युवकांनी प्रतिसाद दिला अन् रासाका बचाव कृती समितीची उभारणी झाली. 

      गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला रानवड येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा, या मागणीसाठी निफाड तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष गट-तटाच्या नेत्यांना साकडे घातले. या समितीने सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनाला अडचणी लक्षात आणून दिल्या. यासाठी जिल्हा प्रशासन, साखर आयुक्त, लोकप्रतिनिधी व मंत्रालय आदी ठिकाणी बचाव कृती समितीने धडक देत रासाका सुरू करण्याच्या मागणीचा रेटा लावून धरला होता. तर साखळी उपोषणाद्वारे लढा व्यापक पुकारला होता. त्यांच्या या संघर्षाच्या ठिणगीचा पुढे वणवा झाला. त्यांच्या व्यवहार्य मागणीला प्रतिसाद मिळत गेला. रासाका सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील तांत्रिक अडचणी दूर झाल्या. राज्य सरकारच्या माध्यमातून देशात पहिल्यांदाच पतसंस्थेच्या माध्यमातून आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वात स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेने रासाका भाडेतत्वावर चालविण्यास घेतला. त्याचा प्रारंभ माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते मोळी टाकून झाला आहे. त्यामुळे आमदार बनकर यांच्या उपस्थितीत चप्पल घालून शिंदे यांनी आपला संकल्प पूर्ण केला. 

English Headline: 
Agriculture News in Marathi He finally put on the slippers after two years
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
निफाड niphad साखर ऊस रोजगार employment वाघ वर्षा varsha आमदार विकास प्रशासन administrations मंत्रालय शरद पवार sharad pawar
Search Functional Tags: 
निफाड, Niphad, साखर, ऊस, रोजगार, Employment, वाघ, वर्षा, Varsha, आमदार, विकास, प्रशासन, Administrations, मंत्रालय, शरद पवार, Sharad Pawar
Twitter Publish: 
Meta Keyword: 
He finally put on the slippers after two years
Meta Description: 
He finally put on the slippers after two years
​निफाड तालुक्यातील साखर कारखाने बंद असल्याने ऊस उत्पादक मोठ्या अडचणीत सापडले होते. त्यामुळे अनेकांचा रोजगार आणि रोजीरोटी गेली होती.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X