अमरावतीत सुधारित पैसेवारीत १६५८ गावांवर अन्याय 

अमरावती : संततधार पावसामुळे जिल्हयात तीन लाख हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. मात्र प्रशासनाकडून केवळ दोन तालुक्‍यातील आणेवारीच ५० पैशाच्या आत जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्‍त होत आहे. अमरावती व नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील ३०१ गावांना या माध्यमातून न्याय मिळाला असला तरी १६५८ गावांसाठी हा प्रकार अन्यायकारक ठरला आहे. 

खरिपातील मूग, उडीद या पिकांना सुरवातीला पावसातील खंड आणि त्यानंतर पावसाची संततधार असा दुहेरी फटका बसला. त्यामुळे ही दोन्ही पिके गमावण्याची वेळ हंगामाच्या सुरवातीलाच शेतकऱ्यांवर आली. त्यानंतर ऐन काढणीच्यावेळी रोज पाऊस कोसळत असल्याने सोयाबीन गेले. कपाशीची बोंड सडली, किडरोगांनी देखील पीक पोखरले. परिणामी कपाशीची उत्पादकता देखील प्रभावित झाली आहे.

अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादकता खर्चाची भरपाई देखील होऊ न शकल्याने ते निराश झाले होते. त्यामुळे नजर अंदाजानंतर सुधारित पैसेवारीच्या माध्यमातून दुष्काळीस्थितीचे वास्तव समोर येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु हे वास्तव सुधारित पैसेवारीमध्ये दुर्लक्षित करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. यंदा पावसाळ्यात १२० पैकी ५१ दिवस पावसाचे राहिले. जिल्हयात ६५९.४ मि.मि. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ७९१.६ मिमि असा १२० टक्‍के पाऊस बरसला. मेळघाट वगळता सर्व १२ तालुक्‍यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या परिणामी खरीप पिकांचे नुकसान झाले. 

तालुकानिहाय्य जाहीर पैसेवारी 
अमरावती : ४७ 
नांदगाव खंडेश्‍वर : ४८ 
भातकुली : ५३ 
तिवसा : ५४ 
चांदूररेल्वे : ५४ 
धामगावगाव रेल्वे : ५९ 
: ५६ 
वरुड : ५४ 
अचलपूर : ५२ 
चांदूर बाजार : ५२ 
दर्यापूर : ५३ 
अंजनगावसूर्जी : ५४ 
धारणी : ५८ 
चिखलदरा : ५५ 

News Item ID: 
820-news_story-1636897619-awsecm-435
Mobile Device Headline: 
अमरावतीत सुधारित पैसेवारीत १६५८ गावांवर अन्याय 
Appearance Status Tags: 
Section News
Injustice on 1658 villages in Amravati with revised paisawariInjustice on 1658 villages in Amravati with revised paisawari
Mobile Body: 

अमरावती : संततधार पावसामुळे जिल्हयात तीन लाख हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. मात्र प्रशासनाकडून केवळ दोन तालुक्‍यातील आणेवारीच ५० पैशाच्या आत जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्‍त होत आहे. अमरावती व नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील ३०१ गावांना या माध्यमातून न्याय मिळाला असला तरी १६५८ गावांसाठी हा प्रकार अन्यायकारक ठरला आहे. 

खरिपातील मूग, उडीद या पिकांना सुरवातीला पावसातील खंड आणि त्यानंतर पावसाची संततधार असा दुहेरी फटका बसला. त्यामुळे ही दोन्ही पिके गमावण्याची वेळ हंगामाच्या सुरवातीलाच शेतकऱ्यांवर आली. त्यानंतर ऐन काढणीच्यावेळी रोज पाऊस कोसळत असल्याने सोयाबीन गेले. कपाशीची बोंड सडली, किडरोगांनी देखील पीक पोखरले. परिणामी कपाशीची उत्पादकता देखील प्रभावित झाली आहे.

अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादकता खर्चाची भरपाई देखील होऊ न शकल्याने ते निराश झाले होते. त्यामुळे नजर अंदाजानंतर सुधारित पैसेवारीच्या माध्यमातून दुष्काळीस्थितीचे वास्तव समोर येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु हे वास्तव सुधारित पैसेवारीमध्ये दुर्लक्षित करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. यंदा पावसाळ्यात १२० पैकी ५१ दिवस पावसाचे राहिले. जिल्हयात ६५९.४ मि.मि. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ७९१.६ मिमि असा १२० टक्‍के पाऊस बरसला. मेळघाट वगळता सर्व १२ तालुक्‍यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या परिणामी खरीप पिकांचे नुकसान झाले. 

तालुकानिहाय्य जाहीर पैसेवारी 
अमरावती : ४७ 
नांदगाव खंडेश्‍वर : ४८ 
भातकुली : ५३ 
तिवसा : ५४ 
चांदूररेल्वे : ५४ 
धामगावगाव रेल्वे : ५९ 
: ५६ 
वरुड : ५४ 
अचलपूर : ५२ 
चांदूर बाजार : ५२ 
दर्यापूर : ५३ 
अंजनगावसूर्जी : ५४ 
धारणी : ५८ 
चिखलदरा : ५५ 

English Headline: 
Agriculture News in Marathi Injustice on 1658 villages in Amravati with revised paisawari
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
प्रशासन administrations अमरावती मूग उडीद ऊस पाऊस सोयाबीन पैसेवारी paisewari मेळघाट melghat खरीप रेल्वे पूर floods
Search Functional Tags: 
प्रशासन, Administrations, अमरावती, मूग, उडीद, ऊस, पाऊस, सोयाबीन, पैसेवारी, paisewari, मेळघाट, Melghat, खरीप, रेल्वे, पूर, Floods
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Injustice on 1658 villages in Amravati with revised paisawari
Meta Description: 
Injustice on 1658 villages in Amravati with revised paisawari

संततधार पावसामुळे जिल्हयात तीन लाख हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. मात्र प्रशासनाकडून केवळ दोन तालुक्‍यातील आणेवारीच ५० पैशाच्या आत जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्‍त होत आहे. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X