Take a fresh look at your lifestyle.

‘अम्फान’ चक्रीवादळ निवळले; पश्‍चिम बंगालमध्ये कमी दाब क्षेत्र

0

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘अम्फान’ तीव्र चक्रीवादळाने बुधवारी (ता.२०) सायंकाळी पूर्व किनारपट्टीवरील सुंदरबनजवळ असलेल्या पश्‍चिम बंगालच्या दिघा आणि बांग्लादेशाच्या हातीयाजवळ धडकले. जमिनीवर येताच वादळाची तीव्रता कमी होत गेली. गुरूवारी (ता.२१) दुपारी या वादळ निवळून तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले होते. या प्रणालीच्या प्रभावामुळे आसाम मेघालयसह ईशान्य भारतातील राज्यात पाऊस पडत आहे.  

बंगालच्या उपसागरात शनिवारी (ता.१६) रात्री उशिरा ‘अम्फान’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. त्यानंतर उत्तरेकडे सरकणाऱ्या ही प्रणाली आणखी तीव्र होत सोमवारी (ता.१८) या प्रणालीचे महाचक्रीवादळात रूपांतर झाले. ताशी २२५ ते २६५ किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणारे हे वादळ वेगाने जमिनीकडे झेपावण्यास सुरुवात झाली. बुधवारी सायंकाळी हे वादळ १६५ ते १८५ किलोमीटर चक्राकार वाऱ्यासह किनाऱ्याला धडकले. यामुळे पूर्व किनारपट्टीवरील ओडीशा आणि पश्‍चिम बंगाल राज्यांना तडाखा बसला. 

जमिनीवर येताच वादळाची तीव्रता वेगाने कमी होऊ लागली. गुरूवारी सकाळी ८ वाजता वादळाचे केंद्र कोलकात्यापासून उत्तरेकडे २७० किलोमीटर अंतरावर होते. साडे ११ वाजण्याच्या सुमारास त्याचे कमी तीव्रतेच्या वादळात (डीप डिप्रेशन) तर त्यानंतर तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर होत गेले. वादळ निवळताच पूर्व आणि ईशान्य भारतातील ढगांचे आच्छादन हळूहळू विरळ होत गेले. पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय राज्यात गुरूवारी (ता.२१) दिवसभर हलक्या ते जोरदार पाऊस सुरू राहणार आहे. .

News Item ID: 
820-news_story-1590049754-684
Mobile Device Headline: 
‘अम्फान’ चक्रीवादळ निवळले; पश्‍चिम बंगालमध्ये कमी दाब क्षेत्र
Appearance Status Tags: 
Mukhya News
‘अम्फान’ चक्रीवादळ निवळले; पश्‍चिम बंगालमध्ये कमी दाब क्षेत्र‘अम्फान’ चक्रीवादळ निवळले; पश्‍चिम बंगालमध्ये कमी दाब क्षेत्र
Mobile Body: 

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘अम्फान’ तीव्र चक्रीवादळाने बुधवारी (ता.२०) सायंकाळी पूर्व किनारपट्टीवरील सुंदरबनजवळ असलेल्या पश्‍चिम बंगालच्या दिघा आणि बांग्लादेशाच्या हातीयाजवळ धडकले. जमिनीवर येताच वादळाची तीव्रता कमी होत गेली. गुरूवारी (ता.२१) दुपारी या वादळ निवळून तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले होते. या प्रणालीच्या प्रभावामुळे आसाम मेघालयसह ईशान्य भारतातील राज्यात पाऊस पडत आहे.  

बंगालच्या उपसागरात शनिवारी (ता.१६) रात्री उशिरा ‘अम्फान’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. त्यानंतर उत्तरेकडे सरकणाऱ्या ही प्रणाली आणखी तीव्र होत सोमवारी (ता.१८) या प्रणालीचे महाचक्रीवादळात रूपांतर झाले. ताशी २२५ ते २६५ किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणारे हे वादळ वेगाने जमिनीकडे झेपावण्यास सुरुवात झाली. बुधवारी सायंकाळी हे वादळ १६५ ते १८५ किलोमीटर चक्राकार वाऱ्यासह किनाऱ्याला धडकले. यामुळे पूर्व किनारपट्टीवरील ओडीशा आणि पश्‍चिम बंगाल राज्यांना तडाखा बसला. 

जमिनीवर येताच वादळाची तीव्रता वेगाने कमी होऊ लागली. गुरूवारी सकाळी ८ वाजता वादळाचे केंद्र कोलकात्यापासून उत्तरेकडे २७० किलोमीटर अंतरावर होते. साडे ११ वाजण्याच्या सुमारास त्याचे कमी तीव्रतेच्या वादळात (डीप डिप्रेशन) तर त्यानंतर तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर होत गेले. वादळ निवळताच पूर्व आणि ईशान्य भारतातील ढगांचे आच्छादन हळूहळू विरळ होत गेले. पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय राज्यात गुरूवारी (ता.२१) दिवसभर हलक्या ते जोरदार पाऊस सुरू राहणार आहे. .

English Headline: 
agriculture news in marathi Amphan cyclone weakens after landfall
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे किनारपट्टी पश्‍चिम बंगाल आसाम मेघालय ईशान्य भारत भारत ऊस पाऊस सकाळ सिक्कीम
Search Functional Tags: 
पुणे, किनारपट्टी, पश्‍चिम बंगाल, आसाम, मेघालय, ईशान्य भारत, भारत, ऊस, पाऊस, सकाळ, सिक्कीम
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Amphan cyclone weakens after landfall
Meta Description: 
Amphan cyclone weakens after landfall
बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘अम्फान’ तीव्र चक्रीवादळ जमिनीवर येताच त्याची तीव्रता कमी होत गेली. गुरूवारी (ता.२१) दुपारी या वादळ निवळून तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले होते.Source link

X