अरे व्वा लई भारी…!! आता शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे आपला शेतमाल विकता येणार; या सरकारी अँप्लिकेशनचा मिळणार फायदा - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

अरे व्वा लई भारी…!! आता शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे आपला शेतमाल विकता येणार; या सरकारी अँप्लिकेशनचा मिळणार फायदा

0
Rate this post

[ad_1]

Agriculture News: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. अशा परिस्थितीत आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील पूर्णपणे शेतीवर (Farming) अवलंबून आहे. त्यामुळे देशातील शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात (Farmer Income) भर पडली तेव्हाच अर्थव्यवस्थेमध्ये देखील गती पाहायला मिळते.

यामुळे देशातील शेतकरी बांधवांना (Farmer) शेती करताना अडचणींचा सामना करावा लागू नये तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळावा यासाठी शासन दरबारी (Government) अनेक उपाय-योजना कार्यान्वित केल्या जातात.

आपल्या देशातील शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाची योग्य किंमत मिळावी यासाठी केंद्र सरकारने ई-नाम योजना संपूर्ण देशात लागू केली आहे. शेतीमालाची खरेदी-विक्री शेतकर्‍यांच्या हितासाठी व्हावी यासाठी केंद्र सरकारने शेतकर्‍यांना नॅशनल अॅग्रिकल्चरल मार्केट (National Agricultural Market) म्हणजेच e-NAM या ऑनलाईन योजनेशी जोडले आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी e-NAM नावाचे एक ऑनलाइन पोर्टल आणि मोबाईल ऍप्लिकेशन देखील सुरू करण्यात आले आहे. या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकरी घरबसल्या शेतीमालाची किमत, खरेदी आणि विक्रीच्या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

आपल्या केंद्र सरकारने लाँच केलेल्या ई-नाम मोबाईल अॅपद्वारे, शेतकऱ्यांना कृषी बाजारपेठेतील सर्व पिकांच्या उत्पादनाची नवीन किंमत मिळते आणि उत्पादनाची बोली लावण्याची सुविधा देखील मिळते.

ई-नाम मोबाईल अॅप हिंदी, इंग्रजी, गुजराती, मराठी, तमिळ, तेलुगु, बांगला आणि ओरियासह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये देशातील अनेक शेतकरी जोडले गेले आहेत.

ई-नाम हे एक इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पोर्टल आहे, ज्याच्या मदतीने देशातील प्रत्येक लहान-मोठी बाजारपेठ जोडून एक संयुक्त नेटवर्क तयार करण्यात आले आहे. हे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी संयुक्त कृषी बाजारपेठ उपलब्ध करून देते, ज्यावर शेतकरी केवळ त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी बोली लावू शकत नाहीत, तर अंतिम बोलीची किंमत देखील बदलू शकतात.

e-NAM मोबाईल अॅप हे शेतकरी तसेच मंडी व्यापारी, ग्राहक, व्यापारी, कमिशन एजंट आणि शेतकरी उत्पादक संघटना यांचे संयुक्त व्यासपीठ आहे. त्यावर शेतमालाच्या विक्रीबरोबरच कृषी व्यवसायाशी संबंधित माहितीही देण्यात आली आहे. हे व्यासपीठ शेतकर्‍यांचे शोषणापासून संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळवून देण्यासाठी उपयुक्त आहे.

e-NAM मोबाईल ऍप्लिकेशनसह, e-NAM पोर्टलवर शेतकर्‍यांना पिकांची खरेदी आणि विक्री तसेच BHIM UPI द्वारे पेमेंट करण्याची सुविधा देखील आहे. यामुळेच या प्लॅटफॉर्मला वन नेशन वन मार्केट असे नाव देण्यात आले आहे, ज्यावर देशातील बहुतांश कृषी स्टेकहोल्डर्स एकत्र येतात आणि कृषी विपणन सुधारतात.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, आत्तापर्यंत भारतातील 18 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशातील 1260 मंडई e-NAM डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडल्या गेल्या आहेत. यामध्ये देशातील अधिकाधिक मंडई जोडण्याचे काम सुरू आहे, जेणेकरून देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी ई-कृषी बाजाराशी जोडले जातील.

सध्या ई-नाम पोर्टलवर 1.73 कोटींहून अधिक शेतकरी, 2.26 लाख व्यापारी आणि 21,77 शेतकरी उत्पादक संघटना आधीच नोंदणीकृत आहेत. याद्वारे आतापर्यंत अंदाजे 2 लाख कोटी रुपयांचा कृषी व्यवसाय यशस्वीपणे केला गेला आहे.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link