अर्धापूर भागात केळीवर रोटावेटर; रोग, दराने त्रासले शेतकरी

नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अर्धापूर भागातील केळीवर व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, केळीचे दर तीनशे रुपयांपर्यंत कोसळल्याने शेतकऱ्यांना काढणीला आलेल्या केळीवर रोटावेटर फिरवावा लागत आहे. आधी अतिवृष्टी, आता रोगाचा प्रादुर्भाव, तसेच वीजबिलाची सक्ती यामुळे शेतकरी सर्वच बाजूंनी अडचणीत सापडले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, नांदेड व भोकर तालुक्यात वीस ते 
पंचवीस हजार हेक्टरवर केळीची लागवड केली जाते. या भागात १९९५ मध्ये करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झाला. केळीच्या बागा रात्रीतून पिकून गेल्या होत्या. तेव्हापासून या भागात रोगाचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात होत असतो. दरम्यान, यंदा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा केळीवर व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. परिणामी, केळीची गुणवत्ता खालावल्याने व्यापारी केळी उचलायला तयार नाहीत. १५ ऑगस्टपूर्वी दीड हजारावर पोहोचलेला दर सध्या तीनशे ते चारशे रुपयांवर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लागवड खर्चही निघत नाही. परिणामी, अर्धापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी केळीचे घड कापून शेतात रोटावेटर चालवला आहे. या शेतात सध्या हरभरा किंवा गहू पेरण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. नवीन केळीच्या पिकावरही मोझॅकचा प्रादुर्भाव होत असल्याने केळी उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

प्रतिनिधी…
सध्या केळीला तीनशे ते चारशे रुपये भाव मिळत आहे. व्यापारी प्रतिक्विंटल साठ रुपये कमिशन घेतात. शेतातून एका झाडाची वाहतूक करण्यासाठी सात रुपये खर्च येतो. सध्या मिळणाऱ्या दरात लागवड खर्चही निघत नसल्याने केळी काढावी लागली. तर दुसरीकडे वीजबिलाच्या सक्तीने वसुली होत असल्याने अडचणीत भर पडली आहे.
– ज्ञानेश्‍वर माटे, अर्धापूर, जि. नांदेड

अतिवृष्टीमुळे १५ ऑगस्टनंतर केळीवर रोगांचा प्रादुर्भाव होऊन फळाची गुणवत्ता घसरली आहे. यामुळे खरेदीदार केळी उचलायला तयार नाहीत. परिणामी, दर मोठ्या प्रमाणात पडले आहेत. 
– नीलेश देशमुख, केळी अडतदार,  अर्धापूर, जि. नांदेड.

News Item ID: 
820-news_story-1637896072-awsecm-690
Mobile Device Headline: 
अर्धापूर भागात केळीवर रोटावेटर; रोग, दराने त्रासले शेतकरी
Appearance Status Tags: 
Tajya News
अर्धापूर भागात केळीवर रोटावेटर; रोग, दराने त्रासले शेतकरीअर्धापूर भागात केळीवर रोटावेटर; रोग, दराने त्रासले शेतकरी
Mobile Body: 

नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अर्धापूर भागातील केळीवर व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, केळीचे दर तीनशे रुपयांपर्यंत कोसळल्याने शेतकऱ्यांना काढणीला आलेल्या केळीवर रोटावेटर फिरवावा लागत आहे. आधी अतिवृष्टी, आता रोगाचा प्रादुर्भाव, तसेच वीजबिलाची सक्ती यामुळे शेतकरी सर्वच बाजूंनी अडचणीत सापडले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, नांदेड व भोकर तालुक्यात वीस ते 
पंचवीस हजार हेक्टरवर केळीची लागवड केली जाते. या भागात १९९५ मध्ये करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झाला. केळीच्या बागा रात्रीतून पिकून गेल्या होत्या. तेव्हापासून या भागात रोगाचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात होत असतो. दरम्यान, यंदा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा केळीवर व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. परिणामी, केळीची गुणवत्ता खालावल्याने व्यापारी केळी उचलायला तयार नाहीत. १५ ऑगस्टपूर्वी दीड हजारावर पोहोचलेला दर सध्या तीनशे ते चारशे रुपयांवर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लागवड खर्चही निघत नाही. परिणामी, अर्धापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी केळीचे घड कापून शेतात रोटावेटर चालवला आहे. या शेतात सध्या हरभरा किंवा गहू पेरण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. नवीन केळीच्या पिकावरही मोझॅकचा प्रादुर्भाव होत असल्याने केळी उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

प्रतिनिधी…
सध्या केळीला तीनशे ते चारशे रुपये भाव मिळत आहे. व्यापारी प्रतिक्विंटल साठ रुपये कमिशन घेतात. शेतातून एका झाडाची वाहतूक करण्यासाठी सात रुपये खर्च येतो. सध्या मिळणाऱ्या दरात लागवड खर्चही निघत नसल्याने केळी काढावी लागली. तर दुसरीकडे वीजबिलाच्या सक्तीने वसुली होत असल्याने अडचणीत भर पडली आहे.
– ज्ञानेश्‍वर माटे, अर्धापूर, जि. नांदेड

अतिवृष्टीमुळे १५ ऑगस्टनंतर केळीवर रोगांचा प्रादुर्भाव होऊन फळाची गुणवत्ता घसरली आहे. यामुळे खरेदीदार केळी उचलायला तयार नाहीत. परिणामी, दर मोठ्या प्रमाणात पडले आहेत. 
– नीलेश देशमुख, केळी अडतदार,  अर्धापूर, जि. नांदेड.

English Headline: 
agriculture news in marathi Rotavator on banana in Ardhapur area
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नांदेड nanded अतिवृष्टी पूर floods केळी banana व्यापार गहू wheat
Search Functional Tags: 
नांदेड, Nanded, अतिवृष्टी, पूर, Floods, केळी, Banana, व्यापार, गहू, wheat
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Rotavator on banana in Ardhapur area
Meta Description: 
Rotavator on banana in Ardhapur area
अर्धापूर भागातील केळीवर व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, केळीचे दर तीनशे रुपयांपर्यंत कोसळल्याने शेतकऱ्यांना काढणीला आलेल्या केळीवर रोटावेटर फिरवावा लागत आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X