अलिबागमध्ये ‘निसर्ग’ चक्रीवादळाची ‘लँड-फॉल’ होण्यास सुरुवात; ३ तास चालेल ही प्रक्रिया


अलिबाग अरबी समुद्रात रौद्र रूप धारण करत निसर्ग चक्रीवादळ आज दुपारी १ वाजता अलिबागजवळ धडकलंय. पुढच्या तीन तासात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल, असं भारतीय हवामान खात्याने म्हटलंय. सध्या कोकणात सर्वत्र सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे.  कोकण आणि गोव्यासह मुंबईतही अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. तर घरे कोसळल्याने मोठं नुकसान झालं आहे. 

१ वाजल्यापासून वादळाची लँड फॉल हेण्यास सुरुवात झाली असून, ही संपूर्ण प्रक्रिया ३ तासांची असेल. रायगड पार करून मुंबई आणि ठाण्याच्या भागाकडे वादळ सरकत जाईल. सध्या निसर्ग चक्रीवादळाचा जोर हा अलिबागमध्ये असून १२५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याचे कृष्णानंद होसाळीकर, महासंचालक प्रादेशिक विभाग, मुंबई यांनी सांगितलय. 

Previous article‘निसर्ग’ चक्रीवादळाचा रत्नागिरीला फटका, किनारपट्टीची दाणादाण!

Source link

Leave a Comment

X