अवकाळीचा फळपिकांना मोठा तडाखा

मागील आठवडाभरापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सांगली आणि नाशिकच्या द्राक्ष पट्ट्यात फुलोऱ्यात आलेल्या बागांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी फळकुज, मणीकुज होण्यासह डाऊनी, भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.  नाशिकमध्ये वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष घड तुटून पडले आहेत. सांगलीतील तासगाव पूर्व, मिरज पूर्व आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात काढणीला आलेला भात पाण्यात भिजला आहे. मराठवाडा आणि वऱ्हाडात तुरीच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर गळ होताना दिसत आहे.

नाशिकमध्ये वादळी वारे; द्राक्ष घड तुटून पडले

नाशिक : अस्मानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. शनिवारी (ता. २०) रोजी झालेल्या अवकाळी पावसाचा फलोत्पादन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. यात प्रामुख्याने जिल्ह्याच्या पूर्व भागात निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रात आली आहे. पावसाच्या तडाख्यात कोवळे घड तुटून पडल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.

निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील गोळेगाव, गुंजाळवाडी, हनुमाननगर या गावांमध्ये शनिवार (ता.२०) रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक, चांदवड, निफाड व दिंडोरी तालुक्यातील पावसाने द्राक्ष बागांमध्ये भुरी, डाऊनी, गळ, कुजीची समस्या निर्माण झाली आहे. 

मालेगाव तालुक्यातील मुंगसे परिसरात झालेल्या पावसामुळे फुलोरा अवस्थेतील फुलगळ झाल्याचे येथील शेतकरी मयूर सूर्यवंशी यांनी सांगितले. खरीप लाल कांद्यावर करपा व रसशोषक किडींचा मोठा प्रादुर्भाव अडचणींचा ठरत आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागातील भात उत्पादक पट्ट्यात  वादळ व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे सोंगणी केलेला भात पावसात भिजला. खाचरात पाणी साचले आहे.

 खर्चात वाढ; उत्पादनात येणार घट 
फुलोरा व मणी धारणा अवस्थेतील घड वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तुटून पडले आहेत. गोळेगाव परिसरात अधिक नुकसान आहे.  या पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळे हंगामातील खर्चात वाढ होईल, तर उत्पादनात मोठी घट येणार आहे, असे गोळेगाव(ता. निफाड) येथील द्राक्ष उत्पादक मोतीराम भास्कर मुदगुल यांनी सांगितले.

फुलोऱ्यातील बागांमध्ये घडकूज
सांगली ः जिल्ह्याचे नगदी पीक समजल्या जाणाऱ्या द्राक्ष शेतीवर सध्‍याच्या बदलत्या हवामानाचा प्रतिकूल परिणाम होत आहे. जिल्ह्यात आठवडाभर सलग ढगाळ हवामान आणि पावसामुळे द्राक्षबागांवर मोठ्या प्रमाणावर डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. फुलोऱ्यावरील बागांमध्ये फळकूज झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे २५ ते ३० हजार एकरांवरील बागांचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांवर संकट आले आहे.

गत वर्षीच्या हंगामात आगाप पीक छाटणी घेतलेल्या बागांचे खराब हवामानाने नुकसान झाले होते. त्यामुळे या वर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी आगाप छाटणी घेतली नाही. जिल्ह्यात १ लाख २५ हजार एकरांवर द्राक्षबागा आहेत. सध्‍या ६० टक्क्यांहून अधिक द्राक्षबागा फुलोऱ्यात आहेत. जिल्ह्यात आठ दिवसांपासून ढगाळ हवामानासह पाऊस सुरू आहे. त्यामुळे फुलोरा अवस्थेतील, तसेच एक नोव्हेंबरपर्यंत पीक छाटणी घेतलेल्या बागांना मोठा फटका बसला आहे.

पावसामुळे २५ दिवसांच्या आतील द्राक्षबागांवर डाऊनीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. ३२ ते ४५ दिवसांत असलेल्या द्राक्षबागांमध्ये फळकूज-मणीकूज मोठ्या प्रमाणावर होत आहे. यातून द्राक्ष पीक वाचवायचे कसे? अशी चिंता आता द्राक्ष बागायतदारांना भेडसावत आहे. सततच्या खराब हवामानामुळे द्राक्ष घडांची कूज, मणीगळ झाली आहे. 

छाटणीनंतर हवामान बदलल्याने या वर्षीच्या हंगामावर नुकसानीची टांगती तलवार कायम आहे. दुसरीकडे बागेत एचटीपी आणि औषध फवारणीचे आवाज घुमू लागले आहेत. दिवसांतून दोन-दोन स्प्रे घेऊन डाऊनी आटोक्यात आणण्याचा, फळकुजीपासून वाचण्याचा प्रयत्न द्राक्ष बागायतदारांचा सुरू आहे. आतापर्यंत २५ ते ३० हजार एकरांवरील द्राक्षबागांचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया
अवकाळी पावसाने गळ आणि कूज होऊ लागली आहे. परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. या अवकाळीमुळे माझ्या बागेतील १० ते २०टक्के उत्पादन कमी होईल, असे दिसते आहे.
-सुभाष चव्हाण, मणेराजुरी, ता. तासगाव

ढगाळ वातावरणामुळे तुरीची फूलगळ
अकोला ः गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण आहे. मागील दोन दिवस काही भागात अवकाळी पाऊसही झाला. यामुळे प्रामुख्याने फुलोरावस्थेत असलेल्या तुरीच्या पिकाला फटका बसण्याची चिन्हे आहेत.

या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मूग, उडीद, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. आता खरिपातील तुरीचे पीक शेतांमध्ये उभे आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने तुरीला मोठा फायदा झाला होता. सर्वत्र हे पीक फुलोऱ्यात आहे. त्यामुळे शेतशिवारे पिवळी दिसू लागली. यंदा तुरीचे चांगले उत्पादन येईल, अशी शक्यता शेतकरी वर्तवित होते. काही भागात तुरीच्या शेंगासुद्धा धरत आहेत. अशा स्थितीत गेल्या चार-पाच दिवसांत बदललेल्या वातावरणाचा मोठा परिणाम दिसू लागला आहे.

फुलगळतीला सुरुवात झाली. अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. शेंगा लागलेल्या झाडांवर किडीची संख्या अधिक बघायला मिळते आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या सोबतच जोराचा वाराही वाहिला. परिणामी फुलगळ झाली. कीड वाढल्याने शेतकरी प्रतिबंधासाठी विविध औषधांची फवारणी करीत आहेत. 

सुरुवातीच्या टप्प्यात अतिपावसाने तुरीच्या पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यातून राहिलेले पीक आता फुलोऱ्यात आहे. आधी मूग, उडीद, सोयाबीन पिकांनी नुकसान केले असतानाच आता खरिपातील तुरीवरील अपेक्षा टिकून आहेत.
 
News Item ID: 
820-news_story-1637592649-awsecm-170
Mobile Device Headline: 
अवकाळीचा फळपिकांना मोठा तडाखा
Appearance Status Tags: 
Mukhya News
Big blow to untimely fruit cropsBig blow to untimely fruit crops
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture News in Marathi Big blow to untimely fruit crops
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सांगली sangli द्राक्ष तासगाव नाशिक nashik निफाड niphad मालेगाव malegaon खरीप शेती farming हवामान मात mate आग ऊस पाऊस औषध drug अवकाळी पाऊस अतिवृष्टी मूग उडीद सोयाबीन मर रोग damping off
Search Functional Tags: 
सांगली, Sangli, द्राक्ष, तासगाव, नाशिक, Nashik, निफाड, Niphad, मालेगाव, Malegaon, खरीप, शेती, farming, हवामान, मात, mate, आग, ऊस, पाऊस, औषध, drug, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, मूग, उडीद, सोयाबीन, मर रोग, damping off
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Big blow to untimely fruit crops
Meta Description: 
Big blow to untimely fruit crops
मागील आठवडाभरापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सांगली आणि नाशिकच्या द्राक्ष पट्ट्यात फुलोऱ्यात आलेल्या बागांचे मोठे नुकसान होत आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X