अवकाळीची द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली धास्ती

नाशिक : जिल्ह्याच्या अनेक भागांत बुधवारी (ता.१७) झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील भात, सोयाबीन ही पिके पावसात भिजली आहेत. तर काढणीस आलेला खरीप लाल कांदा व उन्हाळा कांदा रोपवाटिकांचे या पावसामुळे नुकसान झाले आहे. तर द्राक्ष छाटण्या झालेल्या ज्या बागा फुलोरा अवस्थेत आहेत तेथे गळकुजीची समस्या दिसून येत आहे. ढगाळ वातावरण कायम असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या पावसाची धास्ती घेतली आहे.

विविध भागांत दुपारनंतर झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. इगतपुरी, पेठ व सुरगाणा परिसरातं भात सोंगण्या होऊन पेंढ्या खळ्यावर पडलेल्या होत्या. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे भिजल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची साळ झोडण्याच्या कामात अडचणी येणार आहेत. 

चांदवड, निफाड, देवळा तालुक्यांतील अनेक भागांत अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. द्राक्ष उत्पादक पट्ट्यात ज्या द्राक्ष बागा फुलोरा अवस्थेत आहेत. त्यांच्यामध्ये डाऊनी आणि कूज यांचा धोका वाढला आहे. फुलोरा अवस्था संवेदनशील असल्याने त्याचा धोका संभवत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर काही भागात गळकूज होण्याच्या समस्येने डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा पीक संरक्षण खर्चात वाढ होणार आहे. फुलोरा अवस्थेतील घडांमध्ये पाणी साचून कूज होत असल्याची दिसून येत आहे. कसमादे भागातील पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादक पट्ट्यात माल सध्या तयार आहेत. सलग दोन वर्षे मोठे नुकसान सोसल्याने येथील शेतकऱ्यांनी या पावसाचा धसका घेतला आहे. 

जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या कांदा पिकाला पावसाचा फटका बसला आहे. चांदवड तालुक्यात उत्तर दक्षिण भागात काढणीसाठी आलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी खरीप कांदा काढणीस आलेला आहे तो भिजून नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. आगामी उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी बियाणे रोपे टाकली होती. मात्र यापूर्वी ती अतिवृष्टीमुळे वाया गेली. तर पुन्हा टाकलेली रोपे तयार करण्याची लगबग सुरू असताना पुन्हा कांदा रोपवाटिका त्यांना फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आली आहे. येवला, सिन्नर, दिंडोरी तालुक्यांत तुरळक पाऊस झाला. कळवण तालुक्यात झालेल्या पावसामुळे कांदा रोपे बाधित होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर सटाणा, नांदगाव, मालेगाव तालुक्यात ढगाळ वातावरण होते. 

News Item ID: 
820-news_story-1637239424-awsecm-446
Mobile Device Headline: 
अवकाळीची द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली धास्ती
Appearance Status Tags: 
Section News
Fear of untimely grape growersFear of untimely grape growers
Mobile Body: 

नाशिक : जिल्ह्याच्या अनेक भागांत बुधवारी (ता.१७) झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील भात, सोयाबीन ही पिके पावसात भिजली आहेत. तर काढणीस आलेला खरीप लाल कांदा व उन्हाळा कांदा रोपवाटिकांचे या पावसामुळे नुकसान झाले आहे. तर द्राक्ष छाटण्या झालेल्या ज्या बागा फुलोरा अवस्थेत आहेत तेथे गळकुजीची समस्या दिसून येत आहे. ढगाळ वातावरण कायम असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या पावसाची धास्ती घेतली आहे. 

विविध भागांत दुपारनंतर झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. इगतपुरी, पेठ व सुरगाणा परिसरातं भात सोंगण्या होऊन पेंढ्या खळ्यावर पडलेल्या होत्या. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे भिजल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची साळ झोडण्याच्या कामात अडचणी येणार आहेत. 

चांदवड, निफाड, देवळा तालुक्यांतील अनेक भागांत अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. द्राक्ष उत्पादक पट्ट्यात ज्या द्राक्ष बागा फुलोरा अवस्थेत आहेत. त्यांच्यामध्ये डाऊनी आणि कूज यांचा धोका वाढला आहे. फुलोरा अवस्था संवेदनशील असल्याने त्याचा धोका संभवत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर काही भागात गळकूज होण्याच्या समस्येने डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा पीक संरक्षण खर्चात वाढ होणार आहे. फुलोरा अवस्थेतील घडांमध्ये पाणी साचून कूज होत असल्याची दिसून येत आहे. कसमादे भागातील पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादक पट्ट्यात माल सध्या तयार आहेत. सलग दोन वर्षे मोठे नुकसान सोसल्याने येथील शेतकऱ्यांनी या पावसाचा धसका घेतला आहे. 

जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या कांदा पिकाला पावसाचा फटका बसला आहे. चांदवड तालुक्यात उत्तर दक्षिण भागात काढणीसाठी आलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी खरीप कांदा काढणीस आलेला आहे तो भिजून नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. आगामी उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी बियाणे रोपे टाकली होती. मात्र यापूर्वी ती अतिवृष्टीमुळे वाया गेली. तर पुन्हा टाकलेली रोपे तयार करण्याची लगबग सुरू असताना पुन्हा कांदा रोपवाटिका त्यांना फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आली आहे. येवला, सिन्नर, दिंडोरी तालुक्यांत तुरळक पाऊस झाला. कळवण तालुक्यात झालेल्या पावसामुळे कांदा रोपे बाधित होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर सटाणा, नांदगाव, मालेगाव तालुक्यात ढगाळ वातावरण होते. 

English Headline: 
agriclture news in marathi,Fear of untimely grape growers
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
खरीप सोयाबीन द्राक्ष मात mate निफाड niphad आग अतिवृष्टी ऊस पाऊस मालेगाव malegaon
Search Functional Tags: 
खरीप, सोयाबीन, द्राक्ष, मात, mate, निफाड, Niphad, आग, अतिवृष्टी, ऊस, पाऊस, मालेगाव, Malegaon
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Fear of untimely grape growers
Meta Description: 
Fear of untimely grape growers
नाशिक : जिल्ह्याच्या अनेक भागांत बुधवारी (ता.१७) झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील भात, सोयाबीन ही पिके पावसात भिजली आहेत. तर काढणीस आलेला खरीप लाल कांदा व उन्हाळा कांदा रोपवाटिकांचे या पावसामुळे नुकसान झाले आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X