आंबिया बहराच्या फळपीक विमा नोंदणीला सुरुवात

पुणे ः राज्यात आंबिया बहरासाठी फळ पीकविमा योजनेत सहभाग घेण्याकरिता शेतकऱ्यांकडून नोंदणी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. अवेळी पाऊस, जादा तापमान, अतिपाऊस किंवा गारपिटीपासून फळपिकांना विमा संरक्षण मिळवण्याची सुविधा या योजनेत आहे. आंबिया बहराच्या विमा योजनेत डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी ही पिके असतील.  

राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिसूचित क्षेत्र व अधिसूचित फळांची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयास भेट द्यावी. एक शेतकरी एकापेक्षा जास्त फळबागांसाठीदेखील या योजनेत भाग घेऊ शकतात. मात्र त्या फळासाठी संबंधित मंडळ अधिसूचित आहे की नाही याची खात्री शेतकऱ्यांना करावी लागेल. एक शेतकरी चार हेक्टरच्या मर्यादेपर्यंत विमा संरक्षण मिळवू शकतो. विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता ठेवला जातो. 

त्यापेक्षा जास्त हप्ता असल्यास केंद्र व राज्याकडून अनुदान दिले जाते. मात्र, असा हप्ता ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्याला पाच टक्क्यांपेक्षा जादा विमाहप्ता भरावा लागणार आहे. कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठीदेखील ही योजना ऐच्छिक असेल. बिगर कर्जदारांना सहभाग घ्यायचा असल्यास आधार ओळखपत्र, सातबारा, आठ अ उतारा, पीक लागवडीचे स्वयंघोषणापत्र, फळबागेचा अंक्षाश-रेखांश (टॅगिंग) चिन्हांकित केलेले छायाचित्र, ब‌ँकेचे खातेपुस्तक अशी माहिती गोळा करावी. ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा गावातील सार्वजनिक सुविधा केंद्रात (सीएससी सेंटर) उपलब्ध आहे.

अशी करावी नोंदणी…
केंद्र सरकारच्या https://pmfby.gov.in संकेतस्थळावर विमा नोंदणी करता येईल. तसेच विविध प्रकारची ई-सेवा केंद्रे, बँकांमार्फतदेखील सहभाग नोंदवता येईल. कृषी विभागाच्या http://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विमा कंपन्या व जिल्हे, कंपन्यांच्या तालुका प्रतिनिधींची नावे व संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

News Item ID: 
820-news_story-1635339829-awsecm-945
Mobile Device Headline: 
आंबिया बहराच्या फळपीक विमा नोंदणीला सुरुवात
Appearance Status Tags: 
Mukhya News
Commencement of Ambia Deaf Fruit Crop Insurance RegistrationCommencement of Ambia Deaf Fruit Crop Insurance Registration
Mobile Body: 

पुणे ः राज्यात आंबिया बहरासाठी फळ पीकविमा योजनेत सहभाग घेण्याकरिता शेतकऱ्यांकडून नोंदणी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. अवेळी पाऊस, जादा तापमान, अतिपाऊस किंवा गारपिटीपासून फळपिकांना विमा संरक्षण मिळवण्याची सुविधा या योजनेत आहे. आंबिया बहराच्या विमा योजनेत डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी ही पिके असतील.  

राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिसूचित क्षेत्र व अधिसूचित फळांची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयास भेट द्यावी. एक शेतकरी एकापेक्षा जास्त फळबागांसाठीदेखील या योजनेत भाग घेऊ शकतात. मात्र त्या फळासाठी संबंधित मंडळ अधिसूचित आहे की नाही याची खात्री शेतकऱ्यांना करावी लागेल. एक शेतकरी चार हेक्टरच्या मर्यादेपर्यंत विमा संरक्षण मिळवू शकतो. विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता ठेवला जातो. 

त्यापेक्षा जास्त हप्ता असल्यास केंद्र व राज्याकडून अनुदान दिले जाते. मात्र, असा हप्ता ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्याला पाच टक्क्यांपेक्षा जादा विमाहप्ता भरावा लागणार आहे. कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठीदेखील ही योजना ऐच्छिक असेल. बिगर कर्जदारांना सहभाग घ्यायचा असल्यास आधार ओळखपत्र, सातबारा, आठ अ उतारा, पीक लागवडीचे स्वयंघोषणापत्र, फळबागेचा अंक्षाश-रेखांश (टॅगिंग) चिन्हांकित केलेले छायाचित्र, ब‌ँकेचे खातेपुस्तक अशी माहिती गोळा करावी. ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा गावातील सार्वजनिक सुविधा केंद्रात (सीएससी सेंटर) उपलब्ध आहे.

अशी करावी नोंदणी…
केंद्र सरकारच्या https://pmfby.gov.in संकेतस्थळावर विमा नोंदणी करता येईल. तसेच विविध प्रकारची ई-सेवा केंद्रे, बँकांमार्फतदेखील सहभाग नोंदवता येईल. कृषी विभागाच्या http://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विमा कंपन्या व जिल्हे, कंपन्यांच्या तालुका प्रतिनिधींची नावे व संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

English Headline: 
Agriculture news in Marathi Commencement of Ambia Deaf Fruit Crop Insurance Registration
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे ऊस पाऊस डाळ डाळिंब द्राक्ष पपई papaya फळबाग horticulture रेखा कृषी विभाग agriculture department विभाग sections maharashtra
Search Functional Tags: 
पुणे, ऊस, पाऊस, डाळ, डाळिंब, द्राक्ष, पपई, papaya, फळबाग, Horticulture, रेखा, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, maharashtra
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Commencement of Ambia Deaf Fruit Crop Insurance Registration
Meta Description: 
Commencement of Ambia Deaf Fruit Crop Insurance Registration
राज्यात आंबिया बहरासाठी फळ पीकविमा योजनेत सहभाग घेण्याकरिता शेतकऱ्यांकडून नोंदणी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. अवेळी पाऊस, जादा तापमान, अतिपाऊस किंवा गारपिटीपासून फळपिकांना विमा संरक्षण मिळवण्याची सुविधा या योजनेत आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X