आता प्रत्येक राज्यात ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’; कशी लागू होणार ही योजना…? वाचा!


नवी दिल्ली।पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटी रुपयांच्या ‘स्वावलंबी भारत अभियान’ पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज (१४ मे) दुसऱ्या पत्रकार परिषदेत या पॅकेजची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी देशातील गरिबांसाठी ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील कानाकोपऱ्यात गरीब कोणत्याही दुकानातून आपल्या वाट्याचे (One Nation One Ration Card) धान्य घेऊ शकणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या, “प्रत्येक राज्यात ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना लागू होणार आहे. या योजनेचा लाभ २३ राज्यातील ६७ कोटी लोकांना होईल. या योजनेच्या यामाध्यमातून गरिबांना कोणत्याही राज्यातील रेशन दुकानातून रेशन घेता येणार आहे.” सध्या देशात रेशन कार्डसंबंधी वेगळे नियम आहेत. रेशन कार्ड ज्या भागातील असेल त्याच भागातील रेशन दुकानातून संबंधित रेशन कार्ड धारकाला धान्य विकत घेता येते. इतर कुठल्याही भागातून त्या रेशन कार्डवर धान्य घेता येत नव्हते. मात्र, ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना लागू झाल्यावर देशातील कुठल्याही रेशन दुकानातून कुठल्याही रेशन कार्ड धारकाला धान्य मिळणार आहे. (One Nation One Ration Card).

यावेळी निर्मला सीतारामण यांनी, प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांपर्यंत रेशन मोफत मिळणार असल्याचे सांगितले. तसेच, ज्यांच्याकडे कार्ड नाही त्यांनाही ५किलो गहू, तांदूळ आणि एक किलो चना डाळ मिळणार आहे. ८ कोटी मजुरांना याचा फायदा होणार आहे. त्यासोबत अर्थमंत्रालयातून मजुरांच्या रेशनसाठी ३०० कोटी रुपये देण्यात येणार आहे. हा सर्व खर्च केंद्र सरकार करणार असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं.Source link

Leave a Comment

X