Take a fresh look at your lifestyle.

आधी भुरट्या शिवभक्त आणि शिवकन्यांच्या टिऱ्या सुजवाय पाहिजेत…!

0


Shivaji maharaj – image by Amazon

शिवाजी महाराज स्वतःमध्ये शोधा

सगळ्यात आधी भुरट्या शिवभक्त आणि शिवकन्यांच्या टिऱ्या सुजवाय पाहिजेत. अरे शिवाजी काळजात असावा लागतो. वागण्यात असावा लागतो. छातीवर शिवाजीचा फोटो लावून शिवाजी छाताडात पेरता येत नसतो. नावाच्या आधी शिवभक्त लावलं म्हणून शिवरायांचा मावळा होता येत नसतं. शिवाजी वाचला पाहिजे. शिवाजी समजला पाहिजे. शिवाजी जगला पाहिजे. छत्रपतींच्या अंतरंगात डोकून पाहिलं पाहिजे. महाराजांना स्वतःमध्ये मुरवता आलं पाहिजे. मग तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हा राजा कोण होता, ते समजेल.

दुर्देवाने आज छत्रपतींच्या नावाचा फक्त राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणासाठीच वापर होतोय. पण, तुम्हा बाजारबुणग्याना तरी काय म्हणावं ? तुमच्यासाठी शिवाजी महाराज म्हणजे फक्त ब्रँड आहे ब्रँड. कॉलर टाईट करुन समाजात वावरण्याचा ब्रँड. दाढी वाढवून मिशीवर ताव मारण्याचा ब्रँड. गाडीवर स्टिकर लावून हिंडण्याचा ब्रँड. भगवा झेंडा मिरवण्याचा ब्रँड. पण, शिवबा कुठला ब्रँड नाही तर स्वराज्याचा आत्मा आहे याचं भान राखा.

बोटात शिवमुद्रेची अंगठी घातली म्हणजे मी शिवभक्त? कपाळावर चंद्रकोर चिकटवली म्हणजे मी शिवभक्त? शर्टावर जय शिवरायाचं लेबल लावल म्हणजे मी शिवभक्त? फेसबुक, व्हॉटस्अपवर शिवरायांचा डीपी लावला म्हणजे मी शिवभक्त?

अरे बहाद्दरांनो तलवारीसोबत फोटो काढून मावळा होता येत नसतं. त्यासाठी शिवाजी महाराजांचा त्याग कोळून प्यायचा असतोय. शिवाजी आचरणात, वागण्या- बोलण्यात आणायचा असतोय. हात जोडून विनंती करतो, स्वतःमध्ये शिवबा शोधता येत नसेल तर शिवभक्त, शिवकन्या असल्याचा आव आणू नका. स्वराज्यासाठी रक्ताचं पाणी करणाऱ्या महाराजांची उंची कमी नका करु.

जे स्वतःमध्ये शिवराय शोधतात त्यांच्यासमोर सदैवच नतमस्तक – नितीन थोरातSource link

X