आयात उडदाला ग्राहक मिळेना 

पुणे : देशात यंदा उडीद उत्पादनात घट झाली मात्र सरकारने आयातीला घातलेल्या पायघड्या आणि साठा मर्यादेमुळे बाजार दबावात होता. सध्या स्थानिक आणि म्यानमारमधून आयात केलेल्या उडदाला मागणी कमी आहे. त्यामुळे आयात उडीद खर्चापेक्षा १०० ते २०० रुपयांनी कमी दरात देण्याची तयारी दर्शविल्यानंतरही मागणी नसल्याचे जाणकारांनी सांगितले. सरकारच्या निर्णयाने सुरुवातीला शेतकरी आणि आयातदारही अडचणीत आल्याची चर्चा सध्या बाजारात सुरू आहे. 

देशातील शेतकऱ्यांचा उडीद बाजारात येण्याच्या आधीच जून महिन्यात केंद्र सरकारने म्यानमारमधून प्रत्येक वर्षी अडीच लाख टन याप्रमाणे पुढील पाच वर्षांत साडेबारा लाख टन उडीद आयातीला परवानगी दिली होती. कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भरतेचा नारा देणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांचा विचार न करता आयातीला पायघड्या घातल्या. सोबतच कडधान्यावर साठा मर्यादाही लादली. परिणामी, शेतकऱ्यांना बाजारात कमी दर मिळाला. बाजार दबावातच राहिला. उडीद पिकाचे नुकसान होऊन उत्पादन कमी झाल्यानंतरही दर हमीभावाच्या जवळपास होते. आयातदारांनीही मोठ्या प्रमाणात उडीद आयात होऊन त्याचा दबाव देशांतर्गत बाजारावर आला. परिणामी, दर दबावातच राहिले. म्हणून आयातदारांनाही आता दरासाठी झगडावे लागत आहे. त्यांना अपेक्षेपेक्षा कमी दरात उडीद विकावा लागत आहे. 

देशांतर्गत बाजारात सध्या उडदाची मागणी आणि दर स्थिर आहेत. त्यामुळे उडीद आयातदार अडचणीत सापडले आहेत. बाजारात उडदाचे दर हमीभावाच्या दरम्यान आहेत. तर देशात अनेक ठिकाणी दर हमीभावाच्याही खाली होते. आयात होणाऱ्या मालामुळे देशांतर्गत दरावर दबाव निर्माण झाला होता. देशातील उडीद दबावात राहिल्यानंतर त्याचा थेट परिणाम आयात होणाऱ्या उडदावरही होत आहे. 

देशातील आयातदारांनी म्यानमारमधून उडीद आयातीचे मोठे सौदे केले. तसेच उडदाची येथून नियमित आयात होत आहे. आयात उडीद मोठ्या प्रमाणात चेन्नई येथील बंदरावर दाखल होत असून, येथे खरेदीदारांचा अभाव जाणवत आहे. सणासुदीच्या काळातही कडधान्याला मागणी नसल्याने बाजार सुस्त आहे. मोठी तेजी-मंदी नसल्याने व्यापारी हात राखूनच व्यवहार करताना दिसत आहेत. त्यामुळे आयातदारांना कमी दरात माल विकावा लागत आहे. देशांतर्गत उडदाच्या दरामुळे आयात सौदे फसल्याने रोख रकमेचाही सामना आयातदारांना करावा लागत असल्याचे जाणकारांनी सांगितले. 

बंदरावर जहाजातून उडीद उतरवणेही कठीण होत आहे. त्यामुळे आयातदार आयात खर्चापेक्षा १०० ते २०० रुपये कमी दराने माल विकण्याचा प्रयत्न करत आहेत. बाजारातील जाणकारांच्या मते ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कडधान्याच्या दरात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता आहे. यंदा देशांतर्गत उडीद उत्पादनात प्रतिकूल हवामानामुळे घट आली होती. मात्र हंगामातील माल बाजारात लगेच दाखल झाला. तसेच निर्यातदार म्यानमारमध्ये उडदाची मागणी कमी होती. परिणामी, येथून निर्यात होत आहे. लग्नसराईच्या दिवसांत उडदाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. 

उडीद बाजारातील स्थिती 

 • देशातील उत्पादन हाती येण्याच्या आधीच आयातीला परवानगी 
 • देशांतर्गत उत्पादनात घट येऊनही दर दबावात 
 • अनेक ठिकाणी दर हमीभावाच्या खाली 
 • दर हमीभावाच्या जवळपास असताना आयात वाढली 
 • आयात मालामुळे दरावर दबाव 
 • बंदरावरील मालाला खरेदीदार मिळेना 

प्रतिक्रिया 
म्यानमारमधून उडदाची आयात नियमित होत आहे. आधीच देशांतर्गत दर दबावात होते. त्यातच आयात मालामुळे दरवाढीला ब्रेक लागला. त्यातच स्थानिक मालही हमीभावाच्या दरम्यान मिळत असल्याने आयात मालाचा उठाव कमी होत आहे. त्यामुळे आयात खर्चाच्या तुलनेत १०० ते २०० रुपयांपर्यंत स्वस्त माल देऊनही ग्राहक मिळत नाही. 
– राहुल चौहान, शेतीमाल बाजार विश्‍लेषक, नवी दिल्ली 

News Item ID: 
820-news_story-1636657495-awsecm-495
Mobile Device Headline: 
आयात उडदाला ग्राहक मिळेना 
Appearance Status Tags: 
Section News
आयात उडदाला ग्राहक मिळेना आयात उडदाला ग्राहक मिळेना 
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi No consumer for imported Urud
वृत्तसेवा
Author Type: 
Agency
उडीद पुणे वर्षा varsha कडधान्य हमीभाव minimum support price चेन्नई व्यापार सामना face हवामान शेती farming
Search Functional Tags: 
उडीद, पुणे, वर्षा, Varsha, कडधान्य, हमीभाव, Minimum Support Price, चेन्नई, व्यापार, सामना, face, हवामान, शेती, farming
Twitter Publish: 
Meta Keyword: 
No consumer for imported Urud
Meta Description: 
No consumer for imported Urud
देशात यंदा उडीद उत्पादनात घट झाली मात्र सरकारने आयातीला घातलेल्या पायघड्या आणि साठा मर्यादेमुळे बाजार दबावात होता. सध्या स्थानिक आणि म्यानमारमधून आयात केलेल्या उडदाला मागणी कमी आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X