इंदापुरात पावसामुळे द्राक्ष उत्पादक संकटात

पुणे : बदललेल्या वातावरणामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. काही ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे द्राक्षे बागांचे चांगलेच नुकसान होत आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार चांगलाच अडचणीत आला आहे. परिणामी, नुकसानग्रस्त शेतकरी भरपाई देण्याची मागणी करीत आहेत.

इंदापूर शहर व परिसरात रविवारी (ता.१४) अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्याचा फटका इंदापूर, तरंगवाडी, गोखळी परिसरातील शेतकऱ्यांना बसला. दोन वर्षे कोरोनामुळे सर्व बाजारपेठा बंद राहिल्या. शेतीमालाला योग्य दर मिळत नव्हता. त्यात आता अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे आणि पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जमिनीची माती वाहून गेली.

नुकसानीनंतर झालेल्या पंचनाम्याची रक्कम अजूनही मिळालेली नाही. तरीही सर्व संकटांचा सामना करत शेतकऱ्यांनी पुन्हा नव्या उमेदीने फळ पिके घेण्यास सुरुवात केली. परंतु आता मात्र या हवामान बदलामुळे द्राक्ष पिकांचे सर्वांत जास्त नुकसान होत आहे.

सकाळी ढगाळ हवामान असते. कधी ऊन पडते, तर कधी सरी बरसतात. पावसाच्या भीतीने काही शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर प्लॅस्टिक कागद अंथरले आहेत. हाता तोंडाशी आलेला घास जाऊ नये म्हणून औषध फवारणी करावी लागत आहे. औषध फवारणीचा खर्च जास्त होत आहे. त्यामुळे द्राक्ष पीक घेणारे शेतकरी हतबल झाले आहेत.

तरंगवाडी येथील देविदास पुणेकर यांनी अडीच एकर क्षेत्रात द्राक्ष लागवड केली आहे. रविवारी (ता.१४) सायंकाळी झालेल्या पावसामुळे त्यांच्या द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. 

पुणेकर म्हणाले, ‘‘गेल्या दहा-बारा वर्षांपासून द्राक्षशेती करत आहे. यंदा ही द्राक्ष बागेसाठी जवळपास चार ते पाच लाख रुपये खर्च केला. या आठवड्यात बागेत व्यापारी येणार होते. मात्र रविवारच्या पावसाने घात केला. द्राक्षांच्या घडात पावसाचे पाणी शिरल्याने द्राक्षाला तडे पडले आहेत. सकाळपासून हे घड काढून फेकत आहे. जवळपास २० ते २५ टक्के नुकसान झाले. शासनाने नुकसानीची पाहणी करावी. पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई लवकर द्यावी.’’
 
News Item ID: 
820-news_story-1637240418-awsecm-239
Mobile Device Headline: 
इंदापुरात पावसामुळे द्राक्ष उत्पादक संकटात
Appearance Status Tags: 
Section News
Due to rain in Indapur Grape growers in crisisDue to rain in Indapur Grape growers in crisis
Mobile Body: 

पुणे : बदललेल्या वातावरणामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. काही ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे द्राक्षे बागांचे चांगलेच नुकसान होत आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार चांगलाच अडचणीत आला आहे. परिणामी, नुकसानग्रस्त शेतकरी भरपाई देण्याची मागणी करीत आहेत.

इंदापूर शहर व परिसरात रविवारी (ता.१४) अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्याचा फटका इंदापूर, तरंगवाडी, गोखळी परिसरातील शेतकऱ्यांना बसला. दोन वर्षे कोरोनामुळे सर्व बाजारपेठा बंद राहिल्या. शेतीमालाला योग्य दर मिळत नव्हता. त्यात आता अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे आणि पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जमिनीची माती वाहून गेली.

नुकसानीनंतर झालेल्या पंचनाम्याची रक्कम अजूनही मिळालेली नाही. तरीही सर्व संकटांचा सामना करत शेतकऱ्यांनी पुन्हा नव्या उमेदीने फळ पिके घेण्यास सुरुवात केली. परंतु आता मात्र या हवामान बदलामुळे द्राक्ष पिकांचे सर्वांत जास्त नुकसान होत आहे.

सकाळी ढगाळ हवामान असते. कधी ऊन पडते, तर कधी सरी बरसतात. पावसाच्या भीतीने काही शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर प्लॅस्टिक कागद अंथरले आहेत. हाता तोंडाशी आलेला घास जाऊ नये म्हणून औषध फवारणी करावी लागत आहे. औषध फवारणीचा खर्च जास्त होत आहे. त्यामुळे द्राक्ष पीक घेणारे शेतकरी हतबल झाले आहेत.

तरंगवाडी येथील देविदास पुणेकर यांनी अडीच एकर क्षेत्रात द्राक्ष लागवड केली आहे. रविवारी (ता.१४) सायंकाळी झालेल्या पावसामुळे त्यांच्या द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. 

पुणेकर म्हणाले, ‘‘गेल्या दहा-बारा वर्षांपासून द्राक्षशेती करत आहे. यंदा ही द्राक्ष बागेसाठी जवळपास चार ते पाच लाख रुपये खर्च केला. या आठवड्यात बागेत व्यापारी येणार होते. मात्र रविवारच्या पावसाने घात केला. द्राक्षांच्या घडात पावसाचे पाणी शिरल्याने द्राक्षाला तडे पडले आहेत. सकाळपासून हे घड काढून फेकत आहे. जवळपास २० ते २५ टक्के नुकसान झाले. शासनाने नुकसानीची पाहणी करावी. पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई लवकर द्यावी.’’
 
English Headline: 
Agriculture news in marathi, Due to rain in Indapur Grape growers in crisis
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे द्राक्ष इंदापूर पूर floods कोरोना corona शेती farming सामना face हवामान सकाळ औषध drug व्यापार
Search Functional Tags: 
पुणे, द्राक्ष, इंदापूर, पूर, Floods, कोरोना, Corona, शेती, farming, सामना, face, हवामान, सकाळ, औषध, drug, व्यापार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Due to rain in Indapur Grape growers in crisis
Meta Description: 
Due to rain in Indapur Grape growers in crisis
पुणे : बदललेल्या वातावरणामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. काही ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे द्राक्षे बागांचे चांगलेच नुकसान होत आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार चांगलाच अडचणीत आला आहे. परिणामी, नुकसानग्रस्त शेतकरी भरपाई देण्याची मागणी करीत आहेत.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X