इगतपुरी तालुक्यांत अवकाळीच्या तडाख्यात भात पिकाचे नुकसान 

नाशिक/इगतपुरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता.१८) सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ वाढली. जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात प्रामुख्याने इगतपुरी, पेठ व सुरगाणा तालुक्यांत भात सोंगणी करून झालेले शेतकरी या तडाख्यात प्रभावित सापडले आहेत. त्यामुळे अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा अवकाळीचा सामना करावा लागत आहे. 

शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील भात पिकांच्या सोंगण्या करून पेंढ्या वाहून नेण्याची कामे सुरू होती. तर प्रामुख्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बहर छाटण्या पूर्ण होऊन बागा फुलोरा अवस्थेत असल्याने या पावसाने मोठी चिंता वाढवली आहे. त्यामुळे हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे शेतातून सोंगणी केलेला भात घरी नेताना मोठी धावपळ उडाली. बुधवारी (ता.१७) सायंकाळी पाच वाजेनंतर रिमझिम पाऊस पडत असताना भात पीक घरी सुरक्षित ठिकाणी नेताना शेतकऱ्यांची प्रचंड धावपळ झाली होती. तर गुरुवार (ता.१८) सायंकाळी पुन्हा ६ वाजेनंतर साधारण मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने पिकाची खाचरे पूर्णपणे भरली. त्यामुळे भाताच्या सोंगलेल्या पेंढ्या पावसात भिजल्या. 
     
सुरगाणा तालुक्यात संध्याकाळी ५ वाजेनंतर पाऊस सुरू झाला. यात मोठ्या प्रमाणात भात, नागली, वरई व उडीद पिकाचे नुकसान झाल्याचे येथील शेतकरी केशव पालवी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार त्र्यंबकेश्‍वर महसूल मंडळात २६ मिमी, कोशिंबे (ता. दिंडोरी) मंडळात १९ मिमी  कौळाणे (ता. मालेगाव) महसूल मंडळात १६ मिलिमीटर, तर इगतपुरी तालुक्यातील इगतपुरी मंडळात १२ मिमी, तर नांदगाव मंडळात १० मिमी पावसाची नोंद झाली. नांदगाव, नाशिक, चांदवड या भागांत हलक्या सरी झाल्या. 

भात, नागली पिकाचे नुकसान अधिक आहे. अवकाळीमुळे मेहनतीवर पाणी फिरले आहे. कृषी विभागाने पंचनामे करून दखल घ्यावी व शासनाने नुकसान भरपाई देण्यासाठी पुढाकार घ्यावा. 
-केशव पालवी, शेतकरी, ठाणगाव, ता. सुरगाणा 

गेल्या पंधरवड्यात व आता देखील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. मागच्यावेळी देखील कृषी व महसूल विभागाने पंचनामे केलेले नसून आता तरी महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाई द्यावी. 
-पांडुरंग वारूंगसे, माजी उपसभापती, पंचायत समिती, इगतपुरी 
 
News Item ID: 
820-news_story-1637325964-awsecm-468
Mobile Device Headline: 
इगतपुरी तालुक्यांत अवकाळीच्या तडाख्यात भात पिकाचे नुकसान 
Appearance Status Tags: 
Section News
Damage to paddy crop due to untimely strike in Igatpuri talukaDamage to paddy crop due to untimely strike in Igatpuri taluka
Mobile Body: 

नाशिक/इगतपुरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता.१८) सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ वाढली. जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात प्रामुख्याने इगतपुरी, पेठ व सुरगाणा तालुक्यांत भात सोंगणी करून झालेले शेतकरी या तडाख्यात प्रभावित सापडले आहेत. त्यामुळे अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा अवकाळीचा सामना करावा लागत आहे. 

शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील भात पिकांच्या सोंगण्या करून पेंढ्या वाहून नेण्याची कामे सुरू होती. तर प्रामुख्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बहर छाटण्या पूर्ण होऊन बागा फुलोरा अवस्थेत असल्याने या पावसाने मोठी चिंता वाढवली आहे. त्यामुळे हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे शेतातून सोंगणी केलेला भात घरी नेताना मोठी धावपळ उडाली. बुधवारी (ता.१७) सायंकाळी पाच वाजेनंतर रिमझिम पाऊस पडत असताना भात पीक घरी सुरक्षित ठिकाणी नेताना शेतकऱ्यांची प्रचंड धावपळ झाली होती. तर गुरुवार (ता.१८) सायंकाळी पुन्हा ६ वाजेनंतर साधारण मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने पिकाची खाचरे पूर्णपणे भरली. त्यामुळे भाताच्या सोंगलेल्या पेंढ्या पावसात भिजल्या. 
     
सुरगाणा तालुक्यात संध्याकाळी ५ वाजेनंतर पाऊस सुरू झाला. यात मोठ्या प्रमाणात भात, नागली, वरई व उडीद पिकाचे नुकसान झाल्याचे येथील शेतकरी केशव पालवी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार त्र्यंबकेश्‍वर महसूल मंडळात २६ मिमी, कोशिंबे (ता. दिंडोरी) मंडळात १९ मिमी  कौळाणे (ता. मालेगाव) महसूल मंडळात १६ मिलिमीटर, तर इगतपुरी तालुक्यातील इगतपुरी मंडळात १२ मिमी, तर नांदगाव मंडळात १० मिमी पावसाची नोंद झाली. नांदगाव, नाशिक, चांदवड या भागांत हलक्या सरी झाल्या. 

भात, नागली पिकाचे नुकसान अधिक आहे. अवकाळीमुळे मेहनतीवर पाणी फिरले आहे. कृषी विभागाने पंचनामे करून दखल घ्यावी व शासनाने नुकसान भरपाई देण्यासाठी पुढाकार घ्यावा. 
-केशव पालवी, शेतकरी, ठाणगाव, ता. सुरगाणा 

गेल्या पंधरवड्यात व आता देखील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. मागच्यावेळी देखील कृषी व महसूल विभागाने पंचनामे केलेले नसून आता तरी महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाई द्यावी. 
-पांडुरंग वारूंगसे, माजी उपसभापती, पंचायत समिती, इगतपुरी 
 
English Headline: 
agriclture news in marathi,Damage to paddy crop due to untimely strike in Igatpuri talukaSource link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X