Take a fresh look at your lifestyle.

‘ई-कॉमर्स’ तंत्राद्वारे शेतीमालाची तडाखेबंद विक्री

0

नाशिक जिल्ह्यातील मोहाडी (ता.दिंडोरी) येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ताजा भाजीपाला व फळे विक्रीसाठी ‘बास्केट’ ही संकल्पना अत्यंत व्यावसायिक व शास्त्रशुध्द पध्दतीने विकसित केली. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मानवी स्पर्श कमीतकमी व्हावा या हेतूने यंत्रणा उभारली. ‘ई-कॉमर्स’ च्या माध्यमातून नाशिक, मुंबईसह पुणे शहरात मिळून बास्केट विक्रीचा सुमारे ९५ हजारांचा टप्पा गाठला.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील मोहाडी (ता.दिंडोरी) येथील प्रसिध्द सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीनेही भाजीपाला व फळे ‘बास्केट’ संकल्पनेचा स्विकार केला. ते करताना त्यात व्यावसायिक व शास्त्रीय दृष्टीकोनावर भऱ दिला. प्रत्येक कुटुंबाला आठवडाभर पुरेसा शेतमाल उपलब्ध व्हावी हा प्रमुख उद्देश होता.

बास्केटचे स्वरूप

 • फळभाज्या, पालेभाज्या,फळे व कंपनीच्या काही प्रक्रियायुक्त उत्पादनांचा समावेश
 • बास्केटच्या प्रकारानुसार वजन. प्रत्येक बास्केटवर प्रकार, त्यातील भाजीपाला व फळांचे वजन, किंमत व सूचना याबाबत माहिती यात पुढील प्रकारांचा समावेश आहे.
 • फळे- सफरचंद, संत्री, टरबूज, केळी, द्राक्षे,डाळिंब, कस्तूरी, आंबा
 • पालेभाज्या- कोथिंबीर, मेथी, पालक
 • अन्य भाज्या वा शेतमाल- ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, कांदा, टोमॅटो, बटाटा, गाजर, लिंबू, लसूण, काकडी, मिरची, भेंडी, शेवगा, कारले, भोपळा आदी

अशी राबवली ई-कॉमर्स यंत्रणा

 • सुरुवातीला सह्याद्रीशी संलग्न शेतकऱ्यांकडील उपलब्ध शेतमालाचा आढावा. त्यानुसार काढणी व मालाच्या विक्रीचे नियोजन.
 • लॉकडाऊनच्या सुरुवातीला नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासोबत चर्चेअंती हा उपक्रम नाशिकमध्ये सुरु.
 • व्हॉटस ॲप, फेसबूकच्या माध्यमातून ऑर्डर्स व बास्केट पद्धतीने विक्री
 • ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर ई-कॉमर्सच्या माध्यमातून मुंबई व नाशिक येथे असलेल्या विक्री केंद्रांशी ग्राहकांना जोडण्याचे काम
 • लॉकडाऊन कालावधीत ऑर्डर घेण्यासाठी कंपनीची ई-कॉमर्स वेबसाईट www.sahyadriretail.com
 • sahyadrifarms नावाने मोबाईल ॲप्लिकेश
 • सोसायटीने एकत्र ऑर्डर देणे बंधनकारक. ऑनलाईन घेतलेल्या ऑर्डर्स ठरलेल्या दिवशी सकाळी १२ वाजण्याच्या आत संबंधित सोसायट्यांमध्ये पोहोच.

‘मोबाईल ॲप्लिकेशन’ यंत्रणा अशी राबवली

 • मोबाईल क्रमांक समाविष्ट केल्यानंतर तोच ग्राहक खाते क्रमांक
 • जवळील विक्री केंद्र किंवा सोसायटीची यादी समाविष्ट
 • ग्राहक ज्या भागात राहतो त्या परिसरातील विक्री केंद्र तो निवडू शकतो.
 • भाजीपाला, फळे व प्रक्रियायुक्त उत्पादन बास्केट निवडण्याचे पर्याय, दरही उपलब्ध
 • कार्टमध्ये उत्पादने समाविष्ट करीत आपली निवड यादी तयार होते.
 • दिलेल्या पत्त्यावर डिलिव्हरी बॉयतर्फे माल पोचविण्याची सुविधा
 • कार्ड, नेटबँकिंग, वॉलेट, युपीआय असे रक्कम भरण्याचे पर्याय

बास्केट वितरणाची पद्धत

 • नाशिक महानगरपालिका क्षेत्रात वैयक्तिक तसेच स्वीगी ॲपवरही ऑर्डर उपलब्ध
 • पुणे शहरात फक्त निवासी सोसायट्यांना पुरवठा
 • दक्षिण मुंबईत वैयक्तिक मागणी (ऑर्डर). लॉजिस्टिक पार्टनरमार्फत वितरण
 • नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथे सोसायटीनिहाय तसेच आऊटलेटसच्या माध्यमातून वितरण

बास्केटनिहाय झालेली विक्री 

व्हेजिटेबल बास्केट प्रकार   दर(रुपये) विक्री (नग) ७ मे अखेर )
५५० ३६,८८५
बी ३५० ११,३६६
सी ३९० १,६२८
जे ५५० ४,५६५

फ्रूट बास्केट- (एकूण सुमारे ९५ हजारांचा टप्पा)

५५० ८,२६९
बी ३५० २३,३४४
द्राक्ष बास्केट २७५ २,८०६
आंबा बास्केट ५९० ३,९५१
ग्राहक वस्तू बास्केट २५० २,३६२

कामांची सुसूत्रता

 • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळून कंपनीकडून १० टक्के मनुष्यबळावर कामकाज
 • प्रक्षेत्र कार्यवाही (फार्म ऑपरेशन)- खरेदी व काढणी
 • उत्पादन विभाग :मागणीनुसार उत्पादनांची ठरलेल्या वेळेत निर्मिती
 • विक्री विभाग :मागणी नोंदविणे व उत्पादनांचे विपणन
 • वाहतूक विभाग- शेतमाल वाहतूक व पुरवठा
 • वाणिज्य विभाग-उत्पादन किंमत निश्चिती व आर्थिक व्यवहार
 • माहिती तंत्रज्ञान विभाग- ई कॉमर्स यंत्रणा कामकाज नियंत्रण
 • गुणवत्ता हमी विभाग: शेतमालाची गुणवत्ता तपासणी व देखरेख
 • जनसंपर्क विभाग: ग्राहक संपर्क व ग्राहक तक्रार निवारण

नियोजनातील प्रमुख मुद्दे

 • क्षेत्रीय पातळीपासून ते वितरण व्यवस्थेपर्यंत सर्व यंत्रणांचा समन्वय
 • सर्वेक्षण व मागणी तपासून आकार व वजनाची निश्चिती. यासाठी पॅकींग मटेरिअलची निवड
 • कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून कार्यक्षमतेत वाढ
 • मालाची गुणवत्ता, ताजेपणा, चव यासह दर्जेदार शेतमाल पुरवठ्याला प्राधान्य
 • वेळ व्यवस्थापनासह सेवा व गुणवत्ता याबाबत तक्रारी व सूचना प्राप्त झाल्यानंतर सुधारणा
 • जागतीक दर्जाचे निकष पाळून अन्न सुरक्षिततेला प्राधान्य

ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण व सूचनांचे स्वागत
ग्राहकांच्या तक्रारी, सूचना विचारात घेऊन त्यांचे तातडीने निरसन करण्यास प्राधान्य दिले जाते. यासाठी झिरो पेंडन्सी सूत्र अवलंबिले आहे. संबंधित तक्रारात तथ्य आढळल्यास ४८ तासांच्या आत किंमतीचा परतावा ऑनलाईन स्वरुपात दिला जातो. ग्राहकांना माहिती होण्यासाठी प्रत्येक बास्केटसोबत माहितीपत्रक देण्यात येते. यात सह्याद्रीकडे असलेल्या अन्न सुरक्षितता प्रमाणीकरण व मानांकनांची यादी आहे.

प्रतिक्रिया 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे व नाशिकमधील ग्राहकांची मागणी नोंदवून पुरवठा करण्यासाठी ई-कॉमर्स सुविधा कार्यान्वित केली. त्यामुळे कामात अचूक अंदाज घेऊन बास्केट पुरवठ्यात सुलभता आली. ग्राहकांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला आहे.
-विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मर प्रोड्युड्यूर कंपनी

कोरोना संकटात शेतमाल विक्रीत अडचणी होत्या. मात्र या काळात सह्याद्रीने माझ्यासह परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केला. त्यामुळे विक्रीची शाश्‍वती व दरही चांगला चांगला.
-रेवण बाळू ढगे, भाजीपाला उत्पादक, रासेगाव, ता.दिंडोरी

ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर वजन, ताजेपणा व गुणवत्ता यांची हमी मिळते. त्यामुळे वाजवी दरात थेट घरापर्यंत वेळेत माल येतो. थेट शेतातून फळे व भाजीपाला मिळत असल्याचे समाधान आहे.
– स्मिता खंबसवाडकर, ग्राहक, मुंबई.

संपर्क: सुरेश नखाते-७०३०९४७०२२
जनसंपर्क विभाग, सह्याद्री फार्मस, मोहाडी

News Item ID: 
820-news_story-1589277765-480
Mobile Device Headline: 
‘ई-कॉमर्स' तंत्राद्वारे शेतीमालाची तडाखेबंद विक्री
Appearance Status Tags: 
Mukhya News
The rules of health safety are followed while grading and packing the goodsThe rules of health safety are followed while grading and packing the goods
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi success story of sahyadri farmers producer company dist nashik
Author Type: 
External Author
मुकुंद पिंगळे
नाशिक nashik सह्याद्री कंपनी company कोरोना corona ई-कॉमर्स मुंबई mumbai पुणे स्त्री सफरचंद apple द्राक्ष डाळ डाळिंब लिंबू lemon उपक्रम मोबाईल सकाळ कल्याण मका maize माहिती तंत्रज्ञान
Search Functional Tags: 
नाशिक, Nashik, सह्याद्री, कंपनी, Company, कोरोना, Corona, ई-कॉमर्स, मुंबई, Mumbai, पुणे, स्त्री, सफरचंद, apple, द्राक्ष, डाळ, डाळिंब, लिंबू, Lemon, उपक्रम, मोबाईल, सकाळ, कल्याण, मका, Maize, माहिती तंत्रज्ञान
Twitter Publish: 
Meta Keyword: 
success story, sahyadri farmers producer company, district, nashik
Meta Description: 
success story of sahyadri farmers producer company dist nashik
नाशिक जिल्ह्यातील मोहाडी (ता.दिंडोरी) येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ताजा भाजीपाला व फळे विक्रीसाठी ‘बास्केट’ ही संकल्पना अत्यंत व्यावसायिक व शास्त्रशुध्द पध्दतीने विकसित केली. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मानवी स्पर्श कमीतकमी व्हावा या हेतूने यंत्रणा उभारली. ‘ई-कॉमर्स' च्या माध्यमातून नाशिक, मुंबईसह पुणे शहरात मिळून बास्केट विक्रीचा सुमारे ९५ हजारांचा टप्पा गाठला.Source link

X