[ad_1]
पुणे : सूर्य तळपू लागल्याने उन्हाची ताप असह्य होऊ लागला आहे. ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. नगर, चंद्रपूर, सांताक्रूझ, मालेगाव येथे कमाल तापमान ३७ अंशांवर पोहोचले आहे. तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, उन्हाचा चटका तापदायक ठरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बंगालच्या उपसागरात ढगांची दाटी झाली आहे. आजपासून (ता. ५) तमिळनाडूचा किनारपट्टीय भाग, पुदुच्चेरी, काराईकलमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ समुद्रात ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यातच महाराष्ट्रातही पावसाला पोषक हवामान होत असून, ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढला आहे. सोमवारपासून (ता. ७) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी सातत्याने ३४ ते ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. शुक्रवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे उच्चांकी ३७.४ सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
शुक्रवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.५, नगर ३७.४, धुळे ३४, जळगाव ३६, कोल्हापूर ३४.६, महाबळेश्वर २८.९, मालेगाव ३७, नाशिक ३४, निफाड ३२.८, सांगली ३६.१, सातारा ३४.८, सोलापूर -, सांताक्रूझ ३७.१, अलिबाग ३१.५, डहाणू ३१.४, रत्नागिरी ३४, औरंगाबाद ३४.२, नांदेड ३२.८, परभणी ३५.७, अकोला ३६.६, अमरावती ३४.६, बुलडाणा ३४.६, ब्रह्मपुरी ३५.४, चंद्रपूर ३७, गडचिरोली ३५, गोंदिया ३०.८, नागपूर ३३.८, वर्धा ३५, यवतमाळ ३५.
उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :
नगर ३७.४, सांताक्रूझ ३७.१, मालेगाव ३७, चंद्रपूर ३७.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.