Take a fresh look at your lifestyle.

उन्हाळी कांदा दरात घसरण

0

नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर कांदा लिलाव २८ ऑक्टोबरपासून बंद होते. आता पुन्हा ९ नोव्हेंबरपासून लिलावाला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये उन्हाळी कांद्याची आवक सर्वसाधारण तर खरीप लाल कांद्याची आवक कमी असल्याने मागणीमुळे दरात सुधारणा सुरुवातीस दिसून आली. मात्र दिवाळीनंतरच्या बाजारात आवकेत चढ-उतार होत आहे.तर दरात आता सारखी घसरण होऊन क्विंटलमागे ८०० ते १००० रुपयांपर्यंत ते खाली आल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

साठवलेल्या उन्हाळी कांद्याचा साठा कमी झाला असताना शेतकरी टप्प्याटप्प्याने बाजारात आणत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात आवकेत चढउतार सुरू आहेत. गुरुवारी (ता. १८) पुन्हा हे दर १०० ते १५० रुपयांनी पुन्हा खाली आले आहेत. दिवाळीनंतरच्या बाजाराच्या तुलनेत १००० रुपयांपर्यंत दरात घसरण झाल्याचे चित्र जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळत आहे. खरीप कांद्याची आवक कमी असताना उन्हाळी कांदा साठवलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे. 

लासलगाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार डागा म्हणाले की, कर्नाटकमध्ये नवीन खरीप कांद्याची आवक होत आहे. तर मध्यप्रदेश व महाराष्ट्रात साठवलेला कांदा आता बाजारात येऊ लागल्याने आवक वाढते आहे. त्यातच देशावर कमी मागणी असल्याने सध्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. कांदा आयात होत असल्याने दराचा फटका बसत आहे.

लासलगावचे कांदा व्यापारी व निर्यातदार मनोज जैन म्हणाले की, साठवणूक केलेली कांदाविक्री शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे जसा माल तसा दर असे दर आहेत. मध्य प्रदेशमध्ये कांदा आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यात कांद्याला सध्या उठाव नसल्याने दर कमी झाले आहेत.
 
News Item ID: 
820-news_story-1637243611-awsecm-476
Mobile Device Headline: 
उन्हाळी कांदा दरात घसरण
Appearance Status Tags: 
Mukhya News
Falling summer onion pricesFalling summer onion prices
Mobile Body: 

नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर कांदा लिलाव २८ ऑक्टोबरपासून बंद होते. आता पुन्हा ९ नोव्हेंबरपासून लिलावाला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये उन्हाळी कांद्याची आवक सर्वसाधारण तर खरीप लाल कांद्याची आवक कमी असल्याने मागणीमुळे दरात सुधारणा सुरुवातीस दिसून आली. मात्र दिवाळीनंतरच्या बाजारात आवकेत चढ-उतार होत आहे.तर दरात आता सारखी घसरण होऊन क्विंटलमागे ८०० ते १००० रुपयांपर्यंत ते खाली आल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

साठवलेल्या उन्हाळी कांद्याचा साठा कमी झाला असताना शेतकरी टप्प्याटप्प्याने बाजारात आणत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात आवकेत चढउतार सुरू आहेत. गुरुवारी (ता. १८) पुन्हा हे दर १०० ते १५० रुपयांनी पुन्हा खाली आले आहेत. दिवाळीनंतरच्या बाजाराच्या तुलनेत १००० रुपयांपर्यंत दरात घसरण झाल्याचे चित्र जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळत आहे. खरीप कांद्याची आवक कमी असताना उन्हाळी कांदा साठवलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे. 

लासलगाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार डागा म्हणाले की, कर्नाटकमध्ये नवीन खरीप कांद्याची आवक होत आहे. तर मध्यप्रदेश व महाराष्ट्रात साठवलेला कांदा आता बाजारात येऊ लागल्याने आवक वाढते आहे. त्यातच देशावर कमी मागणी असल्याने सध्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. कांदा आयात होत असल्याने दराचा फटका बसत आहे.

लासलगावचे कांदा व्यापारी व निर्यातदार मनोज जैन म्हणाले की, साठवणूक केलेली कांदाविक्री शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे जसा माल तसा दर असे दर आहेत. मध्य प्रदेशमध्ये कांदा आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यात कांद्याला सध्या उठाव नसल्याने दर कमी झाले आहेत.
 
English Headline: 
Agriculture news in Marathi Falling summer onion prices
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
उत्पन्न दिवाळी कांदा खरीप व्यापार महाराष्ट्र maharashtra जैन
Search Functional Tags: 
उत्पन्न, दिवाळी, कांदा, खरीप, व्यापार, महाराष्ट्र, Maharashtra, जैन
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Falling summer onion prices
Meta Description: 
Falling summer onion prices
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर कांदा लिलाव २८ ऑक्टोबरपासून बंद होते. आता पुन्हा ९ नोव्हेंबरपासून लिलावाला सुरुवात झाली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X