[ad_1]
पुणे : येत्या काळात कांद्याला चांगले दर मिळणार असल्याच्या अपेक्षेने उन्हाळी कांदा लागवडीचा आलेख वाढत आहे. उशिराने पोषक झालेल्या वातावरणामुळे बहुतांशी शेतकरी याकडे वळाले आहे. पुणे विभागात तब्बल दोन लाख ६० हजार ४७० हेक्टरवर उन्हाळी कांदा लागवडी झाल्या आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.
नोव्हेबर, डिसेंबरमध्ये परतीच्या पावसामुळे वाफसा न झाल्याने शेतकऱ्यांनी इतर पिकांऐवजी कांदा पिकांकडे मोर्चा वळवला. त्यातच गेल्या काही दिवसापासून कांद्याला बऱ्यापैकी चांगले दर मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी हरभरा, कांदा भाजीपाला पिके घेण्यावर भर दिला आहे.
रब्बी कांदा तीन ते चार महिन्यांत काढणीस येत असून, पाण्याचा ताण पडला तरी हातात काहीतरी प्रमाणात उत्पादन हाती येईल, या उद्देशाने अनेक शेतकरी कांदा लागवडीकडे वळाले आहेत. शेतकरी वर्षभरामध्ये खरीप, लेट खरीप, रब्बी (उन्हाळी) हंगामात कांद्याची लागवड करतात. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात नोव्हेबर, डिसेबर, जानेवारीमध्ये कांद्याची लागवड केली आहे. चालू वर्षी रब्बी हंगामात अनेक शेतकऱ्यांनी पीक बदल केला आहे. रब्बी कांद्याच्या लागवडीच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या उत्पादनात चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या खरीप, लेट खरीप हंगामात उत्पादित झालेल्या कांद्याची शेतकरी विक्री करत आहे. काही वेळा बाजारात एकाच वेळी आवक वाढत असल्यामुळे कांद्याच्या दरावर परिणाम होत आहे. किरकोळ विक्रीच्या ठिकाणी कांद्याचा प्रति किलोचा दर १० ते २५ रुपयांच्या दरम्यान असला तरी कांद्याच्या मार्केटमध्ये हा दर अत्यंत कमी आहे. विभागातील नगर जिल्ह्यात श्रीगोंदा, कोपरगाव, राहुरी, नेवासा, कर्जत, पाथर्डी, नगर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली आहे.
पारनेर तालुक्यात सर्वाधिक २९ हजार ७१० हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. जामखेड, शेवगाव, अकोले, राहाता या तालुक्यांत कमी लागवडी झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सर्वाधिक १५ हजार ५६२ हेक्टरवर लागवड झाली आहे.
जुन्नर, खेड, बारामती, दौड, पुरंदर, आंबेगाव, इंदापूर या तालुक्यांतही बऱ्यापैकी लागवड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, माढा, उत्तर, दक्षिण सोलापूर, करमाळा या तालुक्यांत बऱ्यापैकी कांदा लागवडी झाल्या आहेत. पंढरपूर, सोगाला, मंगळवेढा, माळशिरस, उत्तर सोलापूर या तालुक्यात कमी प्रमाणात लागवडी झाल्या आहेत.
जिल्हानिहाय झालेली कांदा लागवड (हेक्टर)
जिल्हा — झालेली लागवड
नगर — १,५२,२२८
पुणे — ६३,५७१
सोलापूर — ४४,६७१

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.