ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दगडफेक 

सांगली : जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी जाहीर केलेली नाही. त्यामुळेच संतप्त कार्यकर्त्यांनी आरग येथील मोहनराव शिंदे कारखान्याला जाणारी उसाची वाहने सोमवारी (ता. २५) रात्री फोडली. सांगली तासगाव रस्त्यावर कुमठे फाटा येथे ही घडली. त्यात दोन ट्रॅक्टर आणि एक ट्रकची तोडफोड करून हवा सोडण्यात आली आहे.

आरग येथील कारखान्याने गतवर्षी एकरकमी एफआरपी दिली होती. मात्र यंदा त्यांनी अद्याप एकरकमी एफआरपी जाहीर केलेली नाही. त्यामुळे कवठेएकंद येथून आरगकडे जाणारी वाहने अडवून त्यांची हवा सोडली. वाहनावर दगडफेक केली.

सोमवारी दुपारी भिलवडी परिसरात ‘स्वाभिमानी’कडून उसाची वाहने अडवली होती. 
कोल्हापूर जिल्ह्यातील दहा कारखान्यांनी व शेजारच्या कर्नाटक राज्यातील शिरगुप्पीसह काही कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एकरकमी एफआरपी जाहीर केलेली नाही. जे एकरकमी एफआरपी जाहीर करतील ते कारखाने सुरू राहतील, मात्र जे दर जाहीर करणार नाहीत, ते कारखाने बंद पाडू, तोडी बंद पाडू, असा इशारा संघटनेने दिला होता. ऊसतोडी सुरू झाल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक होत आहेत. 

जयसिंगपूर येथे ऊस परिषद नुकतीच झाली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकरकमी एफआरपी आणि वाढीव साखरेचा दर गृहीत धरून ३०० रुपये जानेवारीत द्यावेत, अशी मागणी केली आहे. तसाच ठराव परिषदेत झाला आहे. यानुसार कोल्हापुरातील दहा कारखान्यांनी एफआरपी जाहीर केली. त्यांच्या ऊसतोडी सुरूचा निर्णय झाला, मात्र त्यांनी वाढीव ३०० रुपये जानेवारी महिन्यात द्यावेत अन्यथा ते कारखाने जानेवारीत बंद पाडले जातील. मात्र एफआरपी जाहीर न केलेल्या कारखान्यांच्या तोंडी बंद पाडल्या जातील, असा इशारा संघटनेने दिला आहे.

News Item ID: 
820-news_story-1635251941-awsecm-573
Mobile Device Headline: 
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दगडफेक 
Appearance Status Tags: 
Section News
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दगडफेक  Stone throwing on vehicles transporting sugarcaneऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दगडफेक  Stone throwing on vehicles transporting sugarcane
Mobile Body: 

सांगली : जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी जाहीर केलेली नाही. त्यामुळेच संतप्त कार्यकर्त्यांनी आरग येथील मोहनराव शिंदे कारखान्याला जाणारी उसाची वाहने सोमवारी (ता. २५) रात्री फोडली. सांगली तासगाव रस्त्यावर कुमठे फाटा येथे ही घडली. त्यात दोन ट्रॅक्टर आणि एक ट्रकची तोडफोड करून हवा सोडण्यात आली आहे.

आरग येथील कारखान्याने गतवर्षी एकरकमी एफआरपी दिली होती. मात्र यंदा त्यांनी अद्याप एकरकमी एफआरपी जाहीर केलेली नाही. त्यामुळे कवठेएकंद येथून आरगकडे जाणारी वाहने अडवून त्यांची हवा सोडली. वाहनावर दगडफेक केली.

सोमवारी दुपारी भिलवडी परिसरात ‘स्वाभिमानी’कडून उसाची वाहने अडवली होती. 
कोल्हापूर जिल्ह्यातील दहा कारखान्यांनी व शेजारच्या कर्नाटक राज्यातील शिरगुप्पीसह काही कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एकरकमी एफआरपी जाहीर केलेली नाही. जे एकरकमी एफआरपी जाहीर करतील ते कारखाने सुरू राहतील, मात्र जे दर जाहीर करणार नाहीत, ते कारखाने बंद पाडू, तोडी बंद पाडू, असा इशारा संघटनेने दिला होता. ऊसतोडी सुरू झाल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक होत आहेत. 

जयसिंगपूर येथे ऊस परिषद नुकतीच झाली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकरकमी एफआरपी आणि वाढीव साखरेचा दर गृहीत धरून ३०० रुपये जानेवारीत द्यावेत, अशी मागणी केली आहे. तसाच ठराव परिषदेत झाला आहे. यानुसार कोल्हापुरातील दहा कारखान्यांनी एफआरपी जाहीर केली. त्यांच्या ऊसतोडी सुरूचा निर्णय झाला, मात्र त्यांनी वाढीव ३०० रुपये जानेवारी महिन्यात द्यावेत अन्यथा ते कारखाने जानेवारीत बंद पाडले जातील. मात्र एफआरपी जाहीर न केलेल्या कारखान्यांच्या तोंडी बंद पाडल्या जातील, असा इशारा संघटनेने दिला आहे.

English Headline: 
Agriculture News in Marathi Stone throwing on vehicles transporting sugarcane
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सांगली sangli साखर तासगाव ट्रॅक्टर tractor तोडफोड दगडफेक कोल्हापूर पूर floods कर्नाटक ऊस जयसिंगपूर खासदार
Search Functional Tags: 
सांगली, Sangli, साखर, तासगाव, ट्रॅक्टर, Tractor, तोडफोड, दगडफेक, कोल्हापूर, पूर, Floods, कर्नाटक, ऊस, जयसिंगपूर, खासदार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Stone throwing on vehicles transporting sugarcane
Meta Description: 
Stone throwing on vehicles transporting sugarcane
​सांगली जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी जाहीर केलेली नाही. त्यामुळेच संतप्त कार्यकर्त्यांनी आरग येथील मोहनराव शिंदे कारखान्याला जाणारी उसाची वाहने सोमवारी (ता. २५) रात्री फोडली.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X