ऊस सल्ला: पूर्वहंगामी व सुरु ऊस व्यवस्थापन – आम्ही कास्तकार कृषी सल्ला

ऊस सल्ला: पूर्वहंगामी व सुरु ऊस व्यवस्थापन

ऊस सल्ला: पूर्वहंगामी व सुरु ऊस व्यवस्थापन

१) पूर्वहंगामी ऊस
– पूर्वहंगामी ऊसातील आंतरपिकाची अवस्था पाहून काढणी करावी. 
– १२ ते १६ आठवडे झालेल्या ऊसाला नत्राचा तिसरा हप्ता द्यावा. याकरिता हेक्टरी ३४ किलो नत्र (७४ किलो युरिया) द्यावे.

२) सुरु ऊस
– ऊसाची लागण सलग सरीमध्ये दोन ओळीतील अंतर मध्यम जमिनीसाठी १००-१२० सेमी, भारी जमिनीसाठी १२०-१५० सेमी ठेऊन करावी अथवा ७५ ते १५० सेमी किंवा ९०-१८० सेमी पट्टा पद्धतीने लागण करावी. 
– लागणीसाठी को एम ०२६५ (फुले २६५), को ८६०३२ (निरा), नवीन पूर्वप्रसारीत वाण एम एस १०००१, को ९४०१२ (फुले सावित्री), कोसी ६७१ या वाणांची निवड करावी. लागणीसाठी दोन डोळ्यांच्या टीपरीचा वापर करावा.

-डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव.

Leave a Comment

X