[ad_1]
एरंडीचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता सॉल्ह्वंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनने व्यक्त केला आहे. असोसिएशनच्या (Solvent Extractors Association) अंदाजानुसार गेल्या वर्षी देशात 17.89 लाख टन एरंडी उत्पादन झाले होते. यंदा मात्र त्यात काहीशी वाढ होऊन उत्पादन 17.95 लाख टन राहण्याची शक्यता आहे. असोसिएशनने काल भरवलेल्या जागतिक एरंडी परिषदेत भारताच्या एरंडी उत्पादनाची ही आकडेवारी (Indian Castor Crop Survey) मांडली गेली.
“यात गुजरातचा 15.47 लाख टनांचा वाटा असेल. राजस्थानमधून 2.03 लाख टन, तसेच आंध्र प्रदेश आणि तेलंगाणातून 35,000 टन एरंडी उत्पादन निघेल. डिसेंबर आणि फेब्रुवारी महिन्यात रिमोट सेंसिंगद्वारे (remote sensing) केलेल्या क्षेत्र पाहणीवर हे अंदाज आधारित आहेत,”
– संतोष झंवर, इंडियन ॲग्रीबिझनेस सिस्टिम्स (कार्यक्रमात बोलताना)
सरकारी अंदाजानुसार देशात 2021-22 मध्ये 8.11 लाख हेक्टरवर एरंडीचा पेरा (sowing area) आहे. त्याआधीच्या वर्षात हाच आकडा 8.26 लाख हेक्टरवर पोहोचला होता. यात एकट्या गुजरातमध्ये 6.52 लाख हेक्टर तर राजस्थानमध्ये 1.20 लाख हेक्टरवर एरंडीचे क्षेत्र असते. या सर्वेक्षणानुसार देशातील एरंडीच्या हेक्टरी उत्पादकतेत काहीशी वाढ होऊन ती 2,228 किलोची राहील. तर गुजरातचा विचार करता तिथली हेक्टरी उत्पादकता 2,371 किलोची राहण्याचा अंदाज आहे.
सिंचनासाठी (irrigation) पाण्याची उपलब्धता आणि बाजारभाव (market prices), या दोन घटकांचा अंतिम उत्पादनावर प्रभाव पडेल, असे झंवर यावेळी बोलताना म्हणाले. गोकुल ॲग्रो रिसोर्सेसच्या दीपक ठक्कर यांच्या माहितीनुसार सरकारने 15 लाख टन उत्पादनाचा अंदाज काढला होता. पण यात दीड लाख टनांची भर पडू शकते, असं ठक्कर म्हणाले. सध्या देशात एरंडीचे साठे कमी असल्याची माहितीही ठक्कर यांनी दिली.
“एरंडीच्या क्षेत्रात भारताची मक्तेदारी असल्यासारखे आहे. या शेतीमालाचे महत्त्व लक्षात घेता एनसीडीईएक्सवर एरंडीचे करार लवकरच सुरू करण्यात येतील,”
– अरुण रास्ते, व्यवस्थापकीय संचालक, एनसीडीईएक्स (NCDEX)(कार्यक्रमात बोलताना)
असे केल्याने भारतीय एरंडी उत्पादक आणि निर्यातदारांना जोखीम व्यवस्थापन करता येईल. तर दुसऱ्या बाजूला आयातदार देशातील व्यापाऱ्यांनाही याचा फायदा होईल.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.