Take a fresh look at your lifestyle.

एसबीआय कडून सर्व कर्जदार शेतकरी व महिला बचत गटासाठी 10% अतिरिक्त कर्ज योजना

0


भारतीय स्टेट बँकेने जिल्ह्यातील स्टेट बँकेचे सर्व कर्जदार शेतकरी सभासद व महिला बचत गटांसाठी दहा टक्के अतिरिक्त कर्ज योजना सुरू केलेली आहे. तरी या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व सभासद शेतकरी व महिला बचत गटांनी घ्यावा असे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर अभिजीत पांगरेकर यांनी केले आहे.

सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांसमोर अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा या कठीण प्रसंगी भारतीय स्टेट बँकेने सर्व नियमित कृषी कर्जदार सभासद आणि महिला बचत गटांनी घेतलेल्या कर्ज मर्यादेवर अतिरिक्त 10 टक्के कर्ज मंजुरीची घोषणा केलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व योजनेविषयी अधिक माहितीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या आपल्याशी संबंधित शाखेची संपर्क साधावा असे आवाहनही श्री. पांगरेकर यांनी केले आहे.

सकाळी उठल्यानंतर मीठ पाणी प्या, त्याचे हे आहेत लाभदायक फायदे….

दरम्यान, स्टेट बँकेने वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष व्याजदर देऊ करतानाच ‘मार्जीनल कॉस्ट ऑफ फंड्स’ आधारित कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे.देशातील सर्वाधिक कर्जवाटप असलेल्या स्टेट बँकेने ‘मार्जीनल कॉस्ट ऑफ फंड्स’ आधारित कर्जाच्या व्याजदरात ०.१५ टक्कय़ाची कपात केली आहे. मागील काही दिवसात स्टेट बँक व्याजदरात सातत्याने कपात करीत असून ही १२वी कपात असल्याचे स्टेट बँकेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.Source link

X