ए-१ आणि ए-२ दूध नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या दोन्हीतील फरक आणि आरोग्यासाठीचे फायदे तोटे!


भारतात शेतीला पूरक जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे शेतकऱ्यांचा मोठा कल असतो. यामुळे भारतात दुध उत्पादनाचे प्रमाण जगातील इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. बहुतांशी शेतकरी दुधाळ प्राण्यांचे संगोपन करुन शेतीव्यवसायासह दुग्ध व्यवसाय करतात. परंतु यापैकी बहुतांशी शेतकऱ्यांना दुधाच्या दोन प्रकारांबद्दल फारसे माहित नसते. यापैकी कोणते दुध शरीरास पोषक आणि कोणते दूध तोट्याचे हे यामुळे शेतकऱ्यांना माहित नसते. आज आम्ही शेतकरी बंधूना याविषयी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. चला तर जाणून घेऊया दूधाचे नेमके कोणते दोन प्रकार आहेत आणि त्यांचे फायदे तोटे कोणते आहेत…

दुधाचे दोन प्रकार असून याला ए- १ आणि ए-२ असे ओळखले जाते. परदेशी संकरित जातीच्या (आयरशायर, जर्सी ) पासून मिळणाऱ्या दुधाला वैज्ञानिक भाषेत ए १ दुध म्हणतात. भारतात उत्पादित होणाऱ्या दुधाच्या एकूण उत्पादनापैकी आता ९५ टक्के दूध हे ए-१ दूध आहे. तर भारतातील मुळ जातीच्या गायी म्हणजेच साहिवाल, गीर, थारपारकर, लाल सिंधी, हरियाणवी इत्यादीं पासून मिळणाऱ्या दुधाला ए-२ प्रकारचं दूध म्हटले जाते.

ए-१ दूधाची भीती – भारतात वाढलेले दूध उत्पादन हे संकरित जातींमुळे वाढले आहे. परंतु त्यामुळे काही समज आणि गैरसमज समाजात पसरले आहेत. संकरित जातीपासून उत्पादित झालेले दूध हे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक आहे तसेच आंतरराष्ट्रीय दुध बाजारात ए १ दुधाच्या गुणवत्तेवरून अनेकवेळा चिंता व्यक्त करण्यात आल्या. दरम्यान अमेरिकेत करण्यात आलेल्या संशोधनात एक धक्कादायक बाब समोर आली. यामध्ये ए१ दूधात आढळणारे बीसीएम ७ हे तत्व माणसाच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. बीसीएम ७ हे आपल्या शरीरात अनेक प्ररकारच्या व्याधी निर्माण करु शकते. तर डेनमार्क, स्वीडनच्या संशोधनानुसार बीसीएम ७ मुळे डायबिटीज किंवा हृदयरोग होण्याची शक्यता आहे. यासह ए१ दूध पचण्यास त्रासदायक असते. 

ए-२ दूध गुणवत्ता – देशी जनावरांपासून मिळालेल्या दुधात गुणवत्ता अधिक असते. देशी जातीच्या जनावरांपासून उत्पादित दुधात अमिनो आम्ल प्रोलीन मिळत असते. हे बीसीएम ७ला शरीरात आत्मसात करण्यास परवानगी देत नाही. ज्यामुळे ए-२ दूध पचविणे सोपे आहे. या दुधामुळे कोणताच दुष्परिणाम होत नाही. ए-२ दूधाच्या या गुणांमुळे विशेषतः बाल कुपोषण सारख्या समस्या दूर करण्यासाठी याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. ए -२ दुधाच्या औषधी गुणधर्मामुळे जगभरात याच्या मागणीत वाढ होत आहे. न्युझीलँड आणि अमेरिकेत ए-२ दूध लोकप्रिय आहे. तर भारतातही आता अमूल सारख्या मोठ्या कंपन्यांनी याचे उत्पादन सुरू केले आहे. तसेच बाजारभावाच्या बाबतीतही बोलायचे झाले तर ए-२ चा दर अधिक आहे. सध्या ए-२ दूध ९० ते १०० रुपये प्रति लिटरने विकले जाते. तर ए-१ दुधाची किंमत ही प्रति लिटर २५ ते ५० रुपये आहे.

Previous articleरेड झोन, कंन्टेनमेंट झोन, इतर राज्य किंवा परदेशातून येणाऱ्यांसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा महत्वाचा निर्णय…!

Source link

Leave a Comment

X