औरंगाबादच्या भाजी मंडईची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

औरंगाबाद : जाधववाडी भाजीमंडी ११ ते १७ मार्चदरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.१२) बाजार समितीला भेट देऊन प्रत्यक्ष भाजी मंडईच्या जागेची पाहणी केली. यावेळी बाजार समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना फळे आणि भाजीपाला बाजार सुरू होण्यासाठी बाजार समिती काय उपाययोजना करणार? त्यासाठी काय सहकार्य हवे? असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला.

कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद बाजार समितीमधील बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून देण्यात आले होते. या निर्णयानंतर बाजार समितीमध्ये फळे व भाजीपाल्याची आवक ठप्प झाली. नाशवंत असलेल्या  भाजीपाला व फळांच्या विक्रीचा प्रश्‌न निर्माण झाला. शेतकऱ्यांना आपला माल जमेल तसे व मिळेल त्या भावात विकण्याची वेळ आली. शिवाय विक्रीअभावी शेतकऱ्यांना आपला नाशवंत फळे भाजीपाला रस्त्यावर फेकूनही देण्याची वेळ आली. 

ही बाब लक्षात घेऊन शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब गायके, नानासाहेब पळसकर, कुंडलिक अंभोरे यांनी जिल्हाधिकारी  व बाजार समितीच्या सभापतींना निवेदन सादर केले होते. आधीच ओल्या दुष्काळाचे संकट, त्यात कोरोना संकटाने आलेली मंदी, जाधववाडी मधील फळे भाजीपाला विक्री शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेतल्या. कोरोनाच्या उपाययोजना व सोशल डिस्टंन्सिगचा वापर करून फळे, भाजीपाला मार्केट सुरू ठेवण्याची विनंती केली होती.  

शेतकऱ्यांचे निर्णयाकडे लक्ष

बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष बाजार समितीच्या भाजीमंडईची पाहणी केली. या वेळी त्यांनी बाजार समितीची व्यवस्था जाणून घेतली. कोरोनाची रूग्‌णसंख्या वाढू नये, या साठी प्राधान्य असून भाजीपाला व फळे खरेदी विक्रीच्या अनुषंगाने बाजार समितीचा उपाययोजनात्मक काय प्रस्ताव आहे, तो सादर करण्याची सूचना केली. आता भाजीपाला, फळे बाजार सुरू होण्यासाठी काय निर्णय घेतला जातो? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांना बाजार समिती ज्या उपाययोजनांची तयारी करते आहे. त्याचा प्रस्ताव देण्यात आला. कोरोनाचा प्रादूर्भाव न वाढता शेतकऱ्यांचाही नाशवंत भाजीपाला, फळे  विकला जावा, ही बाजार  समितीची भूमिका आहे. त्यासाठी नियोजन सुरू आहे. व्यापारी, किरकोळ विक्रेते, शेतकरी सर्वांनाच कोरोनाविषयक नियमांचे व शिस्तीचे पालन करून सहकार्य करावे लागेल. 
– राधाकिसन पठाडे, सभापती, बाजार समिती, औरंगाबाद.

News Item ID: 
820-news_story-1615553892-awsecm-440
Mobile Device Headline: 
औरंगाबादच्या भाजी मंडईची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
Appearance Status Tags: 
Tajya News
 District Collector inspects vegetable market in Aurangabad District Collector inspects vegetable market in Aurangabad
Mobile Body: 

औरंगाबाद : जाधववाडी भाजीमंडी ११ ते १७ मार्चदरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.१२) बाजार समितीला भेट देऊन प्रत्यक्ष भाजी मंडईच्या जागेची पाहणी केली. यावेळी बाजार समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना फळे आणि भाजीपाला बाजार सुरू होण्यासाठी बाजार समिती काय उपाययोजना करणार? त्यासाठी काय सहकार्य हवे? असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला.

कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद बाजार समितीमधील बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून देण्यात आले होते. या निर्णयानंतर बाजार समितीमध्ये फळे व भाजीपाल्याची आवक ठप्प झाली. नाशवंत असलेल्या  भाजीपाला व फळांच्या विक्रीचा प्रश्‌न निर्माण झाला. शेतकऱ्यांना आपला माल जमेल तसे व मिळेल त्या भावात विकण्याची वेळ आली. शिवाय विक्रीअभावी शेतकऱ्यांना आपला नाशवंत फळे भाजीपाला रस्त्यावर फेकूनही देण्याची वेळ आली. 

ही बाब लक्षात घेऊन शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब गायके, नानासाहेब पळसकर, कुंडलिक अंभोरे यांनी जिल्हाधिकारी  व बाजार समितीच्या सभापतींना निवेदन सादर केले होते. आधीच ओल्या दुष्काळाचे संकट, त्यात कोरोना संकटाने आलेली मंदी, जाधववाडी मधील फळे भाजीपाला विक्री शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेतल्या. कोरोनाच्या उपाययोजना व सोशल डिस्टंन्सिगचा वापर करून फळे, भाजीपाला मार्केट सुरू ठेवण्याची विनंती केली होती.  

शेतकऱ्यांचे निर्णयाकडे लक्ष

बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष बाजार समितीच्या भाजीमंडईची पाहणी केली. या वेळी त्यांनी बाजार समितीची व्यवस्था जाणून घेतली. कोरोनाची रूग्‌णसंख्या वाढू नये, या साठी प्राधान्य असून भाजीपाला व फळे खरेदी विक्रीच्या अनुषंगाने बाजार समितीचा उपाययोजनात्मक काय प्रस्ताव आहे, तो सादर करण्याची सूचना केली. आता भाजीपाला, फळे बाजार सुरू होण्यासाठी काय निर्णय घेतला जातो? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांना बाजार समिती ज्या उपाययोजनांची तयारी करते आहे. त्याचा प्रस्ताव देण्यात आला. कोरोनाचा प्रादूर्भाव न वाढता शेतकऱ्यांचाही नाशवंत भाजीपाला, फळे  विकला जावा, ही बाजार  समितीची भूमिका आहे. त्यासाठी नियोजन सुरू आहे. व्यापारी, किरकोळ विक्रेते, शेतकरी सर्वांनाच कोरोनाविषयक नियमांचे व शिस्तीचे पालन करून सहकार्य करावे लागेल. 
– राधाकिसन पठाडे, सभापती, बाजार समिती, औरंगाबाद.

English Headline: 
agriculture news in marathi District Collector inspects vegetable market in Aurangabad
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
औरंगाबाद aurangabad बाजार समिती agriculture market committee भाजीपाला बाजार vegetable market कोरोना corona ऊस
Search Functional Tags: 
औरंगाबाद, Aurangabad, बाजार समिती, agriculture Market Committee, भाजीपाला बाजार, Vegetable Market, कोरोना, Corona, ऊस
Twitter Publish: 
Meta Keyword: 
District Collector inspects vegetable market in Aurangabad
Meta Description: 
District Collector inspects vegetable market in Aurangabad
औरंगाबाद : जाधववाडी भाजीमंडी ११ ते १७ मार्चदरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.१२) बाजार समितीला भेट देऊन प्रत्यक्ष भाजी मंडईच्या जागेची पाहणी केली.Source link

Leave a Comment

X