औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत गाळपासाठी दीड लाख हेक्‍टरवर ऊस

औरंगाबाद : यंदाच्या ऊस गाळप हंगामासाठी औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतील कारखान्यांसाठी १ लाख ६१ हजार ९९६ हेक्‍टरवरील ऊस उपलब्ध आहे. त्यामध्ये खोडव्याच्या ऊस क्षेत्राचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

मराठवाड्यातील कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. त्यासाठी परवाना मिळालेल्या कारखान्यांकडून ऑक्‍टोबरअखेर व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऊस गाळप सुरू करण्यात आले. साखर विभागाच्या औरंगाबाद प्रादेशिक सहसंचालक कार्यालयांतर्गत जवळपास २२ कारखान्यांनी यंदा गाळपासाठी परवाना मागितला. त्यापैकी चार कारखान्यांना परवाना नाकारण्यात आला. त्यामध्ये अंबाजोगाई, वैद्यनाथ, रामेश्वर, सिद्धेश्वर आदी कारखान्यांचा समावेश आहे, असे साखर विभागाकडून सांगण्यात आले. 

औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत जवळपास २५ कारखाने आहेत. त्यामध्ये औरंगाबाद व बीडमधील प्रत्येकी १० व जालन्यातील ५ कारखान्यांचा समावेश आहे. प्रत्यक्षात ९ नोव्हेंबरपर्यंत औरंगाबादमधील एका खासगी कारखान्यासह जालनान्यातील एक सहकारी व एक खासगी तसेच बीडमधील एका सहकारी कारखान्याने ऊस गाळपास सुरवात केली होती.

यंदा गाळपासाठी उपलब्ध ऊस क्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्यातील ४४ हजार १८६, जालना ४८ हजार ३१३, तर बीड जिल्ह्यातील ६९ हजार ४९७ हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस पिकांचा समावेश आहे. गाळपासाठी तीन जिल्ह्यातील उसाच्या क्षेत्रात २३०१ हेक्‍टरवरील आडसाली, ३० हजार ८३७ हेक्‍टरवरील पूर्वहंगामी, ४५ हजार ७५९ हेक्‍टरवरील सुरू, तर ८३ हजार ९७ हेक्‍टरवरील खोडवा ऊस क्षेत्राचा समावेश आहे. 

उपलब्ध उसाचे क्षेत्र व ऊस पिकाची स्थिती पाहता औरंगाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी ७३ टन, जालना जिल्ह्यात हेक्‍टरी ७५ टन, तर बीड जिल्ह्यात हेक्‍टरी ५८ टन ऊस उत्पादकता अपेक्षित असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

News Item ID: 
820-news_story-1636719991-awsecm-319
Mobile Device Headline: 
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत गाळपासाठी दीड लाख हेक्‍टरवर ऊस
Appearance Status Tags: 
Section News
Sugarcane on 1.5 lakh hectare for sifting in Aurangabad, Jalna and Beed districtsSugarcane on 1.5 lakh hectare for sifting in Aurangabad, Jalna and Beed districts
Mobile Body: 

औरंगाबाद : यंदाच्या ऊस गाळप हंगामासाठी औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतील कारखान्यांसाठी १ लाख ६१ हजार ९९६ हेक्‍टरवरील ऊस उपलब्ध आहे. त्यामध्ये खोडव्याच्या ऊस क्षेत्राचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

मराठवाड्यातील कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. त्यासाठी परवाना मिळालेल्या कारखान्यांकडून ऑक्‍टोबरअखेर व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऊस गाळप सुरू करण्यात आले. साखर विभागाच्या औरंगाबाद प्रादेशिक सहसंचालक कार्यालयांतर्गत जवळपास २२ कारखान्यांनी यंदा गाळपासाठी परवाना मागितला. त्यापैकी चार कारखान्यांना परवाना नाकारण्यात आला. त्यामध्ये अंबाजोगाई, वैद्यनाथ, रामेश्वर, सिद्धेश्वर आदी कारखान्यांचा समावेश आहे, असे साखर विभागाकडून सांगण्यात आले. 

औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत जवळपास २५ कारखाने आहेत. त्यामध्ये औरंगाबाद व बीडमधील प्रत्येकी १० व जालन्यातील ५ कारखान्यांचा समावेश आहे. प्रत्यक्षात ९ नोव्हेंबरपर्यंत औरंगाबादमधील एका खासगी कारखान्यासह जालनान्यातील एक सहकारी व एक खासगी तसेच बीडमधील एका सहकारी कारखान्याने ऊस गाळपास सुरवात केली होती.

यंदा गाळपासाठी उपलब्ध ऊस क्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्यातील ४४ हजार १८६, जालना ४८ हजार ३१३, तर बीड जिल्ह्यातील ६९ हजार ४९७ हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस पिकांचा समावेश आहे. गाळपासाठी तीन जिल्ह्यातील उसाच्या क्षेत्रात २३०१ हेक्‍टरवरील आडसाली, ३० हजार ८३७ हेक्‍टरवरील पूर्वहंगामी, ४५ हजार ७५९ हेक्‍टरवरील सुरू, तर ८३ हजार ९७ हेक्‍टरवरील खोडवा ऊस क्षेत्राचा समावेश आहे. 

उपलब्ध उसाचे क्षेत्र व ऊस पिकाची स्थिती पाहता औरंगाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी ७३ टन, जालना जिल्ह्यात हेक्‍टरी ७५ टन, तर बीड जिल्ह्यात हेक्‍टरी ५८ टन ऊस उत्पादकता अपेक्षित असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

English Headline: 
Agriculture news in marathi, Sugarcane on 1.5 lakh hectare for sifting in Aurangabad, Jalna and Beed districts
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
औरंगाबाद aurangabad ऊस गाळप हंगाम जालना jalna बीड beed कृषी विभाग agriculture department विभाग sections साखर
Search Functional Tags: 
औरंगाबाद, Aurangabad, ऊस, गाळप हंगाम, जालना, Jalna, बीड, Beed, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, साखर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Sugarcane on 1.5 lakh hectare for sifting in Aurangabad, Jalna and Beed districts
Meta Description: 
Sugarcane on 1.5 lakh hectare for sifting in Aurangabad, Jalna and Beed districts
औरंगाबाद : यंदाच्या ऊस गाळप हंगामासाठी औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतील कारखान्यांसाठी १ लाख ६१ हजार ९९६ हेक्‍टरवरील ऊस उपलब्ध आहे. त्यामध्ये खोडव्याच्या ऊस क्षेत्राचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X