Take a fresh look at your lifestyle.

कंटेनमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाउन कायम; उर्वरित भाग टप्प्याटप्प्याने शिथील

0

नवी दिल्ली : कोरोनाच्या जागतिक साथीमुळे २५ मार्चपासून गेले ६८ दिवस घरांच्या दरवाजांच्या आड ‘लॉक’ असलेला देश आता तीन प्रमुख टप्प्यांत ‘अनलॉक’ होणार आहे. पहिल्या टप्प्यात धार्मिक स्थळे, हॉटेल, मॉल खुले करण्यात येणार आहेत. संसर्गाचा सर्वाधिक उद्रेक असलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये मात्र ३० जूनपर्यंत ‘लॉकडाउन’ कायम राहणार आहे.

देसभरातील लॉकडाउनचा चौथा टप्पा उद्या (ता. ३१) संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने आज नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. अर्थचक्र सुरू राहण्यासाठी सर्व व्यवहार सुरळीत होणे गरजेचे आहे. त्याचा विचार करून टप्प्याटप्प्याने संपूर्ण देश खुला करण्यात येणार आहे. असे असले तरी कोरोनाच्या संसर्गाचा धोका संपलेला नसल्याने नागरिकांना अधिक जबाबदारीने सर्व व्यवहार करावे लागणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर या नियमांचे काटेकोर पालन मात्र यापुढेही सक्तीचे राहणार आहे..

शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, आंतरराष्ट्रीय उड्डाणे इत्यादी सुरू करण्याबाबतचा निर्णय जुलैमध्ये परिस्थितीच्या आढाव्यानंतर घेण्यात येणार आहे.

कंटेनमेंट झोन आणि उद्रेकाची शक्यता असलेला बफर झोन ठरविण्याची जबाबदीरी राज्य सरकारवर आहे. त्यामुळे केंद्राच्या निर्देशांनुसार आता राज्य सरकारही मार्गदर्शक तत्त्वे जारी करून अर्थचक्राला गती देण्याचा प्रयत्न करेल. अर्थात, या अनलॉकबाबत अंतिम अधिकार राज्यांकडे सोपवण्यात आले आहेत. मात्र, ३० जूनपर्यंत कन्टेनमेंट झोनमधील व्यवहार संपूर्णपणे बंद राहतील. अत्यावश्यक सेवांना फक्त तेथे मुभा असेल.
६५ वर्षांवरील नागरिक, १० वर्षांखालील मुले आणि गर्भवतींनी घरातच थांबावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अत्यंत गरजेच्या गोष्टींसाठीच त्यांनी घराबाहेर जावे असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.

ई-पासची गरज नाही
एखाद्या राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये किंवा दोन राज्यांमध्ये प्रवास करण्यासाठी पासची आवश्यकता नसेल. याद्वारे सरकारने यामध्ये निर्माण झालेले पोलिस आणि प्रशासनाचे ‘ई-परमिट राज’ समाप्त केले आहे.

मेट्रो बंदच
देशभरातील महानगरांतील जीवनवाहिनी ठरलेल्या मेट्रोची सेवा तत्काळ सुरू करण्यास केंद्राने रेड सिग्नल दिला आहे.

असा उघडणार लॉकडाउन

पहिला टप्पा
आठ जूननंतर खालील गोष्टी खुल्या होणार

 • धार्मिक ठिकाणे,
 • हॉटेल, रेस्टॉरंट आणि हॉस्पिटॅलिटी सेवा
 • शॉपिंग मॉल (यासाठीच्या स्वतंत्र मार्गदर्शक सूचना जारी करणार)

दुसरा टप्पा

 • राज्य सरकारांशी चर्चा केल्यानंतर शाळा-महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास सुरू करण्याचा निर्णय घेणार. मात्र याबाबतचा निर्णय जुलैमध्येच होणार.
 • यासाठीची कार्यपद्धती केंद्र सरकार जारी करणार

तिसरा टप्पा
प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर खालील गोष्टी खुल्या करण्याचा निर्णय घेणार. तोपर्यंत या सेवा बंदच असतील

 • आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक (गृहमंत्रालयाच्या परवानगी नुसार)
 • मेट्रो सेवा
 • चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, एंटरटेनमेंट पार्क, सभागृहे, नाट्यगृहे, बार
 • सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रम आणि इतर मोठे समारंभ

रात्रीची संचारबंदी कायम
देशभरात रात्री ९ ते पहाटे पाच पर्यत संचारबंदी लागू राहणार आहे. अत्यावश्यक सेवांना यातून सूट असेल.

ठकळ मुद्दे

 • कंटेनमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाउन कायम
 • कंटेनमेंट झोन ठरविण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला
 • कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावेशक सेवांनाच परवानगी
 • ज्या भागात कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याची शक्यता आहे, असे भाग राज्य सरकार बफर झोन म्हणून निश्चित करू शकतील. कंटेनमेंट झोन व्यतरिक्त हे भाग असतील.
 • बफर झोनमधील निर्बंध ठरविण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला
 • परिस्थितीचा आढावा घेऊन कंटेनमेंट झोन बाहेर आवश्यकतेनुसार निर्बंध लागू करण्याचे अधिकार राज्यांना
 • श्रमिक स्पेशल रल्वे, देशांतर्गत विमानसेवा, परदेशातून भारतीयांना मायदेशी आणणे या गोष्टी केंद्राच्या सूचनांनुसार सुरू राहतील.
 • कोणत्याही प्रकारच्या मालवाहतुकीवर देशभरात निर्बंध नाहीत.
 • ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, , दहा वर्षांखालील मुलांनी शक्यतो घरातच राहण्याचा सल्ला. आवश्यक आणि आरोग्यविषयक गोष्टींसाठीच त्यांनी बाहेर पडावे.
 • आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार असलेली मार्गदर्शक तत्त्वांमधील तरतुदी राज्यांनी कोणत्याही स्थितीत शिथिल करू नयेत. 
News Item ID: 
820-news_story-1590861930-511
Mobile Device Headline: 
कंटेनमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाउन कायम; उर्वरित भाग टप्प्याटप्प्याने शिथील
Appearance Status Tags: 
Tajya News
कंटेनमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाउन कायमकंटेनमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाउन कायम
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi lockdown in contentment zone continues till 30th June : Central Government
Author Type: 
External Author
सकाळ न्यूज नेटवर्क
कोरोना corona धार्मिक हॉटेल वर्षा varsha पोलिस प्रशासन administrations मेट्रो नगर
Search Functional Tags: 
कोरोना, Corona, धार्मिक, हॉटेल, वर्षा, Varsha, पोलिस, प्रशासन, Administrations, मेट्रो, नगर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
lockdown in contentment zone continues till 30th June Central Government
Meta Description: 
lockdown in contentment zone continues till 30th June : Central Government
संसर्गाचा सर्वाधिक उद्रेक असलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये मात्र ३० जूनपर्यंत ‘लॉकडाउन’ कायम राहणार आहे.Source link

X