कंबोडियातील भारतीय सण!

कंबोडियात फिरताना भारताशी जुळलेली त्यांची नाळ सतत जाणवून येतेय. त्यांचे आणि आपल्या सणांतही किती साम्य आहे. इतकी स्थित्यंतरं होऊनदेखील त्यांनी आपली संस्कृती धरून ठेवलीय. पश्‍चिमेची आस धरणाऱ्या आपल्या भारतीयांना पूर्वेकडील सांस्कृतिक भावकीची कधी जाणीव होईल? हाच खरा प्रश्‍न आहे.

भारतातून निघून आम्हाला आता जवळपास महिना झालाय. इतके दिवस बाइक चालवत, हजारो किलोमीटरचे रस्ते तुडवत आम्ही कंबोडियाला पोहोचलो आहोत. आमची मोहीम सुरू झाली तेव्हा भारतात दिवाळी सुरू होती. दिव्यांचा सण साजरा होत असताना, आम्ही सात देशांच्या सफरीवर दिवे लावायला निघालो होतो. एवढ्या लांबची सात देशांची बाइक सफर म्हणजेच आधी आगीशी खेळ. त्यात फटाक्यांच्या आगीची भर नको असं म्हणत, फटाक्यांची फटकून वागत पुढे सटकत होतो. आम्हाला हिंदीतली ‘सफर’ करायची होती, इंग्रजीतली नव्हे! पोटातल्या दारूच्या जोरावर, रात्री आमच्यावर खेकसत आवाज करणारे फटाके सकाळी धराशायी झालेली असायची. बाइकच्या सायलेन्सरमधून उडणाऱ्या हवेच्या फटकाऱ्याने त्यांच्या पार्थिवांचा कचरा हवेत उडायचा. दारू माणसाच्या पोटातली असो की फटाक्यांच्या, आवाज करणारच! पण ती संपल्यावर मात्र धराशायी होण्याशिवाय पर्याय नसतो, हे समजले म्हणजे झाले.

हजारो किलोमीटर दूर कंबोडियाच्या पावन भूमीवर फिरताना भारताची सण परंपरा कायम असल्याचं दिसतंय. भारतासारखे इथंही वेगवेगळे सण साजरे होतात. यांच्या सणांमध्ये ‘मृतात्म्यांचा सण’ किंवा ‘भुकेल्या भुतांचा सण’ साजरा केला जातो. या पंधरा दिवसांच्या सणाला खमेर भाषेत ‘चुम बेन’ असं म्हटलं जातं. या पंधरा दिवसात कंबोडियन लोक आपल्या सात पिढ्यांच्या पूर्वजांच्या मृतात्म्याला तृप्त करतात. या सणाच्या पहिल्या दिवशी नरकाची दारे उघडून सर्व भुतं बाहेर पडत असल्याचा समज आहे. त्या आत्म्यांमध्ये आपले पूर्वजही असू शकतात. त्यांना शांत करण्यासाठी ‘पॅगोडा’ म्हणजेच बौद्ध मंदिरात विधी सुरू असतात. इथं भिक्खू रात्रभर जागून पाली भाषेतील मंत्रोपचार करत, नरकाची दारे उघडणारा राजा ‘यम’ आणि ‘आत्म्यांना’ आवाहन करतात. इथं आत्म्यांना भाताचा नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य आत्म्यापर्यंत पोहोचवण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली म्हणजे मंदिरातील भिक्खूंना हा नैवेद्य खाऊ घालायचा. पोटभर जेवून भिक्खूचा आत्मा तृप्त झाला, की मग आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त झाल्याचं समजायचं. दुसऱ्या पद्धतीत भातानं भरलेलं भांडं हवेत उडवत आत्म्यांना आवाहन केलं जातं. यामुळे आत्म्यांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय, डायरेक्ट नैवेद्य पोहोचतो. हा प्रसाद खाऊन पूर्वजांचे आत्मे शांत होतात. या सणावरून मला आपल्याकडील पितृ पंधरवड्याची आठवण आली. किती साम्य आहे ना, आपल्या आणि कंबोडियाच्या सणांमध्ये? या कंबोडियन पितृ पंधरवड्यात तीन दिवस राष्ट्रीय सुट्टी असते. पितृ पंधरवड्यात सुट्टी देणाऱ्या देशाचं खरंच अप्रूप वाटलं.

शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित दोन महत्त्वाचे सण कंबोडियात साजरे केले जातात. पहिला म्हणजे भात पेरणीचा सण. या सणात राजा किंवा राजवंशातील प्रतिनिधी आपल्या बायकोसह शेतात भात पेरणी करतो. या सणात यंदा पाऊसपाणी कसा असेल आणि शेतमालाला भाव मिळेल का याचे अंदाज वर्तवला जातो. संपूर्ण देश या शाही सणात सामील होतो. या सणालाही राष्ट्रीय सुट्टी असते.

या व्यतिरिक्त बरेच लहानमोठे सण कंबोडियात साजरे केले जातात. किती साम्य आहे आपल्या देशाचं यांच्याशी? हे कंबोडियात फिरताना सारखं जाणवतंय. एवढी स्थित्यंतरं होऊनदेखील त्यांनी आपली संस्कृती धरून ठेवलीय. पश्‍चिमेची आस धरणाऱ्या आपल्या भारतीयांना पूर्वेकडील सांस्कृतिक भावकीची कधी जाणीव होईल? सत्तेच्या खेळात मश्गूल राजकारणी कधी या पूर्वेकडील देशांशी तुटलेली प्राचीन नाळ जोडायचा प्रयत्न करतील? असे ना उमगणारे प्रश्‍न मी माझ्या बाइकला विचारले. तिनेही ‘ढुर्रर्रर्रर्रऽऽऽ’ अशा आवाजात न समजणारं राजकीय उत्तर देऊन टाकलं. मीही न समजता सारं समजल्यासारखी मान हलवत एक्सलरेटर पिळला.

सुगीचा सण…
दुसरा शेतीचा सण म्हणजे सुगीचा मोसम संपल्यावर साजरा केला जाणारा ‘बोन ओम टोक’ सण. कंबोडियात भाताचे दोन हंगाम असतात. पहिला पावसाळी हंगाम, जो जूनपासून सुरू होऊन सहा महिन्यांनी डिसेंबरमध्ये संपतो. दुसरा हंगाम, हिवाळी म्हणजे सुका हंगाम. या हंगामात नोव्हेंबरमध्ये लागवड होते आणि तीन महिन्यात पीक काढणीला येतं. हिवाळी पीक फक्त तीन महिन्यांचं असतं. सुगीचा हंगाम आटोपल्यावर ‘चौल चाम थमे’ हा सण साजरा केला जातो. या वेळी शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीची कमाई हातात पडलेली असते. याला कंबोडियन नववर्षदेखील म्हणतात. साधारणतः १३ किंवा १४ एप्रिलला हा सुगीचा नववर्ष दिन साजरा केला जातो. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे भारतातील सुगीशी संबंधित आणि नवीन वर्षाच्या सणांचं याच्याशी साधर्म्य आहे. आपल्याकडच्या बऱ्याच राज्यात साजऱ्या केल्या जाणाऱ्या नववर्ष दिनाच्या तारखा कंबोडियाच्या नववर्षाच्या सणाशी जुळतात. उदाहरण द्यायचं असल्यास महाराष्ट्रातील ‘गुढीपाडवा’, पंजाबमधील ‘बैसाखी’, बिहार, झारखंडमधील ‘जुडे शीतल’, ईशान्य भारतातील ‘भोंगा भिऊ’, कर्नाटक, तेलंगण आणि आंध्र प्रदेशातील ‘उगाडी’, केरळ मधील ‘विष्णू’ आणि पश्‍चिम बंगालमधील ‘पोचेल बोईशाख’ हे एप्रिलमध्ये येणारे सण आणि कंबोडियाचा ‘बोन ओम टोक’ सण एकाच वेळी येतात. या सणाच्या तारखा फक्त भारतातील सणाशी मिळतात असं नाहीये, तर भारताखेरीज नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, ब्रह्मदेश, लाओस आणि थायलंड यांच्या नववर्षाशीही साधर्म्य आहे. यावरून आपली भारतीय संस्कृती कुठवर झिरपली होती, याची कल्पना येते.

कंबोडियन नववर्षाचा सण तीन दिवसाचा असतो. पहिल्या दिवसाला ‘मोहा संक्रन’ असं म्हणतात. आपल्या मकर संक्रांतीशी किती मिळताजुळता आहे ना? हा शब्द संस्कृतमधील ‘महा संक्रांती’ वरून आलाय. या दिवशी नवीन कपडे घालून लोक मंदिरात जातात, तिथं दिवा, मेणबत्त्या आणि अगरबत्त्या लावतात. बुद्धाला तीनदा वाकून नमस्कार करतात. तिथल्या पवित्र तीर्थानं सकाळी तोंड धुतात, दुपारी ते छातीला लावतात आणि रात्री झोपायच्या अगोदर त्याने पाय धुतात.

दुसऱ्या दिवसाला ‘वारेक वानबत’ म्हणतात. हा धर्माचा दिवस असतो. या दिवशी नोकर, गरीब, बेघर लोकांना मदत करतात. ‘वारेक लेऊंग साक’ हा कंबोडियन नववर्षाचा तिसरा दिवस. या दिवशी भगवान बुद्धाच्या पुतळ्याला स्नान घातले जाते आणि त्याला अत्तर लावले जाते. आपल्या आईवडिलांना आणि आजीआजोबांनाही अंघोळ घालून पुण्य कमावले जाते. या सणादरम्यान वेगवेगळे देशी खेळ खेळले जातात. अशा पद्धतीने तीन दिवसांचा हा सुगीचा नववर्ष सोहळा संपन्न होतो.

त्यानंतर अजून एक सुगीचा सण कंबोडियात साजरा होतो. याला ‘वॉटर फेस्टिव्हल’ असंही म्हणतात. नोव्हेंबरमध्ये पावसाळा संपल्याच्या निमित्ताने हा सण साजरा होतो. हा जलोत्सवदेखील तीन दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी होड्यांची शर्यत असते. संध्याकाळी सहा वाजता मोठमोठाले दिवे नदीत सोडून ‘मा गोंका’ म्हणजे ‘माँ गंगा’ ची पूजा केली जाते. फटाके फोडले जातात. गंगा नदी भारतात आहे. ती कंबोडियात कशी येणार? पण इथल्या प्रथेनुसार ‘माँ गंगा’ प्रत्येक नदी, तलाव, समुद्र, खाडी आणि झऱ्यात वास करते. ती प्यायला, शेतीला आणि माशांच्या पैदाशीसाठी पाणी देते. या दिवसामुळे मला आपल्याकडील छटपूजेची आठवण झाली. या सणाच्या दुसऱ्या दिवशी चंद्राची पूजा केली जाते. या कंबोडियन ‘करवाचौथ’ला, रात्री सव्वाबाराला चंद्राची पूजा केली जाते.

News Item ID: 
820-news_story-1635511258-awsecm-463
Mobile Device Headline: 
कंबोडियातील भारतीय सण!
Appearance Status Tags: 
Section News
Worship of the dead.Worship of the dead.
Mobile Body: 

English Headline: 
agricultural news in marathi article by Dr. satilal patil
Author Type: 
External Author
डॉ. सतीलाल पाटील
भारत धरण आग दारू सकाळ वन forest बौद्ध शेती farming राजकारण politics राजकारणी चीन मात mate वर्षा varsha महाराष्ट्र maharashtra बिहार ईशान्य भारत कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ बांगलादेश लाओस थायलंड झोप समुद्र चंद्र
Search Functional Tags: 
भारत, धरण, आग, दारू, सकाळ, वन, forest, बौद्ध, शेती, farming, राजकारण, Politics, राजकारणी, चीन, मात, mate, वर्षा, Varsha, महाराष्ट्र, Maharashtra, बिहार, ईशान्य भारत, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, बांगलादेश, लाओस, थायलंड, झोप, समुद्र, चंद्र
Twitter Publish: 
Meta Keyword: 
article by Dr. satilal patil
Meta Description: 
article by Dr. satilal patil
कंबोडियात फिरताना भारताशी जुळलेली त्यांची नाळ सतत जाणवून येतेय. त्यांचे आणि आपल्या सणांतही किती साम्य आहे. इतकी स्थित्यंतरं होऊनदेखील त्यांनी आपली संस्कृती धरून ठेवलीय. पश्‍चिमेची आस धरणाऱ्या आपल्या भारतीयांना पूर्वेकडील सांस्कृतिक भावकीची कधी जाणीव होईल? हाच खरा प्रश्‍न आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X