Take a fresh look at your lifestyle.

कडधान्य साठा मर्यादेची मुदत संपली

0

पुणे : सरकारने ३१ ऑक्टोबरपर्यंत कडधान्यावर साठा मर्यादा लादली होती. त्याची मुदत रविवारी संपली, मात्र सरकारने अद्याप याबाबत कोणताही निर्णय जाहीर केला नाही. त्यामुळे बाजारात संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, सरकारच्या धोरणावर विश्वास नसल्याने व्यापारी, प्रक्रिया उद्योजक, साठेबाज मोठ्या खरेदीच्या मानसिकतेत नाहीत. सरकारच्या उद्दिष्टाप्रमाणे दिवाळीच्या काळात ग्राहकांना आता स्वस्त डाळ मिळत आहे. सरकारने पुन्हा साठा मर्यादा न लावल्यास कडधान्याच्या दराला काहीसा आधार मिळेल, डिसेंबरपर्यंत हरभरा साडेपाच हजारपर्यंत पोचवू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.  

ग्राहकांना स्वस्त डाळ मिळावी यासाठी केंद्र सरकारने ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत कडधान्यावर साठा मर्यादा लावली होती. रविवारी ही मुदत संपली असली असून व्यापारी आणि उद्योगात संभ्रमात आहे. सरकार कधी काय निर्णय घेईल, यावर विश्वास राहिला नाही. कडधान्याचे दर कमी ठेवणे आणि पुरवठा वाढविणे हे दोन उद्देश सरकारने साध्य केले. त्यातच देशात साठा मर्यादा असताना सरकारने मोठ्या प्रमाणात विदेशातून कडधान्य आयात केली. त्यामुळे देशांतर्गत बाजारात कडधान्याची उपलब्धता मोठी राहिली मात्र त्या प्रमाणात दर मिळाले नाही. उपलब्धता वाढल्याने दर दबावात होते. सरकारने साठा मर्यादेची मुदत संपल्यानंतरही मुदत वाढविली नाही किंवा कोणताही निर्णय जाहीर केला नाही. मात्र, व्यापारी आणि प्रक्रिया उद्योग जास्त साठा करण्याच्या मनःस्थितीत नसतील. करण सरकार केव्हा काय निर्णय घेईल हे सांगता येत नाही. साठा मर्यादेची तलवार नेहमी मानगुटीवर कायम असेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 
काय सांगतात डाळींचे दर 

गेल्या महिन्याच्या तुलनेत काही डाळींचे दर कमी झाले तर काही डाळींच्या दरात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. हरभरा डाळीचे दर ३० सप्टेंबरला २०२१ ला ७६.१६ रुपये होते ते ३१ ऑक्टोबरला ७५.११ रुपये झाला. तूर डाळीचे दर ३० सप्टेंबरला १०५.४७ रुपयांवर होते ते ३१ ऑक्टोबरला १०४.६५ रुपयांवर आले. उडीद डाळ १०७ रुपयांवरून १०५.८९ रुपये, मूग डाळ १०१.८५ रुपयांवरून १००.९३ रुपये, मसूर डाळ ९३.९२ रुपयांवर ९५.१० रुपयांवर पोचली. म्हणजेच गेल्या महिन्याच्या तुलनेत जवळपास सर्वच डाळींच्या दरात घट झाली. मात्र मसूरच्या दरात काहीशी वाढ झाली. 

News Item ID: 
820-news_story-1635779122-awsecm-431
Mobile Device Headline: 
कडधान्य साठा मर्यादेची मुदत संपली
Appearance Status Tags: 
Mukhya News
Cereal stocks limit expiredCereal stocks limit expired
Mobile Body: 

पुणे : सरकारने ३१ ऑक्टोबरपर्यंत कडधान्यावर साठा मर्यादा लादली होती. त्याची मुदत रविवारी संपली, मात्र सरकारने अद्याप याबाबत कोणताही निर्णय जाहीर केला नाही. त्यामुळे बाजारात संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, सरकारच्या धोरणावर विश्वास नसल्याने व्यापारी, प्रक्रिया उद्योजक, साठेबाज मोठ्या खरेदीच्या मानसिकतेत नाहीत. सरकारच्या उद्दिष्टाप्रमाणे दिवाळीच्या काळात ग्राहकांना आता स्वस्त डाळ मिळत आहे. सरकारने पुन्हा साठा मर्यादा न लावल्यास कडधान्याच्या दराला काहीसा आधार मिळेल, डिसेंबरपर्यंत हरभरा साडेपाच हजारपर्यंत पोचवू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.  

ग्राहकांना स्वस्त डाळ मिळावी यासाठी केंद्र सरकारने ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत कडधान्यावर साठा मर्यादा लावली होती. रविवारी ही मुदत संपली असली असून व्यापारी आणि उद्योगात संभ्रमात आहे. सरकार कधी काय निर्णय घेईल, यावर विश्वास राहिला नाही. कडधान्याचे दर कमी ठेवणे आणि पुरवठा वाढविणे हे दोन उद्देश सरकारने साध्य केले. त्यातच देशात साठा मर्यादा असताना सरकारने मोठ्या प्रमाणात विदेशातून कडधान्य आयात केली. त्यामुळे देशांतर्गत बाजारात कडधान्याची उपलब्धता मोठी राहिली मात्र त्या प्रमाणात दर मिळाले नाही. उपलब्धता वाढल्याने दर दबावात होते. सरकारने साठा मर्यादेची मुदत संपल्यानंतरही मुदत वाढविली नाही किंवा कोणताही निर्णय जाहीर केला नाही. मात्र, व्यापारी आणि प्रक्रिया उद्योग जास्त साठा करण्याच्या मनःस्थितीत नसतील. करण सरकार केव्हा काय निर्णय घेईल हे सांगता येत नाही. साठा मर्यादेची तलवार नेहमी मानगुटीवर कायम असेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 
काय सांगतात डाळींचे दर 

गेल्या महिन्याच्या तुलनेत काही डाळींचे दर कमी झाले तर काही डाळींच्या दरात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. हरभरा डाळीचे दर ३० सप्टेंबरला २०२१ ला ७६.१६ रुपये होते ते ३१ ऑक्टोबरला ७५.११ रुपये झाला. तूर डाळीचे दर ३० सप्टेंबरला १०५.४७ रुपयांवर होते ते ३१ ऑक्टोबरला १०४.६५ रुपयांवर आले. उडीद डाळ १०७ रुपयांवरून १०५.८९ रुपये, मूग डाळ १०१.८५ रुपयांवरून १००.९३ रुपये, मसूर डाळ ९३.९२ रुपयांवर ९५.१० रुपयांवर पोचली. म्हणजेच गेल्या महिन्याच्या तुलनेत जवळपास सर्वच डाळींच्या दरात घट झाली. मात्र मसूरच्या दरात काहीशी वाढ झाली. 

English Headline: 
Agriculture news in marathi, Cereal stocks limit expired
Author Type: 
External Author
अनिल जाधव
पुणे सरकार government कडधान्य व्यापार दिवाळी डाळ तूर तूर डाळ उडीद मूग
Search Functional Tags: 
पुणे, सरकार, Government, कडधान्य, व्यापार, दिवाळी, डाळ, तूर, तूर डाळ, उडीद, मूग
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Cereal stocks limit expired
Meta Description: 
Cereal stocks limit expired
पुणे : सरकारने ३१ ऑक्टोबरपर्यंत कडधान्यावर साठा मर्यादा लादली होती. त्याची मुदत रविवारी संपली, मात्र सरकारने अद्याप याबाबत कोणताही निर्णय जाहीर केला नाही. त्यामुळे बाजारात संभ्रमाचे वातावरण आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X