कथित अफवेचा टोमॅटो रोपांच्या मागणीवर परिणाम

कोल्हापूर: कोरोनापेक्षा घातक व्हायरस टोमॅटोवर आल्याच्या पसरलेल्या कथित अफवेचा विपरीत परिणाम टोमॅटो रोपांच्या मागणीवर झाला आहे. बाजारपेठांमध्ये टोमॅटोची मागणी व दर घसरल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांनी टोमॅटो रोपांची लागवडच रद्द केली आहे. अनेक रोपवाटिकांमध्ये टोमॅटोची रोपे तयार असूनसुद्धा मागणीअभावी पडून राहिल्याने रोपवाटिका चालक हवालदिल झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या रोपवाटिकांमधून केवळ पंचवीस टक्के रोपांची विक्री झाली आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी मे महिन्यात विविध रोपवाटिकांमधून स्थानिक लागवडीसाठी सुमारे एक कोटींहून अधिक रोपांची विक्री होत असते. यंदा मे महिन्याचा उत्तरार्ध सुरु झाला तरी विक्रीने गती घेतली नाही. गेल्या आठ, दहा दिवसांत तर पूर्व नोंदणी केलेले शेतकरीच व्हायरसच्या अफवेचा उल्लेख करीत रोपांची मागणी रद्द करत आहेत. यामुळे यंदा टोमॅटोच्या लागवडीतही मोठी घट होण्याची शक्‍यता आहे. 

गेल्या पंधरा दिवसांपासून टोमॅटो उत्पादकांची स्थिती बिकट बनली आहे. टोमॅटोवर रोग आल्याने अगोदरच उत्पादकाला टोमॅटोचे व्यवस्थापन करणे अशक्‍य बनत होते. यातच माध्यमामध्ये उलट सुलट बातम्या आल्याने याचा मोठा परिणाम मोठ्या बाजारपेठांवर झाला. सर्वच बाजारपेठांमधून एक तर टोमॅटोची विक्री घटली तर दुसरीकडे दरातही मोठी घसरण झाली. याचा फटका नव्याने टोमॅटो लागवड करणाऱ्या उत्पाकांच्या मनौधैर्यालाही बसला 

पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भाजीपाला उत्पादक संघांनी धोका पत्करुन टोमॅटो अहमदाबादच्या बाजारपेठेत पाठविले. पण तिथेही टोमॅटो उतरुन घेण्यासाठीही अडचणी आल्या. उत्पादन खर्चही निघाला नाही. स्थानिक बाजारपेठेत तर दर नाहीच पण परराज्यातही मागणी नसल्याने उत्पादक अडचणीत आले. परिणामी त्यांनी मे महिन्यातील टोमॅटो लागवड रद्द केली आहे. 

रोपवाटिका चालकांची गोची 
लॉकडाउनमुळे बियाणे, कोकोपीट, ट्रे उपलब्धता होत नव्हती. परंतू तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये सुट मिळाल्याने रोपवाटिका चालकांनी गडबडीने कच्चा माल उपलब्ध करुन मागणी इतकी रोपे तयार करण्यास प्राधान्य दिले. उपलब्ध मनुष्यबळाचा जास्तीत जास्त वापर करुन शेतकऱ्यांना वेळेत रोपे पाठविण्याची तयारी केली. पण अचानक व्हायरसच्या अफवेचा विपरीत परिणाम झाल्याने सगळेच समीकरण बिघडले. या रोपांचे काय करायचे? या चिंतेत रोपवाटिका चालक आहेत. 
 
News Item ID: 
820-news_story-1590159626-556
Mobile Device Headline: 
कथित अफवेचा टोमॅटो रोपांच्या मागणीवर परिणाम
Appearance Status Tags: 
Tajya News
tomato-plants tomato-plants
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in Marathi tomato plants demand decreased to Rumors of a virus Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
टोमॅटो व्हायरस कोल्हापूर महाराष्ट्र चालक शेतकरी
Search Functional Tags: 
टोमॅटो, व्हायरस, कोल्हापूर, महाराष्ट्र, चालक, शेतकरी
Twitter Publish: 
Meta Keyword: 
tomato plants demand decreased to Rumors of a virus
Meta Description: 
tomato plants demand decreased to Rumors of a virus
टोमॅटो व्हायरसबाबत पसरलेल्या अफवेचा विपरीत परिणाम टोमॅटो रोपांच्या मागणीवर झाला आहे. बाजारपेठांमध्ये टोमॅटोची मागणी व दर घसरल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांनी टोमॅटो रोपांची लागवडच रद्द केली आहे.Source link

Leave a Comment

X