करडईवरील मावा किडीचे नियंत्रण

करडई पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या व फुलोरा स्थितीमध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येते.

मावा (शास्त्रीय नाव : Uroleucon compositae Th.)
या किडीच्या प्रादुर्भावास पेरणीनंतर ३५ ते ४० दिवसांनी सुरुवात होते. पुढे ५५ ते ६० दिवसांनी प्रादुर्भावाचे प्रमाण सर्वाधिक असते. मावा कीड सुरुवातीस झाडाच्या कोवळ्या भागावर रस शोषते. पुढे संपूर्ण झाडावर आढळते. पिकाच्या फुलोरा अवस्थेमध्ये माव्याचा अधिक प्रादुर्भाव आढळतो. परिणामी, फुले व बोंडे कमी लागतात. उत्पादनात घट येते. तीव्र प्रादुर्भाव स्थितीमध्ये झाडे वाळतात.

ओळख 

 • काळा रंग, मृदू, अर्धगोलाकार शरीर आणि पाठीमागे असलेल्या दोन शिंगांमुळे सहज ओळखता येतो.
 • पंख असलेला मावा करडई पिकावर प्रामुख्याने सुरुवातीला व पीक परिपक्वतेच्या वेळी आढळतो.
 • ही कीड नर-मादी संयोगाशिवाय सरळ पिलांना जन्म देऊन पुनरुत्पादन करते.
 • प्रौढ मादी सुमारे ३० पिलांना जन्म देते. ७ ते ९ दिवसांत पिलांची वाढ पूर्ण होते.
 • अधिक प्रजनन क्षमता आणि पिढी पूर्ण होण्याचा कमी कालावधी, यामुळे थोडे दुर्लक्ष झाले तरी किडीची तीव्रता वाढते.
 • या किडीच्या शरीरातून स्रवणाऱ्या साखरेसारख्या चिकट द्रवावर पुढे काळी बुरशी वाढते. परिणामी, झाडाच्या प्रकाश संश्‍लेषण प्रक्रियेत बाधा येऊन वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
 • उत्पादनात ५५ ते ८० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते.

एकात्मिक कीड नियंत्रण 

 • पेरणीची वेळ पाळणे महत्त्वाची. करडई पेरणी वेळेवर (सप्टेंबरअखेर ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यांपर्यंत) केल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो. पेरणीस जसजसा उशीर होतो, तसा माव्याचा प्रादुर्भाव वाढत जातो.
 • शेताजवळील ग्लिरिसिडीया, हॉलीओक, चंदन बटवा गवत, तांदुळजा, दुधी, पाथरी व काचमांडा या पर्यायी यजमान तणांचा नाश करावा.
 • एक कोळपणी आणि एक खुरपणी करून शेत तणविरहित ठेवावे.
 • मावा किडीवर जगणाऱ्या लेडी बर्ड भुंगेरे (ढाल किडे) आणि क्रायसोपा यांचे रक्षण व संवर्धन करावे.

प्रतिबंधात्मक उपाय 
किडीचा प्रादुर्भाव शेताच्या बाजूने होऊन आत पसरत जातो. तो रोखण्यासाठी पेरणीनंतर ३० दिवसांनी शेतातील बाजूच्या ४ ओळींवर (१८० सें.मी.) डायमिथोएट (३० ई. सी.) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे एक फवारणी करावी.

आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीपेक्षा अधिक (सरासरी ३० टक्के झाडावर) प्रादुर्भाव आढळल्यास,
नियंत्रणासाठी फवारणी (प्रमाण प्रति लिटर पाणी)
– निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा कडूनिंब आधारित कीटकनाशक (ॲझाडिरेक्टिन १० हजार पीपीएम) ३ मि.लि. किंवा
– डायमिथोएट (३० ई. सी.) १.२ मि.लि.

– योगेश मात्रे, ७३८७५२१९५७
डॉ. पी. आर. झंवर, ७५८८१५१२४४

(लेखक डॉ. झंवर कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, येथे सहयोगी प्राध्यापक असून, योगेश मात्रे हे पीएच.डी. चे विद्यार्थी आहेत.)

News Item ID: 
820-news_story-1641818825-awsecm-196
Mobile Device Headline: 
करडईवरील मावा किडीचे नियंत्रण
Appearance Status Tags: 
Section News
Infestation of aphids on safflower.
Mobile Body: 

English Headline: 
agricultural news in marathi Control of aphids on safflower
Author Type: 
External Author
योगेश मात्रे, डॉ. पी. आर. झंवर
स्त्री तण weed कीटकनाशक लेखक विभाग sections कृषी विद्यापीठ agriculture university
Search Functional Tags: 
स्त्री, तण, weed, कीटकनाशक, लेखक, विभाग, Sections, कृषी विद्यापीठ, Agriculture University
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Control of aphids on safflower
Meta Description: 
Control of aphids on safflower
करडई पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या व फुलोरा स्थितीमध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येते.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment