कांदा बाजार लवकरच सुरू करण्यासाठी सुप्रिया सुळेंकडून पाठपुरावा सुरु


लॉकडाउनमुळे पुणे व नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणच्या बाजार समित्या बंद आहेत. कांदा बाजार बंद असल्यामुळे शेतकरी खूप अडचणीत आहेत. आता हा कांडा कुठे विकावा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. तसेच यामुळे त्यांचे खूप नुकसान होत आहे. या सर्व गोष्टींमुळे याची तक्रार शेतकरी भागवत दाभाडे पाटील यांनी शासनाने तातडीने कांद्यासाठी बाजार समित्या सुरु कराव्यात यासाठी खासदार सुळे यांच्याकडे व्टिटरद्वारे केली होती.

कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या मागणासाठी विभागीय उपायुक्त यांना निवेदन

यावर खासदार सुळे यांनी या तक्रारींची तातडीने दखल घेतली. त्यांनी कांद्यासाठी बाजार समित्या सुरू करण्याकरिता पाठपुरावा सुरू असल्याचे देखील म्हटले आहे.  याबाबत खासदार सुळे यांनी व्टिटरद्वारे म्हटले आहे, की नगर जिल्ह्यातील कांदा बाजार सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे, नगर, संगमनेर, कोपरगाव आणि श्रीरामपूर हे बाजार सुरू आहेत. उर्वरित राहुरी आणि घोडेगाव येथील बाजार देखील लवकरच सुरू होतील.

अखेर जाग आली, इम्तियाज जलील यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली

महत्वाच्या बातम्या –

चुकीच्या बातमीचा टॉमेटोला फटका; कोट्यावधींचे नुकसान, उत्पादक चिंतेत..!

झारीतील शुक्राचार्य कोण आहेत ? ऊसतोड मजुरांसाठी पंकजा मुंडे आक्रमक





Source link

Leave a Comment

X