किमान तापमान घटण्यास सुरुवात

संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातील हवेचे दाब वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतके असून, शुक्रवार (ता.२९) पर्यंत हवेचे दाब १०१३ हेप्टापास्कलपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. तापमानात घट होताच, हवेचे दाब वाढतात. या नियमानुसार शुक्रवार (ता.२९) पासून महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागेल.

दक्षिण कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आज आणि उद्या हवामान अंशतः ढगाळ राहील. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्य व आग्नेयेकडून राहील. सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल. वाऱ्याचा ताशी वेग सर्वसाधारणच राहील.

उद्या नाशिक, धुळे व नंदूरबार तसेच कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अत्यल्प म्हणजेच ३ ते ५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. मात्र पाऊस होईलच याची शाश्‍वती नाही. कमाल तापमानातही घसरण्यास सुरुवात होईल.

शुक्रवार (ता.२९) पासून मध्य भारत व उत्तर भारतात थंडी आणि धुके जाणवण्यास सुरुवात होईल. मराठवाड्यामध्ये किमान तापमानात वेगाने घसरण होण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. उर्वरित मराठवाड्यातील जिल्ह्यांत व पश्‍चिम विदर्भात किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल.

कोकण 
कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. मात्र रायगड व ठाणे जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ४५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील. उद्या रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात ३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे.

उत्तर महाराष्ट्र 
नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात ५५ टक्के, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ७४ ते ७७ टक्के, तर नाशिक जिल्ह्यात ८१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३४ टक्के इतकी कमी राहील. हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ कि.मी. आणि दिशा नैर्ऋत्येकडून राहील. नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत अल्पशा प्रमाणात म्हणजे ३ ते ५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे.

मराठवाडा 
सर्वच जिल्ह्यांत किमान तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग लातूर व औरंगाबाद जिल्ह्यांत ५ ते ६ कि.मी., तर उर्वरित जिल्ह्यांत २ ते ४ कि.मी. इतका कमी राहील. कमाल तापमान जालना जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर नांदेड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस. उर्वरित बीड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, तर नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता औरंगाबाद जिल्ह्यात ७१ टक्के, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ५६ ते ५८ टक्के व उर्वरित उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यांत ६४ ते ६६ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ 
कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस तर बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअसपर्यंत राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ६३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग अमरावती जिल्ह्यात ६ कि.मी, तर उर्वरित जिल्ह्यांत २ ते ३ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

मध्य विदर्भ 
यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६४ टक्के, तर दुपारची ३७ ते ४० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील.

पूर्व विदर्भ 
कमाल तापमान गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस तर उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात ते २१ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ७६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर जिल्ह्यात ४४ टक्के व उर्वरित गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३१ ते ३७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र 
कमाल तापमान नगर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर सांगली जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यांत ते २१ अंश सेल्सिअस आणि नगर जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यांत ६२ ते ७३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ४१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. कोल्हापूर, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत उद्या ३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे.

कृषी सल्ला 

  •  हरभरा व बागायती रब्बी ज्वारीच्या पेरणीसाठी हवामान अनुकूल बनले आहे. तसेच जवसाची पेरणीही उरकून घ्यावी. पेरणीनंतर सारे व पाट पाडावेत.
  •  कोकणात भात कापणी, झोडणीसाठी हवामान अनुकूल बनले असून, भाताची काढणी व मळणी करावी.
  •  विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात कापूस वेचणीसाठी हवामान अनुकूल आहे. सकाळच्या वेळी कापूस वेचणी करावी.

News Item ID: 
820-news_story-1634995224-awsecm-722
Mobile Device Headline: 
किमान तापमान घटण्यास सुरुवात
Appearance Status Tags: 
Section News
weekly weatherweekly weather
Mobile Body: 

English Headline: 
agricultural news in marathi weekly weather by Dr. ramchadra sabale
Author Type: 
External Author
डॉ. रामचंद्र साबळे
Twitter Publish: 
Meta Keyword: 
weekly weather by Dr. ramchadra sabale
Meta Description: 
weekly weather by Dr. ramchadra sabale
संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातील हवेचे दाब वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतके असून, शुक्रवार (ता.२९) पर्यंत हवेचे दाब १०१३ हेप्टापास्कलपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. तापमानात घट होताच, हवेचे दाब वाढतात. या नियमानुसार शुक्रवार (ता.२९) पासून महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागेल.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X