[ad_1]
परभणी ः ‘‘बदलत्या हवामानाचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे. नैसर्गिक संसाधनांचा संतुलित वापर करून सेंद्रिय निविष्ठांचा शास्त्रोक्त वापर करणे आवश्यक आहे. रासायनिक निविष्ठांचा अवाजवी वापर न करता एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब करावा लागेल. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापनाची कास धरावी लागेल. तरच शेतीत शाश्वतता शक्य होईल. शेतकरी आर्थिकदृष्टया सक्षम होतील,’’ असे प्रतिपादन अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीअंतर्गत परभणी चाप्टर ऑफ इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रोनॉमी कृषीविद्यातर्फे शुक्रवारी (ता. २५ ) ‘शाश्वत शेती- सद्यःस्थिती व भविष्यातील वाटचाल’ या विषयावर डॉ. भाले यांचे व्याख्यान झाले. शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, माजी शिक्षण संचालक डॉ. एम. व्ही.ढोबळे, कृषीविद्या विभाग प्रमुख डॉ. भगवान आसेवार, माजी प्राध्यापक डॉ. ए. एन. गिरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. गोखले म्हणाले, ‘‘कृषिविद्या शाखेतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून सोसायटीद्वारे २०१९ पासून प्रतिवर्षी सुवर्णपदक देण्यात येत आहे.’’
डॉ. आर. ए. गायकवाड, डॉ. के. टी. जाधव आदी कृषिविद्या विषयातील माजी प्राध्यापक व शास्त्रज्ञांना कृषी विद्यापीठातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. डॉ. डब्लु. एन. नारखेडे, डॉ. ए. एस. कारले, डॉ. ए. एस. जाधव, डॉ. एस. बी. पवार, डॉ. पी. एन. करंजीकर आदी उपस्थित होते.

[ad_2]
Source link