कुलगुरूंनी जाणली कडवंचीतील पाणलोट क्षेत्राची माहिती

जालना  : खरपुडी येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळ संलग्न कृषी विज्ञान केंद्रातर्फे विकसित, आदर्श ठरलेल्या कडवंची पाणलोटास परभणी येथील वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी शुक्रवारी (ता. १२) प्रत्यक्ष भेट देऊन माहिती जाणून घेतली.

‘केव्हीके’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने, कृषी अभियंता पंडित वासरे, मृदशास्त्रज्ञ राहुल चौधरी, कडवंचीचे माजी सरपंच चंद्रकांत क्षीरसागर उपस्थित होते. डॉ. ढवण यांनी आपल्या भेटीत कडवंचीचा पाणलोट नकाशा समजून घेतला. पाणलोटाचे विविध उपचार जसे बांधबंदिस्ती, सीसीटी, वनीकरण, सिमेंट नाला बांध आदी कामांना त्यांनी भेटी दिल्या.  

कडवंचीचे एकूण पाणलोट क्षेत्र १८०० हेक्टर आहे. मृद व जल संधारणाद्वारे सुपीक माती वाहून जाणे थांबले आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उत्पादकतेत वाढ झाली आहे. पीक पद्धतीत बदल होऊन द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, पेरू, कांदा, भाजीपाला यासारखी पिके शेतकरी घेत आहेत.

एकट्या कडवंचीत १५०० एकरवर द्राक्षबागा आहेत. ६०० च्या वर शेततळी आहेत. शेजारील नंदापूर, नाव्हा, वरुड, धारकल्याण, पिरकल्याण, बोरखेडीसह १० ते १५ गावात या मॉडेलचे अनुकरण करून सुमारे ५००० एकर क्षेत्रावर द्राक्ष लागवड झाली आहे. कडवंचीची द्राक्षे दिल्ली व इतर मोठ्या बाजारपेठेत पाठविली जात आहेत. 

पाच टन द्राक्षे ‘विकेल ते पिकेल’ अभियानाअंतर्गत कृषी विभागाच्या मदतीने नुकतीच दिल्ली मार्केटला पाठविल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. कडवंची पाणलोटातील नावीन्यपूर्ण पद्धतींचा समावेश कृषी विभागाद्वारे एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमात केला. इतर अनेक गावांत त्याचे अनुकरण करण्यात आले. 

News Item ID: 
820-news_story-1615810554-awsecm-832
Mobile Device Headline: 
कुलगुरूंनी जाणली कडवंचीतील पाणलोट क्षेत्राची माहिती
Appearance Status Tags: 
Tajya News
The Vice-Chancellor came to know about the catchment area of ​​KadvanchiThe Vice-Chancellor came to know about the catchment area of ​​Kadvanchi
Mobile Body: 

जालना  : खरपुडी येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळ संलग्न कृषी विज्ञान केंद्रातर्फे विकसित, आदर्श ठरलेल्या कडवंची पाणलोटास परभणी येथील वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी शुक्रवारी (ता. १२) प्रत्यक्ष भेट देऊन माहिती जाणून घेतली.

‘केव्हीके’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने, कृषी अभियंता पंडित वासरे, मृदशास्त्रज्ञ राहुल चौधरी, कडवंचीचे माजी सरपंच चंद्रकांत क्षीरसागर उपस्थित होते. डॉ. ढवण यांनी आपल्या भेटीत कडवंचीचा पाणलोट नकाशा समजून घेतला. पाणलोटाचे विविध उपचार जसे बांधबंदिस्ती, सीसीटी, वनीकरण, सिमेंट नाला बांध आदी कामांना त्यांनी भेटी दिल्या.  

कडवंचीचे एकूण पाणलोट क्षेत्र १८०० हेक्टर आहे. मृद व जल संधारणाद्वारे सुपीक माती वाहून जाणे थांबले आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उत्पादकतेत वाढ झाली आहे. पीक पद्धतीत बदल होऊन द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, पेरू, कांदा, भाजीपाला यासारखी पिके शेतकरी घेत आहेत.

एकट्या कडवंचीत १५०० एकरवर द्राक्षबागा आहेत. ६०० च्या वर शेततळी आहेत. शेजारील नंदापूर, नाव्हा, वरुड, धारकल्याण, पिरकल्याण, बोरखेडीसह १० ते १५ गावात या मॉडेलचे अनुकरण करून सुमारे ५००० एकर क्षेत्रावर द्राक्ष लागवड झाली आहे. कडवंचीची द्राक्षे दिल्ली व इतर मोठ्या बाजारपेठेत पाठविली जात आहेत. 

पाच टन द्राक्षे ‘विकेल ते पिकेल’ अभियानाअंतर्गत कृषी विभागाच्या मदतीने नुकतीच दिल्ली मार्केटला पाठविल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. कडवंची पाणलोटातील नावीन्यपूर्ण पद्धतींचा समावेश कृषी विभागाद्वारे एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमात केला. इतर अनेक गावांत त्याचे अनुकरण करण्यात आले. 

English Headline: 
Agriculture news in marathi The Vice-Chancellor came to know about the catchment area of ​​Kadvanchi
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
कडवंची kadvanchi परभणी parbhabi कृषी विद्यापीठ agriculture university सरपंच वन forest द्राक्ष डाळिंब सीताफळ custard apple पूर floods कृषी विभाग agriculture department
Search Functional Tags: 
कडवंची, Kadvanchi, परभणी, Parbhabi, कृषी विद्यापीठ, Agriculture University, सरपंच, वन, forest, द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, Custard Apple, पूर, Floods, कृषी विभाग, Agriculture Department
Twitter Publish: 
Meta Keyword: 
The Vice-Chancellor came to know about the catchment area of ​​Kadvanchi
Meta Description: 
The Vice-Chancellor came to know about the catchment area of ​​Kadvanchi
जालना  : खरपुडी येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळ संलग्न कृषी विज्ञान केंद्रातर्फे विकसित, आदर्श ठरलेल्या कडवंची पाणलोटास परभणी येथील वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी शुक्रवारी (ता. १२) प्रत्यक्ष भेट देऊन माहिती जाणून घेतली.Source link

Leave a Comment

X