Take a fresh look at your lifestyle.

कृषिपंप थकबाकीमुक्तीसाठी  ४ हजार कोटी रुपयांच्या माफीची संधी 

0

पुणे ः कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील १२ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील २ हजार ६४४ कोटी ७७ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. तर या शेतकऱ्यांनी चालू वीजबिल व सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा येत्या मार्च २०२२पर्यंत भरणा केल्यास आणखी तब्बल ४ हजार ३ कोटी रुपयांची माफी मिळणार आहे. 

दरम्यान वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेत सहभाग नाही व चालू वीजबिलांचा देखील भरणा नाही, अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करण्यात येत आहे. महावितरणवरील आर्थिक संकट अतिशय गंभीर असल्यामुळे शेतकऱ्यांनी किमान चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या कृषिपंप वीजजोडणी धोरणातून कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील १२ लाख ५० हजार ६८५ शेतकऱ्यांकडे १० हजार ८४१ कोटी रुपयांची मूळ थकबाकी होती. त्यातील २ हजार ६४४ कोटी ७७ लाख रुपये महावितरणकडून सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट द्वारे माफ करण्यात आले आहे. तसेच वीजबिलांच्या दुरुस्तीद्वारे १८९ कोटी ६८ लाख रुपये समायोजित करण्यात आले आहेत. आता या शेतकऱ्यांकडे ८ हजार ७ कोटींची सुधारित थकबाकी आहे. येत्या मार्च २०२२पर्यंत त्यातील ५० टक्के म्हणजे ४ हजार ३ कोटी ५० लाख रुपये व चालू वीजबिलांचा भरणा केल्यास उर्वरित ४ हजार ३ कोटी ५० लाख रुपये देखील माफ करण्यात येणार आहेत. 

पश्‍चिम महाराष्ट्रात प्रतिसाद 
आतापर्यंत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील ५ लाख ५२ हजार २७६ शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यांनी ३५९ कोटी २७ लाखांचे चालू वीजबिल व ४०९ कोटी ९५ लाख रुपयांच्या सुधारित थकबाकीचा भरणा केला आहे. या सर्व शेतकऱ्यांचे धोरणानुसार व्याज व दंड माफी, सूट तसेच वीजबिल दुरुस्ती समायोजन आणि ५० टक्के थकबाकी माफीचे एकूण १४५२ कोटी ७० लाख रुपये माफ करण्यात आले आहे. या योजनेमध्ये बारामती परिमंडलातील ३ लाख ७६ हजार ९०४, कोल्हापूर परिमंडलातील १ लाख ४२ हजार ६८९ आणि पुणे परिमंडलातील ३२ हजार ६८३ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. 

१ लाख ८० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे 
या योजनेचा लाभ घेत पश्‍चिम महाराष्ट्रातील १ लाख ८० हजार ५२२ शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले आहेत. या शेतकऱ्यांकडे ५६१ कोटी ९९ लाख रुपयांची सुधारित थकबाकी होती. त्यांनी ९५ कोटी १२ लाख रुपये चालू वीजबिल व ५० टक्के थकबाकीचे २८१ कोटींचा भरणा केला व वीजबिल कोरे केले. यात उर्वरित ५० टक्के थकबाकीचे २८१ कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. या योजनेतून बारामती परिमंडलातील ८३ हजार ५७६, कोल्हापूर परिमंडल- ८३ हजार १९२ आणि पुणे परिमंडलातील १३ हजार ७५४ शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत.  

News Item ID: 
820-news_story-1637074524-awsecm-698
Mobile Device Headline: 
कृषिपंप थकबाकीमुक्तीसाठी  ४ हजार कोटी रुपयांच्या माफीची संधी 
Appearance Status Tags: 
Mukhya News
For relief of agricultural pump arrears Opportunity for amnesty of Rs 4,000 croreFor relief of agricultural pump arrears Opportunity for amnesty of Rs 4,000 crore
Mobile Body: 

पुणे ः कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील १२ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील २ हजार ६४४ कोटी ७७ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. तर या शेतकऱ्यांनी चालू वीजबिल व सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा येत्या मार्च २०२२पर्यंत भरणा केल्यास आणखी तब्बल ४ हजार ३ कोटी रुपयांची माफी मिळणार आहे. 

दरम्यान वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेत सहभाग नाही व चालू वीजबिलांचा देखील भरणा नाही, अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करण्यात येत आहे. महावितरणवरील आर्थिक संकट अतिशय गंभीर असल्यामुळे शेतकऱ्यांनी किमान चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या कृषिपंप वीजजोडणी धोरणातून कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील १२ लाख ५० हजार ६८५ शेतकऱ्यांकडे १० हजार ८४१ कोटी रुपयांची मूळ थकबाकी होती. त्यातील २ हजार ६४४ कोटी ७७ लाख रुपये महावितरणकडून सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट द्वारे माफ करण्यात आले आहे. तसेच वीजबिलांच्या दुरुस्तीद्वारे १८९ कोटी ६८ लाख रुपये समायोजित करण्यात आले आहेत. आता या शेतकऱ्यांकडे ८ हजार ७ कोटींची सुधारित थकबाकी आहे. येत्या मार्च २०२२पर्यंत त्यातील ५० टक्के म्हणजे ४ हजार ३ कोटी ५० लाख रुपये व चालू वीजबिलांचा भरणा केल्यास उर्वरित ४ हजार ३ कोटी ५० लाख रुपये देखील माफ करण्यात येणार आहेत. 

पश्‍चिम महाराष्ट्रात प्रतिसाद 
आतापर्यंत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील ५ लाख ५२ हजार २७६ शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यांनी ३५९ कोटी २७ लाखांचे चालू वीजबिल व ४०९ कोटी ९५ लाख रुपयांच्या सुधारित थकबाकीचा भरणा केला आहे. या सर्व शेतकऱ्यांचे धोरणानुसार व्याज व दंड माफी, सूट तसेच वीजबिल दुरुस्ती समायोजन आणि ५० टक्के थकबाकी माफीचे एकूण १४५२ कोटी ७० लाख रुपये माफ करण्यात आले आहे. या योजनेमध्ये बारामती परिमंडलातील ३ लाख ७६ हजार ९०४, कोल्हापूर परिमंडलातील १ लाख ४२ हजार ६८९ आणि पुणे परिमंडलातील ३२ हजार ६८३ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. 

१ लाख ८० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे 
या योजनेचा लाभ घेत पश्‍चिम महाराष्ट्रातील १ लाख ८० हजार ५२२ शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले आहेत. या शेतकऱ्यांकडे ५६१ कोटी ९९ लाख रुपयांची सुधारित थकबाकी होती. त्यांनी ९५ कोटी १२ लाख रुपये चालू वीजबिल व ५० टक्के थकबाकीचे २८१ कोटींचा भरणा केला व वीजबिल कोरे केले. यात उर्वरित ५० टक्के थकबाकीचे २८१ कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. या योजनेतून बारामती परिमंडलातील ८३ हजार ५७६, कोल्हापूर परिमंडल- ८३ हजार १९२ आणि पुणे परिमंडलातील १३ हजार ७५४ शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत.  

English Headline: 
Agriculture News in Marathi For relief of agricultural pump arrears Opportunity for amnesty of Rs 4,000 crore
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
महाराष्ट्र maharashtra पुणे नितीन राऊत nitin raut कोल्हापूर पूर floods सोलापूर सांगली sangli व्याज बारामती
Search Functional Tags: 
महाराष्ट्र, Maharashtra, पुणे, नितीन राऊत, Nitin Raut, कोल्हापूर, पूर, Floods, सोलापूर, सांगली, Sangli, व्याज, बारामती
Twitter Publish: 
Meta Keyword: 
For relief of agricultural pump arrears Opportunity for amnesty of Rs 4,000 crore
Meta Description: 
For relief of agricultural pump arrears
Opportunity for amnesty of Rs 4,000 crore
कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील १२ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील २ हजार ६४४ कोटी ७७ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X