कृषी पदवी घेतल्यानंतर शेतकऱ्यांसाठी काम करा

नगर ः कोरोना संसर्गाच्या काळात देशात सर्व बंद होते. सुरू होती फक्त शेती आणि शेतकऱ्यांचे कष्ट. शेतकऱ्यांनी समाजाला जोपासले. त्यामुळे विद्यापीठातून कृषीची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पुढे कोणत्याही क्षेत्रात जावे, नाव कमवावे, मात्र कृषीमधून शेतकऱ्यांसाठी काम करा. शेतकऱ्यांचे, राष्ट्राच्या हित पाहावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. विद्यापीठाचे कामकाज इंग्रजीसोबत मराठीतूनही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात गुरुवारी (ता. २८) ३५ वा पदवीदान समारंभ झाला. अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी, कृषिमंत्री दादा भुसे, जयपूर येथील महाराणा प्रताप कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू नरेंद्रसिंह राठोड, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे कुलगुरू दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकार, विद्यापीठातील अधिकारी, कार्यकारी परिषदेचे सदस्य उपस्थित होते. 

या वेळी पदवीदान समारंभात दोन वर्षांतील विविध विद्याशाखांतील १० हजार ७३६ स्नातकांना पदवी, ६२८ स्नातकांना पदव्युत्तर पदवी, तर १०४ स्नातकांना आचार्य पदवी व सुवर्ण पदके आणि रोख पारितोषिके दिली. काही प्रातिनिधीक विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

विमा योजनेत गांभीर्यपूर्वक बदल हवा ः भुसे 
कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले, ‘‘राज्यात शेतकऱ्यांसाठी विद्यापीठे, कृषी विभाग भरीव काम करत आहेत. कामकाज मात्र मराठीतून झाले पाहिजे. विमा योजनेच्या मात्र अनेक तक्रारी असल्याने विमा योजनेत मात्र महत्त्वपूर्ण बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यपाल, पवार व गडकरी साहेबांनी बैठक घेऊन आम्हाला मार्गदर्शन करावे, असे सांगतानाच महात्मा फुले कृषी विद्यापीठातून अनेक महत्त्वाचे संशोधन केले जात आहे. मात्र कर्मचारी कमी असून संशोधनाला निधीची गरज आहे. विद्यापीठातून पदवी घेतलेल्यांपैकी बहुतांश प्रशासनात अधिकारी आहेत. अन्य क्षेत्रात अधिक असले तरी शेतीत कमी जण आहेत. कृषी विद्यापीठात मुलींसाठी राखीव जागा ठेवल्या जातात. पण पदवीत यश मिळणाऱ्यांतही मुलीच पुढे आहेत. कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी भरीव काम करत आहे. भाजीपाला निर्यातीत कृषी विद्यापीठाचा मोठा सहभाग आहे. पदवीदान समारंभासाठी वापरल्या जाणाऱ्या  वस्त्रात बदल करून त्या मायभूमीची ओळख असावी असा ड्रेस करावा, असे भुसे म्हणाले.
 
News Item ID: 
820-news_story-1635434755-awsecm-629
Mobile Device Headline: 
कृषी पदवी घेतल्यानंतर शेतकऱ्यांसाठी काम करा
Appearance Status Tags: 
Mukhya News
Work for farmers after graduating in agricultureWork for farmers after graduating in agriculture
Mobile Body: 

नगर ः कोरोना संसर्गाच्या काळात देशात सर्व बंद होते. सुरू होती फक्त शेती आणि शेतकऱ्यांचे कष्ट. शेतकऱ्यांनी समाजाला जोपासले. त्यामुळे विद्यापीठातून कृषीची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पुढे कोणत्याही क्षेत्रात जावे, नाव कमवावे, मात्र कृषीमधून शेतकऱ्यांसाठी काम करा. शेतकऱ्यांचे, राष्ट्राच्या हित पाहावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. विद्यापीठाचे कामकाज इंग्रजीसोबत मराठीतूनही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात गुरुवारी (ता. २८) ३५ वा पदवीदान समारंभ झाला. अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी, कृषिमंत्री दादा भुसे, जयपूर येथील महाराणा प्रताप कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू नरेंद्रसिंह राठोड, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे कुलगुरू दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकार, विद्यापीठातील अधिकारी, कार्यकारी परिषदेचे सदस्य उपस्थित होते. 

या वेळी पदवीदान समारंभात दोन वर्षांतील विविध विद्याशाखांतील १० हजार ७३६ स्नातकांना पदवी, ६२८ स्नातकांना पदव्युत्तर पदवी, तर १०४ स्नातकांना आचार्य पदवी व सुवर्ण पदके आणि रोख पारितोषिके दिली. काही प्रातिनिधीक विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

विमा योजनेत गांभीर्यपूर्वक बदल हवा ः भुसे 
कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले, ‘‘राज्यात शेतकऱ्यांसाठी विद्यापीठे, कृषी विभाग भरीव काम करत आहेत. कामकाज मात्र मराठीतून झाले पाहिजे. विमा योजनेच्या मात्र अनेक तक्रारी असल्याने विमा योजनेत मात्र महत्त्वपूर्ण बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यपाल, पवार व गडकरी साहेबांनी बैठक घेऊन आम्हाला मार्गदर्शन करावे, असे सांगतानाच महात्मा फुले कृषी विद्यापीठातून अनेक महत्त्वाचे संशोधन केले जात आहे. मात्र कर्मचारी कमी असून संशोधनाला निधीची गरज आहे. विद्यापीठातून पदवी घेतलेल्यांपैकी बहुतांश प्रशासनात अधिकारी आहेत. अन्य क्षेत्रात अधिक असले तरी शेतीत कमी जण आहेत. कृषी विद्यापीठात मुलींसाठी राखीव जागा ठेवल्या जातात. पण पदवीत यश मिळणाऱ्यांतही मुलीच पुढे आहेत. कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी भरीव काम करत आहे. भाजीपाला निर्यातीत कृषी विद्यापीठाचा मोठा सहभाग आहे. पदवीदान समारंभासाठी वापरल्या जाणाऱ्या  वस्त्रात बदल करून त्या मायभूमीची ओळख असावी असा ड्रेस करावा, असे भुसे म्हणाले.
 
English Headline: 
Agriculture news in Marathi Work for farmers after graduating in agriculture
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नगर शेती farming agriculture मका maize मराठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university खासदार शरद पवार sharad pawar दादा भुसे dada bhuse जयपूर परभणी parbhabi agriculture department विभाग प्रशासन
Search Functional Tags: 
नगर, शेती, farming, Agriculture, मका, Maize, मराठी, महात्मा फुले, कृषी विद्यापीठ, Agriculture University, खासदार, शरद पवार, Sharad Pawar, दादा भुसे, Dada Bhuse, जयपूर, परभणी, Parbhabi, Agriculture Department, विभाग, प्रशासन
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Work for farmers after graduating in agriculture
Meta Description: 
Work for farmers after graduating in agriculture
शेतकऱ्यांचे, राष्ट्राच्या हित पाहावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. विद्यापीठाचे कामकाज इंग्रजीसोबत मराठीतूनही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X