कॉर्पोरेट कंपन्यांना सूट आणि सामान्यांची लूट ः जावंधिया

नागपूर ः मनमोहनसिंग पंतप्रधान असताना क्रूड ऑइलचे दर ११५ ते १२० डॉलर प्रति बॅरल होते. आता मात्र दर ८० ते ८५ बॅरल असताना भारतीयांना त्या वेळेपेक्षा अधिक दराने पेट्रोल-डिझेल खरेदी करावे लागत आहेत. विशेष म्हणजे शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानमध्ये डॉलरचा विनिमय दर त्यांच्या रुपयांपेक्षा अधिक असताना भारतापेक्षा पेट्रोल-डिझेल स्वस्त आहे. तेथील सरकारने अवाजवी कर लावत सामान्यांची लूट केली नाही, हेच यावरून सिद्ध होते, असा आरोप शेतीप्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी केला आहे.

जावंधिया यांच्या माहितीनुसार, आज दिल्लीत पेट्रोल १०८.२९, मुंबईत ११४.१४ रुपये प्रति लिटर आहे. दिल्लीत डिझेल ९७.०२, तर मुंबईत १०५.१२ रुपये आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल १२७.३०, तर डिझेल १२२.०४ रुपये आहे. आकडेवारीचा विचार केल्यास भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेल दर अधिक असल्याचा भास होतो. परंतु भारताचा व पाकिस्तानचा रुपया तसेच त्याच्या विनिमय दराचा विचार करता पाकिस्तानमधील दर भारतीय रुपयात स्वस्त आहेत. भारताचा एक रुपया पाकिस्तानच्या २.३२ रुपयाच्या बरोबरीचा आहे. याचाच अर्थ भारतीय रुपयात पाकिस्तानात पेट्रोलचा भाव ५४.९७ व डिझेलचा भाव ५२.९० रुपये प्रति लिटर आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे जात असताना सुद्धा पाकिस्तान सरकारने तेथील जनतेवर कर लावून वसुली केली नाही, तर जागतिक बाजारातील क्रूड ऑइलचा कमी असलेल्या दराचा फायदा जनतेला मिळावा यासाठी प्रयत्न केले. याउलट भारत सरकारने सतत अबकारी करात वाढ करून सर्व सामान्य जनतेच्या खिशातून पैसा वसूल केला आहे.

एक गरीब मजूर आपल्या घरून कामावर ये- जा करण्यासाठी एक लिटर पेट्रोल वापरत असेल तर त्याच्या खिशातून सरकार ९० रुपये रोज काढून घेत आहे. पाच किलो धान्य मोफत व ५०० रुपये महिना महिलेच्या खात्यात बस! ही योजना वगळता बाकीचा पैसा मग कोठे जात आहे, असेही जावंधिया यांनी नमूद केले आहे.

खिशात पैसे टाकण्याचे नाटक
मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा २०१४ साली १ लिटर पेट्रोलवर ९ रुपये ४८ पैसे व डिझेलवर ३.५६ रुपये कर होता. हाच कर आता पेट्रोलवर ३२ रुपये ९० पैसे, तर डिझेलवर ३१ रुपये ८० पैसे इतका आहे. भारत सरकारने तीन ते ३.५० लाख कोटी रुपये या कराच्या माध्यमातून गोळा करीत आहे. सरकारचा दावा आहे की या पैशाचा उपयोग गरिबांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांवर खर्ची घातला जात आहे. हा तर्क जरी खरा मानला तरी सरकार गरीबांच्याच एका खिशातून पैसा काढून दुसऱ्या खिशात पैसे टाकण्याचे नाटक करीत असल्याचा आरोप जावंधिया यांनी केला आहे.

News Item ID: 
820-news_story-1635690865-awsecm-881
Mobile Device Headline: 
कॉर्पोरेट कंपन्यांना सूट आणि सामान्यांची लूट ः जावंधिया
Appearance Status Tags: 
Mukhya News
Discounts to corporates and plunder of commoners: JawandhiyaDiscounts to corporates and plunder of commoners: Jawandhiya
Mobile Body: 

नागपूर ः मनमोहनसिंग पंतप्रधान असताना क्रूड ऑइलचे दर ११५ ते १२० डॉलर प्रति बॅरल होते. आता मात्र दर ८० ते ८५ बॅरल असताना भारतीयांना त्या वेळेपेक्षा अधिक दराने पेट्रोल-डिझेल खरेदी करावे लागत आहेत. विशेष म्हणजे शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानमध्ये डॉलरचा विनिमय दर त्यांच्या रुपयांपेक्षा अधिक असताना भारतापेक्षा पेट्रोल-डिझेल स्वस्त आहे. तेथील सरकारने अवाजवी कर लावत सामान्यांची लूट केली नाही, हेच यावरून सिद्ध होते, असा आरोप शेतीप्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी केला आहे.

जावंधिया यांच्या माहितीनुसार, आज दिल्लीत पेट्रोल १०८.२९, मुंबईत ११४.१४ रुपये प्रति लिटर आहे. दिल्लीत डिझेल ९७.०२, तर मुंबईत १०५.१२ रुपये आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल १२७.३०, तर डिझेल १२२.०४ रुपये आहे. आकडेवारीचा विचार केल्यास भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेल दर अधिक असल्याचा भास होतो. परंतु भारताचा व पाकिस्तानचा रुपया तसेच त्याच्या विनिमय दराचा विचार करता पाकिस्तानमधील दर भारतीय रुपयात स्वस्त आहेत. भारताचा एक रुपया पाकिस्तानच्या २.३२ रुपयाच्या बरोबरीचा आहे. याचाच अर्थ भारतीय रुपयात पाकिस्तानात पेट्रोलचा भाव ५४.९७ व डिझेलचा भाव ५२.९० रुपये प्रति लिटर आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे जात असताना सुद्धा पाकिस्तान सरकारने तेथील जनतेवर कर लावून वसुली केली नाही, तर जागतिक बाजारातील क्रूड ऑइलचा कमी असलेल्या दराचा फायदा जनतेला मिळावा यासाठी प्रयत्न केले. याउलट भारत सरकारने सतत अबकारी करात वाढ करून सर्व सामान्य जनतेच्या खिशातून पैसा वसूल केला आहे.

एक गरीब मजूर आपल्या घरून कामावर ये- जा करण्यासाठी एक लिटर पेट्रोल वापरत असेल तर त्याच्या खिशातून सरकार ९० रुपये रोज काढून घेत आहे. पाच किलो धान्य मोफत व ५०० रुपये महिना महिलेच्या खात्यात बस! ही योजना वगळता बाकीचा पैसा मग कोठे जात आहे, असेही जावंधिया यांनी नमूद केले आहे.

खिशात पैसे टाकण्याचे नाटक
मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा २०१४ साली १ लिटर पेट्रोलवर ९ रुपये ४८ पैसे व डिझेलवर ३.५६ रुपये कर होता. हाच कर आता पेट्रोलवर ३२ रुपये ९० पैसे, तर डिझेलवर ३१ रुपये ८० पैसे इतका आहे. भारत सरकारने तीन ते ३.५० लाख कोटी रुपये या कराच्या माध्यमातून गोळा करीत आहे. सरकारचा दावा आहे की या पैशाचा उपयोग गरिबांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांवर खर्ची घातला जात आहे. हा तर्क जरी खरा मानला तरी सरकार गरीबांच्याच एका खिशातून पैसा काढून दुसऱ्या खिशात पैसे टाकण्याचे नाटक करीत असल्याचा आरोप जावंधिया यांनी केला आहे.

English Headline: 
Agriculture news in Marathi Discounts to corporates and plunder of commoners: Jawandhiya
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नागपूर nagpur मनमोहनसिंग भारत डिझेल पाकिस्तान सरकार government शेती farming विजय victory दिल्ली पेट्रोल नाटक मोदी सरकार कल्याण
Search Functional Tags: 
नागपूर, Nagpur, मनमोहनसिंग, भारत, डिझेल, पाकिस्तान, सरकार, Government, शेती, farming, विजय, victory, दिल्ली, पेट्रोल, नाटक, मोदी सरकार, कल्याण
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Discounts to corporates and plunder of commoners: Jawandhiya
Meta Description: 
Discounts to corporates and plunder of commoners: Jawandhiya
शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानमध्ये डॉलरचा विनिमय दर त्यांच्या रुपयांपेक्षा अधिक असताना भारतापेक्षा पेट्रोल-डिझेल स्वस्त आहे. तेथील सरकारने अवाजवी कर लावत सामान्यांची लूट केली नाही, हेच यावरून सिद्ध होते, असा आरोप शेतीप्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी केला आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X