Take a fresh look at your lifestyle.

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

0

पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडीची चाहूल लागली असतानाच, राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

श्रीलंका आणि तमिळनाडू किनाऱ्यालगतच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने सध्या दक्षिण भारतातील राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्येही पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यत: कोरडे हवामान आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट झाली आहे. रात्री वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे अधिकच थंडी जाणवू लागली आहे. पावसाला पोषक हवामान होताच किमान तापमानात थोडीशी वाढ झाली. राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा १५ अंशांच्या वर गेला आहे. रविवारी (ता. ३१) जळगाव येथे नीचांकी १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.   

दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका कायम असून, ढगाळ हवामानामुळे उकाडाही जाणवत आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमानाचा पारा ३० ते ३४ अंशांच्या दरम्यान आहे. 

रविवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३१.३ (१६), नगर ३२.४ (-), जळगाव ३२ (१२.८), कोल्हापूर ३२.३ (२२.७), महाबळेश्‍वर २७.२ (१५.७), मालेगाव ३३ (१८), नाशिक ३०.३ (१४.२), सांगली ३४.२ (२१.८), सातारा ३१.१ (१९.७), सोलापूर ३४.२ (१९.३), सांताक्रूझ ३५.३ (२४), डहाणू ३३.८ (२२.२), रत्नागिरी ३६ (२३.९), औरंगाबाद ३०.८ (१५.२), नांदेड ३२.४ (१८.१), परभणी ३१ (१६.८), अकोला ३२.० (१६.०), अमरावती ३२ (१५.२), ब्रह्मपुरी ३३.४ (१५.३), बुलडाणा २९ (-), चंद्रपूर ३१.४ (२०), गडचिरोली ३२.४ (१८.८), गोंदिया ३०.८ (१५.८), नागपूर ३२ (१४.७), वर्धा ३१.६ (१५.६), यवतमाळ ३१.५ (१४.५). 

विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : 
कोकण :
सिंधुदुर्ग, रत्नागिरी. 
मध्य महाराष्ट्र : कोल्हापूर, सांगली, सातारा.

News Item ID: 
820-news_story-1635690126-awsecm-795
Mobile Device Headline: 
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
Appearance Status Tags: 
Mukhya News
Rainfall forecast in Konkan, Central MaharashtraRainfall forecast in Konkan, Central Maharashtra
Mobile Body: 

पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडीची चाहूल लागली असतानाच, राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

श्रीलंका आणि तमिळनाडू किनाऱ्यालगतच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने सध्या दक्षिण भारतातील राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्येही पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यत: कोरडे हवामान आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट झाली आहे. रात्री वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे अधिकच थंडी जाणवू लागली आहे. पावसाला पोषक हवामान होताच किमान तापमानात थोडीशी वाढ झाली. राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा १५ अंशांच्या वर गेला आहे. रविवारी (ता. ३१) जळगाव येथे नीचांकी १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.   

दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका कायम असून, ढगाळ हवामानामुळे उकाडाही जाणवत आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमानाचा पारा ३० ते ३४ अंशांच्या दरम्यान आहे. 

रविवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३१.३ (१६), नगर ३२.४ (-), जळगाव ३२ (१२.८), कोल्हापूर ३२.३ (२२.७), महाबळेश्‍वर २७.२ (१५.७), मालेगाव ३३ (१८), नाशिक ३०.३ (१४.२), सांगली ३४.२ (२१.८), सातारा ३१.१ (१९.७), सोलापूर ३४.२ (१९.३), सांताक्रूझ ३५.३ (२४), डहाणू ३३.८ (२२.२), रत्नागिरी ३६ (२३.९), औरंगाबाद ३०.८ (१५.२), नांदेड ३२.४ (१८.१), परभणी ३१ (१६.८), अकोला ३२.० (१६.०), अमरावती ३२ (१५.२), ब्रह्मपुरी ३३.४ (१५.३), बुलडाणा २९ (-), चंद्रपूर ३१.४ (२०), गडचिरोली ३२.४ (१८.८), गोंदिया ३०.८ (१५.८), नागपूर ३२ (१४.७), वर्धा ३१.६ (१५.६), यवतमाळ ३१.५ (१४.५). 

विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : 
कोकण :
सिंधुदुर्ग, रत्नागिरी. 
मध्य महाराष्ट्र : कोल्हापूर, सांगली, सातारा.

English Headline: 
Agriculture news in Marathi Rainfall forecast in Konkan, Central Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे थंडी हवामान कोकण konkan महाराष्ट्र maharashtra विभाग sections श्रीलंका तमिळनाडू समुद्र भारत ऊस पाऊस जळगाव jangaon कोल्हापूर पूर नाशिक nashik सांगली औरंगाबाद परभणी अकोला akola चंद्रपूर नागपूर nagpur यवतमाळ yavatmal
Search Functional Tags: 
पुणे, थंडी, हवामान, कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, विभाग, Sections, श्रीलंका, तमिळनाडू, समुद्र, भारत, ऊस, पाऊस, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, पूर, नाशिक, Nashik, सांगली, औरंगाबाद, परभणी, अकोला, Akola, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, यवतमाळ, Yavatmal
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Rainfall forecast in Konkan, Central Maharashtra
Meta Description: 
Rainfall forecast in Konkan, Central Maharashtra
​ किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडीची चाहूल लागली असतानाच, राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X