कोल्हापुरात ऊसतोडणी थांबली

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे ऊसतोडणीसह सर्व शेती कामे ठप्प झाली आहेत. बुधवारी (ता. १) सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारी (ता. २) सकाळी दहा वाजेपर्यंत संततधार सुरू होता.

मध्यम ते जोरदार झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. विशेष करून जिल्ह्यातील सर्व ऊसतोडणी बंद झाली आहे. ऊसतोडणी कामगारांच्या तात्पुरत्या खोपट्यामध्ये पाणी शिरल्याने त्यांची अवस्था बिकट झाली. सकाळी लवकर ऊसतोडणीसाठी रोज जाणारे ऊसतोडणी कामगार सकाळपासूनच खोपट्यात आलेले पाणी काढत असल्याचे केविलवाणे दृश्‍य बहुतांश ठिकाणी होते.  

ऊसतोडणी कामगारांचे धान्य, कपडे व अन्य साहित्य भिजल्याने कामगारांची अवस्था बिकट झाली. ऊसतोडणी प्लॉटमध्ये पाणी साचून राहिल्याने रस्त्याशेजारील प्लॉटमधील ही ऊसतोडणी अशक्‍य झाल्याने बहुतांशी कारखान्याकडे गुरुवारी एक ही ट्रॉली ऊस रवाना झाला नाही. ऊसतोडणीच्या नियोजनाऐवजी कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी कारखान्याचे ऊस विकास विभागाचे कर्मचारी दिवसभर प्रयत्नशील होते. 

पुढील दोन दिवस जर पाऊस नाही झाला तरच दोन दिवसांनंतर थोड्या थोड्या प्रमाणात ऊसतोडणी सुरू होईल. अन्यथा, किमान सप्ताहभर तरी ऊसतोडणीचा कार्यक्रम नियमित सुरू होणे अशक्य असल्याचे साखर कारखाना सूत्रांनी सांगितले. जवळ जवळ शंभर टक्के ऊसतोडणी थांबल्याने साखर कारखान्यामध्ये एक दोन दिवस गाळपच होऊ शकणार नाही अशी स्थिती आहे. दरम्यान, अति पावसाचा फटका गहू व हरभरा पिकाला बसला आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने व सातत्याने पाऊस झाल्याने गहू व हरभरा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

सातत्यपूर्ण पावसाचा फटका गहू, हरभरा या रब्बी पिकांना बसणार आहे. ज्वारीला मात्र हा पाऊस उपयुक्त आहे. पण अतिपाऊस हा सगळ्याच पिकांना घातक ठरत असल्याने रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
– जयवंत जगताप, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे.

News Item ID: 
820-news_story-1638457264-awsecm-660
Mobile Device Headline: 
कोल्हापुरात ऊसतोडणी थांबली
Appearance Status Tags: 
Mukhya News
Sugarcane harvesting stopped in KolhapurSugarcane harvesting stopped in Kolhapur
Mobile Body: 

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे ऊसतोडणीसह सर्व शेती कामे ठप्प झाली आहेत. बुधवारी (ता. १) सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारी (ता. २) सकाळी दहा वाजेपर्यंत संततधार सुरू होता.

मध्यम ते जोरदार झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. विशेष करून जिल्ह्यातील सर्व ऊसतोडणी बंद झाली आहे. ऊसतोडणी कामगारांच्या तात्पुरत्या खोपट्यामध्ये पाणी शिरल्याने त्यांची अवस्था बिकट झाली. सकाळी लवकर ऊसतोडणीसाठी रोज जाणारे ऊसतोडणी कामगार सकाळपासूनच खोपट्यात आलेले पाणी काढत असल्याचे केविलवाणे दृश्‍य बहुतांश ठिकाणी होते.  

ऊसतोडणी कामगारांचे धान्य, कपडे व अन्य साहित्य भिजल्याने कामगारांची अवस्था बिकट झाली. ऊसतोडणी प्लॉटमध्ये पाणी साचून राहिल्याने रस्त्याशेजारील प्लॉटमधील ही ऊसतोडणी अशक्‍य झाल्याने बहुतांशी कारखान्याकडे गुरुवारी एक ही ट्रॉली ऊस रवाना झाला नाही. ऊसतोडणीच्या नियोजनाऐवजी कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी कारखान्याचे ऊस विकास विभागाचे कर्मचारी दिवसभर प्रयत्नशील होते. 

पुढील दोन दिवस जर पाऊस नाही झाला तरच दोन दिवसांनंतर थोड्या थोड्या प्रमाणात ऊसतोडणी सुरू होईल. अन्यथा, किमान सप्ताहभर तरी ऊसतोडणीचा कार्यक्रम नियमित सुरू होणे अशक्य असल्याचे साखर कारखाना सूत्रांनी सांगितले. जवळ जवळ शंभर टक्के ऊसतोडणी थांबल्याने साखर कारखान्यामध्ये एक दोन दिवस गाळपच होऊ शकणार नाही अशी स्थिती आहे. दरम्यान, अति पावसाचा फटका गहू व हरभरा पिकाला बसला आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने व सातत्याने पाऊस झाल्याने गहू व हरभरा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

सातत्यपूर्ण पावसाचा फटका गहू, हरभरा या रब्बी पिकांना बसणार आहे. ज्वारीला मात्र हा पाऊस उपयुक्त आहे. पण अतिपाऊस हा सगळ्याच पिकांना घातक ठरत असल्याने रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
– जयवंत जगताप, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे.

English Headline: 
Agriculture news in Marathi Sugarcane harvesting stopped in Kolhapur
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
कोल्हापूर ऊस पाऊस साहित्य literature विकास विभाग sections साखर गहू wheat कृषी विभाग agriculture department ज्वारी jowar
Search Functional Tags: 
कोल्हापूर, ऊस, पाऊस, साहित्य, Literature, विकास, विभाग, Sections, साखर, गहू, wheat, कृषी विभाग, Agriculture Department, ज्वारी, Jowar
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Sugarcane harvesting stopped in Kolhapur
Meta Description: 
Sugarcane harvesting stopped in Kolhapur
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे ऊसतोडणीसह सर्व शेती कामे ठप्प झाली आहेत. बुधवारी (ता. १) सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारी (ता. २) सकाळी दहा वाजेपर्यंत संततधार सुरू होता.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment