Take a fresh look at your lifestyle.

कोल्हापूरात कोरोनाचा दुसरा बळी, तर जिल्ह्यात रूग्णांची संख्या ६७…

0


कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. डॉ.डी.वाय.पाटील रूग्णालयात उपचार घेणाऱ्या ३८ वर्षीय तरूणाचा कोरोनाने बळी घेतल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पी पाटील यांनी दिलीय. कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना आज मृत्युचा आकडाही वाढला आहे. इतके दिवस जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक टाळण्यात यशस्वी ठरलेल्या प्रशासनाची यामुळे डोकेदुखी वाढली आहे. 

आज दिवसभरात कोल्हापूरात कोरोनाच्या १८ नवीन रूग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात खऴबळ उडाली होती. त्यातच कोरोनाच्या बळीची भर पडल्याने जिल्ह्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रविवारपासून कोल्हापूरात कोरोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागलीय. काल दिवसभरात १४ रूग्ण तर आज दिवसभरात १८ नव्या रूग्णांची भर पडली आहे. आज सायंकाळनंतर तब्बल १० रूग्णांची भर पडली. यामध्ये पिंपळे तालुका पन्हाळा येथील १, राजारामपुरीतील ३, शाहूवाडी तालुक्यातील ४ तर आजरा तालुक्यातील हालेवाडीच्या २ रुग्णांचा समावेश आहे.

Previous articleमतदानासाठी मजुरांची गावी परतण्याची सोय करता मग आपत्ती काळात विरोध का? : सदाभाऊंचा आक्रमक पवित्रा

Source link

X