कोल्हापूरात कोरोनाचा पाचवा बळी | Lokshahi.News


कोल्हापूर । कोरोनामुळे जिल्ह्यात आज एकाचा बळी गेला. हेब्बाळ जलद्याळ ता.गडहिंग्लज येथील 62 वर्षीय माजी पोलिस कर्मचारी 18 मे रोजी मुंबई वरुन कुटूंबीयासह गावी आले होते.

गावाबाहेर असणा-या घरामध्ये ते त्यांच्या पत्नी व मुलासह क्वारंन्टाईन होते. त्यांना त्रास होऊ लागल्याने शुक्रवारी (ता.29) ला उपचारासाठी सीपीआर नेण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा सीपीआर मध्ये मृत्यू झाला. त्यांची पत्नी आणि मुलगा यांचा रिपोर्ट देखील कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा हा पाचवा बळी ठरला आहे.

Previous articleलॉकडाऊन ५.० अर्थात अनलॉक १.० काय आहे? वाचा..!

Source link

Leave a Comment

X