कोल्हापूर जिल्ह्यातील धरणसाठा आणि पावसाची ताजी आकडेवारी, सर्वाधिक पाऊस गगनबावड्यात


कोल्हापूर| जिल्ह्यात काल दिवसभरात (आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात) गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ९२ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर आदल्या दिवशी (४ जून) १३८ मिमी पाऊस पडला होता. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत २८९.५० मिमी पाऊस नोंदवला गेलाय. 

कोल्हापूर जिल्ह्याची एकूण आकडेवारी बघता गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला असून गेले दोन दिवस तालुक्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले होते. जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे – हातकणंगले- ३.६३ मिमी एकूण ३५.७५ मिमी, शिरोळ- ०.५७ मिमी एकूण १९ मिमी, पन्हाळा- २४ मिमी एकूण १३३.२९ मिमी, शाहूवाडी- ३७.६७ मिमी एकूण १६४.३३, राधानगरी- २२.६७ मिमी एकूण १११ मिमी, गगनबावडा- ९२ मिमी एकूण २८९.५० मिमी, करवीर- ८.४५ मिमी एकूण १३५.८२ मिमी, कागल- १२.८६ मिमी एकूण १०१ मिमी, गडहिंग्लज- ०० मिमी एकूण ६७.१४ मिमी, भुदरगड- २.८० मिमी एकूण १०८.६० मिमी, आजरा- ५.२५ मिमी एकूण १२७ मिमी, चंदगड- ४.३३ मिमी एकूण १५०.३३ मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

धरण पाणीसाठा – जिल्ह्यातील राधानगरी धरणात ४४.७९ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ४७.१७ दलघमी, वारणा ३३०.९३ दलघमी, दूधगंगा २१०.७६ दलघमी, कासारी २४.१८ दलघमी, कडवी ३१.०१ दलघमी, कुंभी २७.६६ दलघमी, पाटगाव २३.९८ दलघमी, चिकोत्रा १३.८७ दलघमी, चित्री १३.०५ दलघमी, जंगमहट्टी ८.०५ दलघमी, घटप्रभा  १३.९५ दलघमी, जांबरे ६.११ दलघमी, कोदे (ल पा) १.२३ दलघमी असा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम १२.९ फूट, सुर्वे १४.२ फूट, रुई ४०.६ फूट, तेरवाड ३५फूट, शिरोळ २७.६ फूट, नृसिंहवाडी २०.६ फूट, राजापूर १३.६ फूट तर नजीकच्या सांगली ६.६ फूट व अंकली ९.२ फूट अशी आहे.Source link

Leave a Comment

X