Take a fresh look at your lifestyle.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे ४११ अॅक्टिव्ह रूग्ण, ६ जणांचा मृत्यु

0


कोल्हापूर। आज रात्री 8 वाजेपर्यंत 273 प्राप्त अहवालापैकी 5 अहवाल पॉझीटिव्ह तर 264 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. (612 पैकी यापूर्वीच्या दोघांचे दुसरा अहवालही पॉझिटिव्ह आहे, असे मिळून एकूण 273), एक पॉझीटिव्ह अहवाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून, एक अहवाल नाकारण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 411 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील यांनी आज दिली.

आज रात्री 8 वाजेपर्यत प्राप्त 5 पॉझीटिव्ह अहवालामध्ये, आजरा 1,  शाहूवाडी 3, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-1  असा समावेश आहे

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- 49, भुदरगड- 63, चंदगड- 61, गडहिंग्लज- 67, गगनबावडा- 6, हातकणंगले- 6, कागल- 51, करवीर- 12, पन्हाळा- 24, राधानगरी- 63, शाहूवाडी- 164, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-21 असे एकूण 605 आणि पुणे -1, सोलापूर-3, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील सात असे मिळून एकूण 612 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे. जिल्ह्यात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर जिल्ह्यातील अॅक्टिव रूग्णांची संख्या 411 इतकी आहे.Source link

X