कोल्हापूर ब्रेकींग: कोरोनाचे आणखी ४ रूग्ण आढळले


कोल्हापूर। कोल्हापूर जिल्हातील कोरोनाचा विऴखा अधिकच वाढत चालला असून आज नव्याने ४ रूग्णांची भर पडलीय. यामध्ये आजरा, शाहूवाडी, भुदरगड येथील मुंबईतून आलेल्या तिघांचा समावेश आहे. तर सोलापूरहून आलेल्या सीपीआर मधील एका महिला डॉक्टरलाही कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्हातील कोरोनाबाधितांचा आकडा ४० वर गेला आहे. अवघ्या चार दिवसात नव्याने ५० टक्के रूग्ण संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

Previous articlePM किसान योजनेचा पाचवा हप्ता जमाः अशी पहा यादी, नसेल मिळाले पैसे तर जाणून घ्या तुमच्या खात्याची स्थिती!

Source link

Leave a Comment

X